२२ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २२ एप्रिल चे दिनविशेष.

वसुंधरा दिन - वसुंधरा दिवस/पृथ्वी दिवस हा जगभरातून पृथ्वीच्या पर्यावरण संवर्धनासाठी जागृती दिवस म्हणुन जगभरात पाळला जातो. अमेरिकेत वसुंधरा दिवस/पृथ्वी दिवस हा २२ एप्रिल रोजी पाळला जातो तर संयुक्त राष्ट्रे हाच दिवस २० मार्च रोजी म्हणजे सूर्य पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या थेट समोर असण्याच्या दोन बिंदूपैकी एका बिंदूशी पोचण्याच्या दिवशी पाळतात.
जागतिक दिवस
२२ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवसठळक घटना (घडामोडी)
२२ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी- १०५६: क्रॅब नेब्यूलामधील (तेजोमेघ) सुपरनोव्हाचा महास्फोट झाला.
- १८६४: नाणे कायदा १८६४नुसार सगळ्या अमेरिकन नाण्यांवर In God We Trust छापण्यास सुरुवात.
- १९४८: अरब-इस्त्रायल युद्ध. अरबांनी इस्त्रायलचे हैफा हे प्रमुख बंदर काबीज केले.
- १९७०: पृथ्वी दिन पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
- १९७९: विनोबा भावे यांनी संपूर्ण गोहत्या बंदीच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले.
- १९९३: नेटस्केपचा पूर्वावतार मोझेकची १.० आवृत्ती आली.
- १९९७: राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेचे (NIV) संचालक डॉ. कल्याण बॅनर्जी यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ओमप्रकाश भसीन पुरस्कार जाहीर करण्यात आला.
- २००६: प्रवीण महाजन यांनी भाजपचे नेते प्रमोद महाजन यांच्यावर कौटुंबिक वादातून गोळ्या झाडल्या.
जन्म (वाढदिवस, जयंती)
२२ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १६१०: अलेक्झांडर आठवा (पोप, मृत्यू: १ फेब्रुवारी १६९१).
- १७०७: हेन्री फील्डिंग (इंग्लिश लेखक, मृत्यू: ८ ऑक्टोबर १७५४).
- १७२४: इमॅन्युएल कांट (जर्मन तत्त्वज्ञ, मृत्यू: १२ फेब्रुवारी १८०४).
- १८१२: लॉर्ड जेम्स अँड्रु ब्राउन रॅमसे डलहौसी (भारताचा गव्हर्नर जनरल, मृत्यू: १९ डिसेंबर १८६०).
- १८७०: व्लादिमिर इलिच लेनिन (सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: २१ जानेवारी १९२४).
- १८८३: अंजनीबाई मालपेकर (भारतीय गायिका, मृत्यू: ७ ऑगस्ट १९७४).
- १९०४: रॉबर्ट ओपनहाइमर (अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, मृत्यू: १८ फेब्रुवारी १९६७).
- १९०४: रामनाथ गोएंका (इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक, मृत्यू: ५ ऑक्टोबर १९९१).
- १९१४: बलदेव राज चोप्रा (भारतीय दिग्दर्शक व निर्माते, मृत्यू: ५ नोव्हेंबर २००८).
- १९१६: यहुदी मेनुहीन (व्हायोलिनवादक व वाद्यवृंदसंचालक, मृत्यू: १२ मार्च १९९९).
- १९१६: काननदेवी (हिंदी अभिनेत्री आणि गायिका, मृत्यू: १७ जुलै १९९२).
- १९१७: मार्कस बार्टली (अॅंग्लो-इंडियन सिनेमॅटोग्राफर, मृत्यु: १४ मार्च १९९३).
- १९१९: डोनाल्ड जे. क्रॅम (नोबेल पारितोषिकविजेते अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ, मृत्यू: १७ जून २००१).
- १९२९: उषा मराठे खेर ऊर्फ उषा किरण (चित्रपट रंगभूमी आणि अभिनेत्री, मृत्यू: ९ जानेवारी २०००).
- १९२९: प्रा. अशोक केळकर (पद्मश्री आणि साहित्य अकादमी पुरस्कार विजेते भाषाशास्त्रज्ञ तसेच साहित्य समीक्षक, मृत्यू: २० सप्टेंबर २०१४).
- १९३५: भामा श्रीनिवासन (भारतीय-अमेरिकन गणितज्ञ आणि शैक्षणिक, हयात).
- १९३९: बाळ फोंडके (विज्ञानविषयक लेखक, हयात).
- १९५७: डोनाल्ड टस्क (पोलिश पंतप्रधान, हयात).
- १९४५: गोपाळकृष्ण गांधी (भारतीय प्रशासकीय अधिकारी आणि राजकारणी, हयात).
- १९६५: अतुल कसबेकर (मृत्यु: भारतीय फोटोग्राफर आणि चित्रपट निर्माते, हयात).
- १९७१: सुमीत राघवन (भारतीय रंगभुमी, दुरचित्रवाणी व चित्रपट अभिनेते, हयात).
- १९७४: चेतन भगत (इंग्रजी भाषेतून लिखाण करणारे भारतीय लेखक आणि कादंबरीकार, हयात).
- १९७६: सरफराज खान (भारतीय हिंदी अभिनेते, हयात).
- १९७८: मोना घोष शेट्टी (मृत्यु: भारतीय डबिंग कलाकार, गायिका आणि दिग्दर्शिका, हयात).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
२२ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- इ.स. २९६: कैयस (पोप, जन्म: ??).
- ५३६५: अगापेटस पहिला (पोप, जन्म: ??).
- १९०८: हेन्री कॅम्पबेल - बॅनरमन (युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान, जन्म: ७ सप्टेंबर १८३६).
- १९३३: हेन्री रॉइस (कार उद्योगपती, जन्म: २७ मार्च १८६३).
- १९४५: विल्हेल्म कौअर (जर्मन गणितज्ञ, जन्म: २४ जून १९००).
- १९७३: वि. वि. उर्फ विष्णू विनायक बोकील (मराठी लेखक, जन्म: २ जून १९०७).
- १९८०: फ्रिट्झ स्ट्रासमान (जर्मन भौतिकशात्रज्ञ, जन्म: २२ फेब्रुवारी १९०२).
- १९९४: रिचर्ड निक्सन (अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष, जन्म: ९ जानेवारी १९१३).
- १९९४: सुशीलमुनी महाराज (विचारवंत, समाजसुधारक आचार्य, जन्म: १५ जून १९२६).
- २००३: बळवंत गार्गी (पंजाबी नाटककार, दिग्दर्शक आणि कादंबरीकार, जन्म: ४ डिसेंबर १९१६).
- २००५: फिलिप मॉरिसन (अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ, जन्म: ७ नोव्हेंबर १९१५).
- २०१३: लालगुडी जयरामन (व्हायोलीन वादक, संगीतकार आणि गायक, जन्म: १७ सप्टेंबर १९३०).
- २०१३: जगदीश शरण वर्मा (भारताचे २७ वे सरन्यायाधीश, जन्म: १८ जानेवारी १९३३).
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
एप्रिल महिन्यातील दिनविशेष
एप्रिल | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | |||||
तारखेप्रमाणे एप्रिल महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
नवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण
अभिप्राय