२७ मार्च दिनविशेष

२७ मार्च दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २७ मार्च चे दिनविशेष.
२७ मार्च दिनविशेष | 27 March in History
२७ मार्च दिनविशेष (दिनविशेष).
TEXT - TEXT.

जागतिक दिवस

२७ मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • जागतिक रंगमंच दिवस.

ठळक घटना (घडामोडी)

२७ मार्च रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १५१३: स्पॅनिश कॉंकिस्तादोर हुआन पॉन्से दे लेओन फ्लोरिडाला पोचणारा प्रथम युरोपीय झाला.
 • १६२५: चार्ल्स पहिला इंग्लंड, आयर्लंड व स्कॉटलंडच्या राजेपदी. राजेपदी येताच त्याने आपणच फ्रांसचेही राजे असल्याचे जाहीर केले.
 • १७८२: चार्ल्स वॅट्सन-वेंटवर्थ युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानपदी.
 • १७९४: अमेरिकन नौदलाची स्थापना.
 • १७९४: स्वीडन व डेन्मार्कमध्ये मित्रत्त्वाचा तह.
 • १८१४: १८१२चे युद्ध-हॉर्सशू बेंडची लढाई - जनरल ॲंड्र्यू जॅक्सनच्या अमेरिकन सैन्याने क्रीक जमातीचा पराभव केला.
 • १८३६: टेक्सासची क्रांती-गोलियाडची कत्तल - जनरल ॲंतोनियो लोपेझ दि सांता ऍनाने मेक्सिकन सैन्याला ४०० टेक्सासी व्यक्तींची कत्तल करण्यास फरमावले.
 • १८४६: मेक्सिकन - अमेरिकन युद्ध - फोर्ट टेक्सासचा वेढा सुरू.
 • १८५४: क्रिमियन युद्ध - युनायटेड किंग्डमने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
 • १८७१: रग्बीचा पहिला आंतरराष्ट्रीय सामना इंग्लंड व स्कॉटलंडमध्ये खेळला गेला.
 • १८९०: अमेरिकेच्या लुईव्हिल, केंटकी शहरात टोर्नेडो. ७६ ठार, २०० जखमी.
 • १८९३: केशवसुत यांनी तुतारी, ही कविता लिहिली.
 • १९४१: दुसरे महायुद्ध - युगोस्लाव्हियातील अक्षधार्जिण्या वायुदल अधिकाऱ्यांनी रक्तहीन क्रांती करून सरकार उलथवले.
 • १९५८: निकिता ख्रुश्चेव्ह सोवियेत संघाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९६४: ड फ्रायडे भूकंप - अमेरिकेच्या अलास्का राज्यात रिश्टर मापनपद्धतीनुसार ९.२ तीव्रतेचा भूकंप. १२५ ठार, ॲंकरेज शहर उद्ध्वस्त.
 • १९७७: तेनेरिफ द्वीपावरील धावपट्टीवर दोन बोईंग ७४७ प्रकारच्या विमानांची टक्कर. ५८३ ठार. विमान-वाहतूकीच्या इतिहासातील ही सगळ्यात भीषण दुर्घटना आहे.
 • १९८०: अलेक्झांडर कीलॅंड हा खनिज तेलाचे उत्खनन करणारा तराफा समुद्रात बुडाला. १२३ ठार.
 • १९८८: मौदुद अहमद बांगलादेशच्या पंतप्रधानपदी.
 • १९९२: ख्यातनाम गायक पंडित भीमसेन जोशी यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन पुरस्कार प्रदान.
 • १९९३: जियांग झेमिन चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९३: आल्बर्ट झफी मादागास्करच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९९३: महामने उस्माने नायजरच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • २०००: वेस्ट इंडीझचा खेळाडू कोर्टनी वॉल्श याने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळींचा विश्वविक्रम प्रस्थापित केला.
 • २०००: चित्रपट निर्माते / चित्रपट दिग्दर्शक बी. आर. चोप्रा यांना फाय फाउंडेशनतर्फे राष्ट्रभूषण पुरस्कार जाहीर.
 • २००१: फ्टनंट जनरल हरिप्रसाद यांनी फॉरवर्ड कॉर्प्सच्या प्रमुखपदाची सूत्रे हाती घेतली.
 • २००४: नासा या अमेरिकेच्या संशोधन संस्थेने एक्स-४३ या सर्वाधिक वेगवान चालकरहित जेट विमानाची निर्मिती केली.

जन्म (वाढदिवस, जयंती)

२७ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १७८५: लुई सतरावा (फ्रांसचे राजा, मृत्यू: ८ जून १७९५).
 • १८४५: विल्हेम रॉंटजेन (जर्मन भौतिकशास्त्रज्ञ, क्ष-किरणांचे शोधक, मृत्यू: १० फेब्रुवारी १९२३).
 • १८५९: जॉर्ज गिफेन (ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू, मृत्यू: २९ नोव्हेंबर १२२७).
 • १८६३: हेन्री रॉइस (इंग्लिश कार तंत्रज्ञ, मृत्यू: २२ एप्रिल १९३३).
 • १८८८: जॉर्ज ए. हर्न (दक्षिण आफ्रिकेचे क्रिकेट खेळाडू, मृत्यू: १३ नोव्हेंबर १९७८).
 • १८९१: व्हॅलेन्स जुप (इंग्लिश क्रिकेट खेळाडू, मृत्यू: ९ जुलै १९६०).
 • १९०१: ऐसाकु साटो (जपानी पंतप्रधान, मृत्यू: ३ जून १९७५).
 • १९१०: आय छिंग (चिनी भाषेमधील कवी, मृत्यू: ५ मे १९९६).
 • १९१२: जेम्स कॅलाहान (युनायटेड किंग्डमचे पंतप्रधान, मृत्यू: २६ मार्च २००५).
 • १९४१: इव्हान गास्पारोविच (स्लोव्हेकियाचे राष्ट्राध्यक्ष, ह्यात).
 • १९६३: क्वेंटिन टारान्टिनो (अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक व लेखक, ह्यात).
 • १९७३: रॉजर टेलिमाकस दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू, ह्यात).
 • १९८६: झेवियर मार्शल (वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू, ह्यात).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२७ मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • ११९१: क्लेमेंट तिसरे (पोप, जन्म: अज्ञात).
 • १३७८: ग्रेगोरी अकरावे (पोप, जन्म: १३२९).
 • १६२५: जेम्स पहिले (इंग्लंडचे राजे, जन्म: १९ जून १५६६).
 • १८९८: सर सय्यद अहमद खान (भारतीय शिक्षणतज्ञ आणि समाजसुधारक, जन्म: १७ ऑक्टोबर १८१७).
 • १९४०: मायकेल जोसेफ सॅव्हेज (न्यू झीलंडचे पंतप्रधान, जन्म: २३ मार्च १८७२).
 • १९६८: युरी गागारीन (पृथ्वीप्रदक्षिणा करणारे रशियाचे पहिले अंतराळवीर, जन्म: ९ मार्च १९३४).
 • १९८१: माओ दुन (चिनी भाषेमधील कादंबरीकार, पत्रकार, जन्म: ४ जुलै १८९६).
 • १९९२: प्रा. शरच्चंद्र वासुदेव चिरमुले (मराठी साहित्यिक, प्राचार्य, गरवारे वाणिज्य महाविद्यालय, जन्म: ?).
 • १९९७: भार्गवराम आचरेकर (मराठी रंगभूमीवरील गायक - अभिनेते, जन्म: १० जुलै १९१०).

गॅलरी (२७ मार्च दिनविशेष)

२७ मार्च दिनविशेष २७ मार्च दिनविशेष २७ मार्च दिनविशेष
२७ मार्च दिनविशेष
२७ मार्च दिनविशेष २७ मार्च दिनविशेष २७ मार्च दिनविशेष २७ मार्च दिनविशेष
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

मार्च महिन्यातील दिनविशेष

तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


संबंधित दुवे: सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / जानेवारी दिनविशेष

विभाग: जानेवारी दिनविशेष, फेब्रुवारी दिनविशेष, मार्च दिनविशेष, एप्रिल दिनविशेष, मे दिनविशेष, जून दिनविशेष, जुलै दिनविशेष, ऑगस्ट दिनविशेष, सप्टेंबर दिनविशेष, ऑक्टोबर दिनविशेष, नोव्हेंबर दिनविशेष, डिसेंबर दिनविशेष
विषय: मार्च

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.