मराठी शब्दकोश

मराठी भाषेतील शब्दांचा सर्वात मोठा अभिनव शब्द संग्रह


मराठी शब्दांचे अर्थ, वाक्यात उपयोग सोबतच मनोरंजक मराठी शब्दांचा संग्रह आणि संपूर्ण मराठी शब्दकोश.


फेसबुक पानफेसबुक गट
शेवटचा बदल ११ जुलै २०२१

मराठी भाषेतील मनोरंजक शब्दांचा संग्रह


मराठी शब्दकोश
क्षज्ञ


शब्दअर्थ
अगत्यमहत्व, जरूरी, नड
- आमच्या मुलाच्या लग्नाला आपण सहकुटूंब अगत्य येण्याचे करावे.


अग्यारीपारशांचे अग्निदेवतेचे मंदिर
- उद्या सायंकाळी आम्ही अग्यारीमध्ये चंदन अर्पण करण्यासाठी जाणार आहोत.


अघोरअत्यंत क्रूर, अतिशय भयंकर, अमंगळ
- दिनेशने अतिषय अनपेक्षीत असे अघोर कृत्य केले होते.


अडगाअडाणी
- अडगा माणुस शहाण्या माणसांना अडचनीत आणत आसतो.


अडदरधाक, दरारा
- मुलांना घडवतांना त्यांना पालकांविषयी आदरयुक्त अडदर असणे आवश्यकच असते.


अतिमानुषमानवी शक्तीच्या पलीकडचे, अलौकिक
- बाबा आमटे यांच्याकडे अतिमानुष सामाजिक कार्याचा ध्यास होता.


अदावतखोटा आळ, वैर, दुष्टावा
- निर्बुद्ध मणूष्य स्वतःला योग्य सिद्ध करण्यासाठी बुद्धिवंतावर अदावत आणत असतो.


अधिसूचनाजाहीर खबर, सूचना
- अधिसुचना मिळताच वर्गातील सर्व मुले पटांगणात प्रार्थणेसाठी जमली.


अधोगामीखाली-हिनतेकडे जाणारे
- अहंकारी मणूष्याचे विचार अहंकाराला बळी पडून अधोगामी होत जातात.


अध्वर्यूउपाध्याय, यज्ञ चालविणारा ऋत्विज, नायक, मुख्य व्यवस्थापक
- नवचंडी यज्ञात उपाध्ये गुरूजी अध्वर्यू असतात.
शब्दअर्थ
आगरनारळी - पोफळीची बाग, घराभोवती भाजीपाला लावण्याची जागा
आगळीककुरापत, खोडी, चूक, दोष
आगियाकाजवा
आग्रहायणमार्गशीर्ष महिना
आटीश्रम, खटपट
आणाभाकाशपथ घेऊन पक्का केलेला करार
आदिमजातीमूळ समाज, आदिवासी जमात
आंदुळणेझोके देणे, हेलकावे खाणे
आखरगावची गुरे विसाव्यासाठी बसतात ती सावलीची जागा
आखातजमिनीत घुसलेला समुद्राचा भाग


शब्दअर्थ
इखळाखिळा वगैरे उपटून काढण्याचा चिमटा
इंगणेभारावून जाणे, टेकीला येणे
इटाभाल्यासारखे एक शस्त्र
इतमामलवाजमा, सरंजाम
इत्थंभूतजसे घडले तसे, सविस्तर, तपशीलवार
इमाममुसलमानांचा धर्मगुरू
इरडउष्ट खरकटे, विष्ठा इ. खाण्यासाठी गुरांचे भटकणे
इरसालनिवडक, वेचक
इस्तारीपत्रावळ
इहया जन्मी


शब्दअर्थ
ईदमुसलमानी सण
ईप्सितमनात धरलेले, इच्छिलेले
ईरशक्ती, उत्साह
ईसायेशू ख्रिस्त


शब्दअर्थ
उकटीटाकवण्याचे हत्यार, टाकी
उकरउकरून काढलेला मातीचा ढीग
उकलउलगडा, खुलासा
उकळेगिरीलुबाडणूक
उकाडारतीब, नियमित हप्ते देण्याची पद्धती
उकाळाकाढा
उकिडवेएक आसन, बसण्याची एक स्थिती
उकिरडाकेरकचरा टाकण्याची जागा


शब्दअर्थ
ऊ/ऊंकेसात होणारा एक जीव (उवा)
ऊटगाडीचे चाक पुढे जाऊ/घसरू नये म्हणून आडवालावलेला अडथळा
ऊठपायसदासर्वदा, फिरून फिरून, एका पायावर तयार
ऊडवेभाताच्या पिंजराची रचलेली गंजी
ऊतउकळी, उसळी, फणफणाट
ऊतमातमाज, बेफिकीरी, उन्माद
ऊबकोंदटपणाची उष्णता, गरमी
ऊरछाती
ऊर्जितचढती कळा, उत्कर्षाचा काळ
ऊर्ध्वमरण्यापूर्वी लागलेला श्वास, घरघर


शब्दअर्थ
ऋत्चावेदातील मंत्र
ऋजुसरळ, प्रामाणिक, निष्कपटी, साधे
ऋणकर्ज, उपकार, विजेचा एक प्रकार
ऋणकोकर्ज घेतलेला, कूळ
ऋणाईतऋणकरी
ऋणानुबंधघरोबा, स्नेहसंबंध
ऋणीदेणेदार, आभारी
ऋतुहवामानाप्रमाणे मानलेला वर्षाचा एक भाग, हंगाम, मौसम, स्त्रियांचा विटाळ
ऋतुदर्शनस्त्रीला विटाळ प्राप्त होणे, रजोदर्शन
ऋतुदानस्त्री संभोग


शब्दअर्थ
एकपहिली संख्या
एकटफक्त एक
एकाचे दोन करणेअतिशयोक्ती करणे
एककल्लीहेकेखोर, एकाच गोष्टीकडे कल असलेला
एकचित्तएकाग्र, सावधान
एकजातएकाच प्रकारचे
एकजिनसीएकाच प्रकारचे
एकजूटएकी, एकोपा
एकतंत्रीएकाच तंत्राने चालणारे, एकमार्गी
एकतर्फीएकाच बाजूचा, पक्षपातीपणाचा


शब्दअर्थ
ऐकणाकानाचा धड
ऐकमत्यसर्वांचे एकमत असणे
ऐकीवदुसर्‍याकडून समजलेले, कानावर आलेले
ऐच्छिकआवडेल ते, पाहिजे ते, स्वच्छंदी
ऐनअगदी भर, अचूकपणा, अतिशयता वगैरे दाखविणारा शब्द
ऐनगल्लापाहणी करून ठरविलेला धान्याचा गल्ला, अंदाजी पीक
ऐनजमामूळचा/नेहमीचा वसूल
ऐनकचष्मा
ऐबव्यंग, दोष, खोड
ऐल, ऐलाडअलीकडचा


शब्दअर्थ
ओइरणे(तांदूळ), वैरणे, उकळत्या पाण्यात तांदूळ शिजण्याकरिता टाकणे
ओ देणेहाकेला उत्तर देणे
ओकणेउलटी होणे, मनात असलेले सांगून मोकळे होणे
ओक्साबोक्शीहुंदके देऊन, हमसून धुमसून
ओकेसुने, निर्जन, ओसाड, बुच्चे
ओखटवाईट, घाणेरडे
ओगरणेवाढणे
ओघप्रवाह, अखंडपणा, शिरस्ता, रिवाज
ओघळझिरपा, प्रवाहाचा डाग
ओंगणवंगण


शब्दअर्थ
औकात (द)गुजारा, निर्वाह, निर्वाहाचे साधन
औचित्यउचितपणा, योग्यपणा
औटसाडेतीन
औट घटकांचेअल्पकाल टिकणारे
औटकीसाडेतीनच पाढे
औटीलाकडी ठोकळ्याला आत चीप बसविण्यासाठी पाडलेली आडवी खाच
औतकाठीशेतकीची अवजारे
औतकीप्रत्येक नांगरामागे ठराविक धान्य मिळण्याचा पाटलाचा हक्क
औत्सुक्यउत्सुकता, उत्कंठा
औदासीन्यउदासीनता, निरिच्छता, अलिप्तपणा, बेफिकीरी


शब्दअर्थ
ककारउच्चार, क अक्षरसुपुम्ना नाडी
कंकणकाकण, बांगडी, चुडा
कंकाळपिशाच, झोटिंग, अस्थिपंजर
कंकासगृहकलश, भांडणतंटा
कंकोत्रीकुंकुम पत्रिका, लग्नचिठ्ठी
कचमाघार, चेप, दाब
कचकचरेव दाताखाली सापडल्याने होणारा आवाज, कटकट, भांडण
कचकाकाठीचा जोराचा वार, मार
कचखाऊमाघार घेणारे
कचाटयुक्ती, बेत, धाडस, घोटाळा


शब्दअर्थ
आकाश, शून्य, पोकळी
खकाणाकेरकचर्‍याचा धुरळा, तंबाखू-मिरची इ. ची धूळ
खगोलआकाशातील ग्रहगोल, ज्योतिष
खग्रासपूर्णपणे ग्रासलेले-गिळलेले, पूर्ण ग्रहण
खंक (ख)काहिच नसलेला, दरिद्री, अशक्त
खंकाळदृष्ट, उग्र, तिरसट, रागीट
खंगणेझिजणे, दरिद्री होणे
खंगारपक्की भाजलेली वीट
खंगाळणेखळबळणे, जोराने हलवून स्वच्छ करणे
खचरास, ढीग, दाटी


शब्दअर्थ
गर्व
गईछपराचे वासे भिंतीवरच्या ज्या आडव्या सरावर टेकतात तो.
गंगथडगोदावरी नदीच्या काठचा प्रदेश
गंगा उचलणेगंगेची शपथ घेणे
गंगावनकृत्रिम केस
गचकणेहिसका आचका देणे, मरणे
गचांडीहाताचा पंजा मानेवर ठेवून दिलेला धक्का, मान, गळा
गच्छंतीजाणे, निघून जाणे, मरणे
गजघंटाओरडून बोलणारी बाई
गजनीअर्धसुती अर्ध रेशमी कपडा, एका बाजूने रंगीत कपडा


शब्दअर्थ
घईघराच्या दालनाची रुंदी
घंगा(घा)ळआंघोळीचे पाणी काढून घेतात ते भांडे
घटघडा, घागर, नवरात्रात पूजावयाचा तांब्या
घटकजुळवून आणणारा, मध्यस्थ
घट(टि)का२४ मिनिटांचा काळ
घटमानहाती घेतलेले, होणारे, संभाव्य
घटमूटटिकाऊ, मजबूत
घ(घां)टसर्पघशात होणारा एक रोग
घटाळ(बैलाच्या गळ्यातील) घंटांची माळ
घटाटोपघुमट, घुमटाकार चांदवा, मंडपी


शब्दअर्थ
निश्चय, खात्री, सदृश्य
चकधाक, नियम, नेहमीची वहिवाट
चकणातिरवे पाहणारा
चकंदळगोल तुकडा, नायनाट किंवा चामडीच्या रोगाने बाधलेला गोल भाग
चकनाचूरभुगा, चुरा, तुकडे तुकडे झालेला
चकभूलभ्रांती, संभ्रम, आश्चर्य
चकरणेचुकणे, भ्रमणे
चकलाशहराचा भाग, पेठ, मोहल्ला
चकवणीदिशाभूल, फसवणूक
चकाटी(ट्या)गप्पा


शब्दअर्थ
पोथीच्या शेवटचे समाप्ती दाखविणारे चिन्ह
छक्कडचपराक, तोटा, लावणीचा एक प्रकार
छकडाएका बैलाने चालणारी गाडी
छक्कापंजापत्यांचा डाव
छटारंगाची इ. लकेर, छाया, झाक
छटेलबदफैली, व्यसनी
छट्टाटप्पा, अंतर
छडसळ, घडीमुळे पदलेली रेघ-वळ
छडामाग, तपास, धाग्याचे टोक
छदामअगदी अल्पमोलाचे नाणे


शब्दअर्थ
जईफक्षीण
जकातकर, दस्तुरी
जखडअगदी म्हातारा
जगणूकजगण्याची व्यवस्था, निर्वाह
जगदाकारअखिल विश्व
जगतीजग
जंगगंज, कीट, लढाई
जंगमजिंदगीभांडीकुंडी इ. मालमत्ता
जंजाळदगदग, उपद्व्याप, त्रास
जटिलगुंतागुंतीचे, भानगडीचे


शब्दअर्थ
झकवाईट गोष्ट, निंद्य कर्म
झकवणूकफसवणूक
झकाझकीचकमक, झगडा
झक्कडचकमक, वादावादी
झक्कीलहरी, छांदिष्ट
झरारीशेकोटी
झंगटटोले मारावयाचे एक वाद्य, तास
झंझटलचांड, ब्याद
झडएकसारखा वर्षाव, जोराच्या पावसाचे उडणारे शिंतोडे
झडतीझाडा, बारीक तपास, मोजणी, मोजदाद


शब्दअर्थ
टकएकसारखी नजर, कपाळाचा ठणका
टक घालणेटीप मारणे
टकटकणेटवटवी येणे, खुलणे
टकबंदीदर टक्क्यास ठरविलेला दर किंवा जमीनधारा
टकानाणे, शेकडा प्रमाण, ध्वज, निशाण
टगळखुबी, शैली, युक्ती
टग्यागुंड, लुच्चा
टंकपाथरवटी छिन्नी, टाकी, ठसा
टंकयंत्रबोटांनी किल्ल्या दाबून अक्षरे उठविण्याचे यंत्र
टंकसाळनाणे किंवा नोटा पाडण्याचा कारखाना


शब्दअर्थ
ठक्‌थक्क, चकित
ठकलुच्चा - फसवा माणूस
ठणकावणेपरखड बोलणे, सुनविणे, तोंडावर स्पष्ट सांगणे
ठणठणपाळकफल्लक मनुष्य, ठणठणाट
ठपकाविणेदोष देणे - लावणे, आरोप ठेवणे
ठमकनखरा
ठरणेस्थिर होणे, निश्चय होणे
ठवलाजात्याचा मधला खुंटा
ठसस्पष्ट, ठसठशीत, घट्ट विणीचे
ठसकठणकणारी जखम, नखरा


शब्दअर्थ
डई देणेलोचटपणाने राहणे
डकलानदीच्या वाळवंटात स्वच्छ पाणी भरून घेण्यासाठी केलेला खळगा, पाण्याचे डबके
डकवणडिंक, खळ
डकाईतदरोडेखोर
डगअस्थिरता, लटपटीत अवस्था, खराब, भीती, पाऊल
डगडगणेडळमळणे, गदगदणे (उष्म्याने वैगरे )
डगणेहालणे, बाजूला सरणे, घाबरणे
डगमगअस्थिरता, लटपट
डगरदरड (नदीच्या तीराची किंवा टेकडीची)
डगलालांब कोट


शब्दअर्थ
अक्षरशत्रू, मठ्ठ, मूर्ख
ढई देणेलोचटपणे राहणे, पुष्कळ दिवस ठाणे देणे. (पाहुण्याने वगैरे)
ढकलगुजाराकसेतरी पोट भरणे
ढकलपट्टीदिवस कसेतरी काढणे, चुकवाचुकवी, चालढकल
ढकाजोराचा हिसका, इजा, नुकसान, बिघाड
ढंगचाल, वृत्त, वाईट नाद, छंद, चाळे
ढप(प्प)ळपातळ भाजी
ढप्पळवणीबरेच पाणी घालून पातळ केलेले ताक
ढप्पळशाईउधळपट्टी, गोंधळ, अव्यवस्था
ढबवागण्याची - चालण्याची रीत, विशिष्ट लकब, मोठेपणा, ऐट, चाल


शब्दअर्थ
तटकणेघट्ट आवळणे
तटकेदारावरील ताटी
तक(ख)तरावजत्रेत मिरवितात ती तमाशाची गाडी
तकराळखर्‍याचे खोटे करून सांगितलेली हकीकत, रचलेली तोहोमत, आळ
तकलादीकसेतरी बनविलेले, नकली, हलके, न टिकणारे
तकलीफतसदी, त्रास
तकवाताकद, उत्साह, जोम, प्रयत्न, उत्तेजन, धीर
तकशी(सी)म, तक्षीमवतन, गावखर्च इ. चा वाटा, वाटणी, हिस्सा
तक्षीमदारवाटेकरी, हिस्सेदार
तकावी, तगाईशेतकर्‍याला कर्जरूपाने सरकारने दिलेली आर्थिक मदत


शब्दअर्थ
थकणेदमणे, भागणे, शिणणे, ऋण फार दिवस राहणे, जमा न होणे
थटगर्दी
थट लागणेखूप गर्दी होणे
थटणेसजणे, नटणे
थट्टी(राजाची) गोशाला, गुरे बांधण्याची जागा
थडकिनारा, काठ, शेवट, नदीचे खोरे (भीमथड)
थडीस लावणेकडेस नेणे
थडकथाप (दारावर इ.), आघात, धक्का, धडक
थडकणे(एकाद्या वस्तूवर) आदळणे, एकदम थांबणे, आपटणे, पोहोचणे
थडीतीर, किनारा


शब्दअर्थ
दखलजाणीव, समज, नोटीस, ढवळाढवळ, प्रवेश, ताबा, ज्ञात, श्रुत
दख्खन(नर्मदेच्या) दक्षिणेकडचा भाग, महाराष्ट्र
दगलनिमकहरामी, विश्वासघात
दगाविश्वासघात, धोका, ठकबाजी, लुच्चेगिरी
दगाफटकाकपट, लबाडी, विश्वासघाताचे संकट
दंगलगर्दी, कल्लोळ, कुस्त्यांचा फड, धुमाकूळ, दंगा
दचकधक्का, धसका, आकस्मिक भीतीचा भास
दट्ट्या, दट्टाबूच, दडपण, पिपासारख्या गोलांत पोकळी न राखता आतबाहेर सरणारा दांडा, पिस्टन
दडणलपण्याची जागा, गुहा, कपार
दडपशाहीजुलुमी अमल, अरेरावी कारभार, दांडगेपणा


शब्दअर्थ
धकटीशेकोटी, आगटी
धकणेकसेबसे चालू राहणे, निभावून जाणे, ढकलले जाणे
धकाधकी(क)दगदग, दगदगीचे काम, झगदाझगड
धकावणेनासणे, खराबहोणे, कचरणे, खचणे
धक्कडदांडगा, दिप्पाड
धगडपारिपत्य करणारा, पुरा पडणारा
धगावणेधगीने होरपळणे, पेटणे, चेतणे
धजबांध्याचा डौलदारपणा, रेखीवपणा, लकब, हातोटी, धाडस
धजाध्वजा, झेंडा
धजाव(पिकाने) जीव धरणे, टवटवी


शब्दअर्थ
नाही या अर्थी
नचा पाढा, नन्नाचा पाढाकोणत्याही गोष्टीला नाही म्हणणे
नकळे!कुणास ठाऊक
नकारघंटाकाही नसल्याचे-अभावाचे सूचन
नकलणेउतरणे, नक्कल काढणे, अनुकरण करणे
नकलीअस्सल नव्हे ते, दिखाऊ, बनावट
नकसकामनक्षीकाम, कलाकुसरीचे काम
नक्त, नक(ग)दरोकड नाणे
नक्शा, नक्षानकाशा, आराखडा, बेत, व्युहरचना, प्रतिष्ठा, नूर, वजन
नख देणे-लावणेठार करणे


शब्दअर्थ
पक(क्क)डकुस्तीतील एक डाव, प्रभाव, छाप, गवसण्याचा आनंद, ग्रहणशक्ती, खिळा इ/ उपटण्याचे किंवा पिळून उपसून काढण्याचे हत्यार
पकविणेमनासारखे करून घेणे, मिळविणे
पक्काकच्चा नव्हे असा, पिकलेला , निश्चित, नक्की झालेला, हुशार, चाणाक्ष, गणित करून काढलेले (उत्तर)
पक्का खर्डाकायमचा मांडलेला हिशेब
पक्वाशीलोखंडी गज
पक्वाशयअन्न पचते ते पोटातले स्थान किंवा अवयव
पंक्तिपठाण, पंक्तिबारगीरजेवण घालून चाकरीस ठेवलेला बारगीर (घोडेस्वार), नुसता झोडून राहणारा, आळशी, भोजनभाऊ
पंक्तिपावनपंक्तीस बसण्यास लायक
पंक्तिप्रपंचपंक्तीस वाढताना भेदभाव, पक्षपात, भेदभाव
पखरणसडा (फुलांचा), पाखरांचा थवा एकदम येणे


शब्दअर्थ
फकडीफकीरी, द्राक्षाची एक जात
फकाणाकोरड्या पदार्थांचा एकदम घास
फकीरगरीबी, विरक्ती, मोहरमात फकीरांना द्यावयाची भिक्षा
फक्कडनटेल, रंगेल, छानछोकी, छान, सुरेख
फक्कीभुगा, भुक्का, भुकटी
फक्तकेवळ
फगबरी संधी, मोकळीक, फुरसत
फजरसकाळ, उद्या सकाळी
फजिताआंब्याचे पातळ रायते, आंब्याचा रस काढल्यानंतर कोया - साली पाण्यात कोळून घेतात तो रस
फजितविरमलेला, ओशाळलेला, अपमानित


शब्दअर्थ
बकबगळा
बकध्यानशांतीचे ढोंग
बकणासुक्या खाण्याच्या पदार्थाचा तोंडभर घास
बकणेबडबडणे, वाटेल तसे बोलणे
बक्त(ख्त)रचिलखत
बकवा, बकवादवटवट, भांडण, वाद
बकायाबाकी, येणे रक्कम
बका(क्का)लभुसारी, वाणी इ. दुकानदार, अशा दुकानदारांची एकत्र वस्ती, अठरापगड जातीजमातींची व विविध संस्कृतीच्या लोकांची सरमिसळ वस्ती, असंस्कृत लोकांची वस्ती
बखरपुराणासारखी लिहिलेली हकीकत-चरित्र-इतिहास
बखळमोकळी पडून राहिलेली जागा


शब्दअर्थ
भकलनारळाचा अर्धा भाग, नारळाचे शकल
भकाटी(ळी)न खाण्यामुळे पोट पाठीस लागण्याची अवस्था
भकासओसाड, उजाड, उदासवाणे
भकाळणेपोट आत जाणे
भक्तप्रेमी, उपासक, पूजक
भक्तवत्सलभक्तावर प्रेमकरणारा, भक्ताचे लाड पुरविणारा
भगक्षत, व्रण, भाग्य
भगभगाटधगधगणारी आग
भगराळाचुरा
भग्नमोडके तोडके, फुटके तुटके, छिन्नभिन्न, पडलेले झडलेले


शब्दअर्थ
मकईमका
मकबराकबर
मकरसुसर, मगर, एका राशीचे नाव
मकरकुंडलमकर माशाच्या आकाराचे पुरुषांनी कानात घालावयाचे कुंडल
मकरसंक्रमण - संक्रांतसूर्य मकरराशीला येतो तो सणाचा दिवस (ता. १४ जानेवारीस असतो)
मकरंदमध, सुगंध
मकाणमक्याचा कडबा
मकाणामक्याचा दाणा, मक्याची लाही
मक्ताठेका, कंत्राट, विशिष्ट अटीवर पुरवठा करण्याची हमी, खंड
मखलाशीसारवासारव, समजावणी, भाष्य


शब्दअर्थ
यःकश्चितसामान्य, क्षुद्र
यकृतपित्ताशय
यच्चयावतझाडून सर्व, सर्व
यजमानयज्ञकर्म करणारा, गृहस्थ, घरमालक, पती, नवरा
यडताकगुंतागुंत, घोटाळा
यतीसंन्यासी, (जैन)मुनी
यत्‌किंचितथोडे सुद्धा, थोडेसे
यथाजशा - शी - से
यथातथाकसातरी
यथातथ्यजसे असेल तसे, खरे खरे


शब्दअर्थ
रईसजहागीरदार, सरदार, श्रीमंत माणूस, राहणारा
रकटाचिंधी किंवा सोपट
रकबागावाभोवतालची/किल्ल्याच्या आसपासची जमीन
रकानास्तंभ, सदर (वर्तमानपत्राचे), कागदाची उभी घडी पाडून पडलेला भाग, कॉलम
रक्तशरीरातल्या शिरांतून धमन्यांतून वाहणारा लाल द्रवपदार्थ, तांबडा, आसक्त
रक्तचंदनएक तांबडे लाकूड
रक्तपितीकुष्ठरोग, महारोग
रखडणेरेंगाळत चालणे, ढुंगण खरडत जाणे
रखेलीठेवलेली बाई
रगजोर, जोम, शक्ती, वेदना, अवघडल्याची कळ


शब्दअर्थ
लकडकोटलाकडाची तटबंदी
लकडखानाइमारतीची किंवा जळाऊ लाकडे ठेवण्याची स्वतंत्र जागा, लाकडाची वखार
लकडदिवीरोडका, उंच व किडकिडीत
लकडातगादा
लकडीलाकडासारखी कडक झालेली चिकी, लाकूड, काठी
लकबशैली, ढब, धाटणी, दुर्गुण, खोड
लकाकीचकाकी, तजेला
लकेर(री)रेषा, रेघ, तान, छटा, काठ, किनार
लखलाभमोठा लाभ
लगखांबावर आडवी टाकलेली तुळई, जोड दुवा


शब्दअर्थ
आणि
वईकुंपण
वकरपत, प्रतिष्ठा, मान
वकलआप्तेष्ट, परिवार, खाते, विभाग
वकालतवकीलीचा पेशा, राजदूताची कचेरी, शिष्टाई, मुखत्यारी
वकीलतर्फे नेमलेला प्रतिनिधी - मुखत्यार, राजदूत, एक बाजू घेऊन ती मांडणारा कायदातज्ञ
वकीलनामावकीलाला दिलेले अधिकारपत्र, वकीलपत्र
वकूफ(ब)कुवत, सामर्थ्य, अक्कलहुशारी, कर्तुत्वशक्ती
वक्तकाळवेळ, संधी, प्रसंग, आणीबाणी, खडतर वेळ, अनुकूल काळ
वक्तव्यभाषण, जे बोलावयाचे ते


शब्दअर्थ
शकसंशय, अंदेशा, भीती, कुतर्क
शकएखादा पराक्रमी राजा आपल्या नावाची कालगणना सुरू करतो ती (‘विक्रम शक’, ‘शिवशक’), प्राचीन काळी भारतावर आक्रमण करणारी एक परदेशीय जमात
शककर्ताशक सुरू करणारा पुरूष
शकाब्दशालिवाहन शकाचे वर्ष
शके(अमुक) शकामध्ये (‘शके १८७२’)
शकटगाडा, खोडा, लोटणे
शकटभेदशकट नावाच्या व्यूहरचनेची फळी फोडून झाणे, कोणत्याही ग्रहाचे (विशेषतः चंद्राचे) रोहिणी नक्षत्रातून जाणे, लांडीलबाडी
शकुनशुभ - अशुभ चिन्ह, भविष्याची सूचक लक्षणे, (देवाने दिलेला) कौल
शकुनिमामाकपटी, सल्लागार
शक्कलयुक्ती, कल्पना, तोड, उपाय


शब्दअर्थ
षट्‌सहा
षट्कसहांचा गट, सहांचा समुदाय
षट्कर्णीसर्वांस कळणे, फुटणे
षड्‌रिपुकाम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर हे शत्रू
षष्ठीसहावी तिथी, सहावी विभक्ती, सटवी, सटवाई, साठ वर्षे वयाची पूर्णता झाल्याचा विधी समारंभ, फजिती
षंड(ढ)नपुसंक माणूस, हिजडा
षोडशसोळा
षोशशोपचारसोळा प्रकारचा विधी, सर्व विधी


शब्दअर्थ
सहित (‘सकरुण’, ‘सकर्दम’ इ.)
सइ(ई), सयआठवण, विटी किंवा गोटी टाकण्यासाठी केलेला खळगा
सईसमोतद्दार
सऊअंगलुसलुशीत, मऊ शरीर
सऊळमचूळ, किंचित खारट
सकटसहित, सह, सुद्धा, बरोबर, मिळून, सगळे, समग्र, निवड न करता हाताला येईल तसे, सरसकट, एकदम
सकडासहांचा एक एक गट, फाडे
सकराईहुंडी शिकारण्याबद्दल पडणारा बट्टा
सकलसर्व, सगळा
सक(ख)लात(द)लोकरीचे उंची कापड (शेंदरी किंवा निळ्या रंगाचे)


शब्दअर्थ
हकनाक - नाहकविनाकारण, अन्यायाने
हकालपट्टीकाढून लावणे, हद्दपारी
हकीक(ग)तघडलेली गोष्ट, तिचे वर्णन, अहवाल
हकीमयुनानी वैद्य
हकीमाई, हकीमीहकीमाचा व्यवसाय
हक्कअधिकार, मालकी, न्याय
हगामाकुस्त्यांची दंगल
हंगाममोसम, ऋतू, सुगी, ऐन सराई
हंगामीहंगामापुरता, तात्पुरता, हंगामाच्या वेळचा
हजरजबाबीतत्काळ उत्तर देणारा, समयसूचकता असलेला


शब्दअर्थ
क्षणकाळाचा सूक्ष्म अंश, ब्राम्हणांस श्राद्धाचे आमंत्रण देणे
क्षणबुद्धीचंचल, अस्थिर मनाचा
क्षणिकक्षणभरच टिकणारा
क्षतव्रण, जखम
क्षतीनुकसान, इजा, नाश
क्षत्रक्षत्रिय, योद्धा
क्षत्रपसिकंदराचा सुभेदार, (ग्रीक) ‘सेट्रप’
क्षपणकजैन - बौद्ध साधू, जैन किंवा बौद्ध धर्मानुयायी
क्षमसमर्थ, लायक, योग्य, जोगा (‘निर्वाहक्षम’), सोशीक
क्षमत्वलायकी, समर्थता, सोशीकपणा


शब्दअर्थ
ज्ञजाणणारा (‘शास्त्रज्ञ’)
ज्ञातमाहित, प्रसिद्ध, जाणलेला
ज्ञाताजाणणारा, तज्ञ्ज्ञ, जाणता, सुज्ञ
ज्ञातिजात, जातगोत
ज्ञानकळाज्ञानाचा प्रकाश, जाणीवकळा
ज्ञानकोशजगातील सर्व विषयांची माहिती देणारा कोश
ज्ञानचक्षुज्ञान पाहणारे डोळे - बुद्धी, ज्ञानाची दृष्टी, ज्ञान हेच ज्याचे डोळे आहेत असा
ज्ञानविज्ञानआत्माविषयक ज्ञान आणि शास्त्रीय (भौतिक) ज्ञान, अध्ययनातून मिळालेले ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान
ज्ञानीज्ञान झालेला, समजूतदार, सुज्ञ, विद्वान
ज्ञानेंद्रियवस्तूचे ज्ञान देणारे इंद्रिय (कान, नाक, डोळे, जिव्हा, त्वचा ही पाच ज्ञानेंद्रिये)


शब्दअर्थ
त्रिफणीतीन फण्या असलेली पाभर
त्रिशुद्धीखरोखर, निश्चयेकरून
त्रिस्थळीतीन ठिकाणची, ओढाताणीची - गैरसोयीची (स्थिती)
त्रुटीयत्किंचित वेळ, चुटकी, अडथळा, खंड, न्यूनता
त्रेधाओढाताण, गोंधळ, तिरपीट, गाळण, घाबरगुंडी
त्रोटकथोडक्यात असलेला, संक्षिप्त
त्वंपुराशंख, बोंब
त्वष्टत्रासदायक तगादा, उपद्रव, लचांड, तासलेले, रंधलेले
त्वष्टाविश्वकर्मा, देवांचा सुतार, सुतार जाती
त्वष्टा कासारहिंदूतील एक ज्ञाती


  सामायिक करा


सेवा सुविधा
नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,12,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,2,अभिव्यक्ती,924,अमन मुंजेकर,6,अमरश्री वाघ,2,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अर्थनीति,3,अलका खोले,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,690,आईच्या कविता,19,आईस्क्रीम,3,आकाश पवार,1,आकाश भुरसे,8,आज,12,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,13,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,9,आनंद दांदळे,8,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,16,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,26,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,3,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,11,करमणूक,43,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,7,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,1,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवसुत,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,10,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,10,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,57,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,366,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,4,तिच्या कविता,48,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,372,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,68,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धार्मिक स्थळे,1,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,7,निवडक,1,निसर्ग कविता,16,नोव्हेंबर,30,न्याहारी,41,पंचांग,6,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,301,पालकत्व,6,पावसाच्या कविता,19,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,9,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,18,पौष्टिक पदार्थ,19,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्रविण पावडे,10,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,11,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,78,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,11,बा भ बोरकर,1,बातम्या,6,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,11,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,9,भक्ती कविता,8,भरत माळी,1,भाज्या,28,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,35,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,92,मराठी कविता,534,मराठी गझल,17,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,12,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,4,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,30,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,13,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,293,मसाले,12,महाराष्ट्र,274,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,19,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,2,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,54,मातीतले कोहिनूर,14,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यश सोनार,2,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,4,रजनी जोगळेकर,4,रागिनी पवार,1,राजकीय कविता,6,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश्वर टोणे,1,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लिलेश्वर खैरनार,2,लोणची,9,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,50,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,2,विशेष,5,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,17,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शांता शेळके,1,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,10,शेती,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,21,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,37,संपादकीय,25,संपादकीय व्यंगचित्रे,16,संस्कार,2,संस्कृती,128,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,17,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,96,सायली कुलकर्णी,6,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,3,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,4,स्वाती खंदारे,300,स्वाती दळवी,6,स्वाती नामजोशी,31,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,38,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
static_page
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: मराठी शब्दकोश
मराठी शब्दकोश
मराठी शब्दकोश - [Marathi Dictionary] मराठी शब्दांचे अर्थ, वाक्यात उपयोग सोबतच मनोरंजक मराठी शब्दांचा संग्रह आणि संपूर्ण मराठी शब्दकोश.
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/p/marathi-dictionary.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/p/marathi-dictionary.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची