महाराष्ट्र

महाराष्ट्र | Maharashtra
महाराष्ट्राचा नकाशा

महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास

महाराष्ट्राच्या वैभवशाली इतिहासासह महाराष्ट्रातील साहित्य, संस्कृती, कला, सैरसपाटा अशा असंख्य विषयांस समर्पित विभाग.

महाराष्ट्र - (Maharashtra) जगप्रसिद्ध भारतवर्षातील महाराष्ट्र हे एक महान सांस्कृतिक परंपरा लाभलेले वैभवशाली राज्य आहे. गड - किल्ले, तीर्थक्षेत्रे, मंदिरे, कोरीव लेणी, नैसर्गिक सुंदर सागर किनारे, अभयारण्ये यांची रेलचेल महाराष्ट्रात पहायला मिळते. माझा महाराष्ट्र

प्रचंड धरणे त्यांचे सागरासारखे जलाशय ही येथील आधुनिक तीर्थक्षेत्रे आहेत. राज्याची सांस्कृतिक राजधानी पुणे, देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई महानगर, प्राचीन व ऎतिहासिक महत्व असलेले कोल्हापूर, मंदिरांचे शहर नाशिक, पर्यटण व औद्योगिक क्षेत्रात पुढे येत असणारे औरंगाबाद, उद्योगनगरी सोलापूर, नाथांचे पैठण, देशातील मध्यवर्ती असलेली महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर, तसेच सांगली आणि ‘वारली’ या आदिवासी चित्रकलेचे जन्म ठिकाण असलेला ठाणे जिल्हा.

अशी किती तरी ऎतिहासिक, औद्योगिक क्षेत्रात अग्रेसर असलेली शहरे महाराष्ट्रात आहेत तर अजिंठा - वेरूळ येथील लेण्यांनी महाराष्ट्राचे नाव जागतिक नकाशावर कोरले आहे.

अशा या महाराष्ट्रात अनेक नवी - जुनी पर्यटणस्थळे उदयास आली आहेत. या पर्यटणस्थळी जाऊन आपण चार घटका आनंदाचा अनुभव घ्यावा.

रमणीय निसर्गाच्या कुशीत मोकळा श्वास घेवुन ताजेतवाने व्हावे हाच उद्देश समोर ठेवुन आम्ही ‘महाराष्ट्र’ हे सदर आम्ही महाराष्ट्रातील साहित्य, कला, सैरसपाटा या आणि अशा विविध विषयांस समर्पित करीत आहोत.महाराष्ट्र विषयाचे लेखन