Loading ...

निसर्गरम्य आंबोली सिंधुदुर्ग - फोटो (हर्षद खंदारे)

निसर्गरम्य आंबोली सिंधुदुर्ग (फोटो) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील थंड हवेचे ठीकाण असलेल्या निसर्गरम्य आंबोलीचे फोटो - (Photos of Amboli - Sindhudurg).

निसर्गरम्य आंबोली सिंधुदुर्ग - फोटो (हर्षद खंदारे)

आंबोली हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे...

निसर्गरम्य आंबोली (सिंधुदुर्ग)

हर्षद खंदारे (मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते-मुख्य संपादक)

६६४ मीटर उंचीवर असलेले आंबोली हे निसर्गरम्य ठिकाण घाटमाथ्यावर असून या परिसरामध्ये सदाहरित घनदाट जंगले पसरलेली आहेत. कोल्हापूरहून आंबोली १६० किलोमीटर आहे. या जंगलात हिरडा, आईन, जाभूळ, तमालपत्र, शिकेकाई, पिसा, आंबा असे वृक्ष आहेत. तर रानडूक्कर, ससे, गवे, बिबटे, चितळ असे अनेक प्राणी दिसतात. बुलबुल, मलबार, हॉर्नबिल(धनेश), पॅराडाइज फ्लायकॅचर असे पक्षी आढळतात. कोल्हापूर-बेळगाव रस्त्यावर आंबोलीपासून १० किलोमीटर नांगरतास हा ७० फूट उंचीचा धबधबा आहे. सावंतवाडीहून ३५ किलोमीटरवर आंबोली आहे. सावंतवाडी आंबोली घाटात सावंतवाडीच्या संस्थानिकाचा राजवाडा दिसतो. हिरण्यकेशी नदीच्या उगमाजवळ हिरण्यकेशीचे मंदिर व आश्रम आहे. इथेच एक गूढ गुहा असलेले ठिकाण आहे. निसर्गरम्य आंबोली परिसरात एम.टी.डी.सी. चे रेस्ट हाऊस व खाजगी हॉटेल्समध्ये रहाण्याची सोय होऊ शकते. आंबोलीच्या पश्चिमेला महादेवगड, उत्तरेला मनोहरगड व मनसंतोषगड हे किल्ले आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर व बेळगांवहून आंबोलीपर्यंत एस.टी.ची सोय उपलब्ध आहे.
अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची