Loading ...
/* Dont copy */

महाराष्ट्र राज्याची माहिती

महाराष्ट्र राज्याची माहिती | Maharashtra State Information

महाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे


महाराष्ट्र राज्याची माहिती (महाराष्ट्र)

(Maharashtra State Information) महाराष्ट्राची जमीन प्राकृतिकदृष्ट्या एकसारखी (homogeneous) आहे व खूप मोठे क्षेत्र (महाराष्ट्र देश) पठारी आहे. डेक्कन वा दख्खन असे या पठारांना संबोधले जाते. दख्खनचा पठारी प्रदेश विविध नद्यांनी व्यापलेला आहे. महाराष्ट्राच्या पश्चिमेस व अरबी समुद्राला समांतर अशा सह्याद्री पर्वतरांगा (किंवा पश्चिम घाट) आहेत ज्यांची उंची सुमारे २१३४ मी. (अंदाजे ७,००० फूट) आहे.


कळसूबाई शिखर, अहमदनगर (महाराष्ट्र) | Kalsubai Shikhar, Ahmednagar (Maharashtra)
कळसूबाई (महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर, अहमदनगर, महाराष्ट्र. छायाचित्र: हर्षद खंदारे).

या पर्वतरांगांमधून गोदावरी, नर्मदा आणि कृष्णेसह इतरही अनेक नद्या उगम पावतात. अरबी समुद्राच्या व सह्याद्री पर्वतरांगाच्या मध्ये असलेल्या भागास कोकण म्हणतात. कोकण भागाची रुंदी ५०-८० कि.मी आहे. राज्याच्या उत्तरेस सातपुडा तर पूर्वेस भामरागड-चिरोळी-गायखुरी पर्वतरांगा आहेत. राज्यात मौसमी पाऊस पडतो. महाराष्ट्रातील काळी बेसाल्ट मृदा कापसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे.



महाराष्ट्राची मानचिन्हे


राज्य फळआंबा
राज्य प्राणीशेकरू
राज्य फूलमोठा बोंडारा / ताम्हण / तामण / जारूळ बोंद्रा / बुंद्रा
राज्य पक्षीहरियाल / हारावत
खेळकबड्डी
गीतजय जय महाराष्ट्र माझा
नृत्यलावणी

महाराष्ट्र राज्याची माहिती


निर्मिती दिवस१ मे १९६० / महाराष्ट्र दिन
राजधानीमुंबई
उपराजधानीनागपूर
राज्य भाषामराठी
अक्षांश१५°.८° उत्तर २२°.१° उत्तर
रेखांश७२°.६° पूर्व ते ८०°.९° पूर्व
चतुःसीमापूर्व छत्तीसगड, पश्चिम अरबी समुद्र, दक्षिण गोवा, कर्नाटक, आध्रं प्रदेश, उत्तर दादरा व नगरहवेली, गुजरात, मध्य प्रदेश.
क्षेत्रफळ३,०७, ७१३ चौ. किमी.
एकूण वनक्षेत्र६४०७८ चौ. किमी.
वन्यजीव सुरक्षित क्षेत्र१५,३२,१५ चौ. किमी.
पूर्व-पश्चिम लांबी८०० किमी
दक्षिणोत्तर लांबी८०० किमी.
समुद्र किनारा७२० किमी
हवामानउन्हाळा ३९° ते ४२°, हिवाळा ३४° ते १२°, पावसाळा जून ते सप्टेंबर
पर्वत रांगासातपुडा, सह्याद्री (उपरांगा: सातमाळा, अजिंठा डोंगर, हरिश्चंद्र डोंगर, बालाघाट, व महादेव डोंगर)
सर्वात उंच शिखरकळसूबाई (१,६४६ मीटर) अहमदनगर जिल्हा
महत्वाचे घाटकोकणात जाण्यासाठी सह्याद्रीवरील घाट: थळ, माळशेज, बोर, वरंधा, कुंभार्ली, आंबा, फोंडा व आंबोली घाट, पुणे - सातारा: कात्रज, खंबाटकी, पुणे – सासवड: दिवा घाट, औरंगाबाद - चाळीसगाव: औट्रम घाट
प्रमुख नद्यानर्मदा / रेवा, अमरजा, मेकलकन्या, रुद्रकन्या, तापी: (उपनद्या: पांझरा, गिरणा, मोर्णा, पूर्णा, काटेपूर्ण)
वैणगंगा: (पंच, कन्हान, वर्धा, पैणगंगा)
गोदावरी: (कादवा, प्रवरा, शिवना, सिंदफणा, मांजरा, पूर्णा, मन्याड, दुधना, प्राणहिता, इंद्रावती)
भीमा: (कुकडी, घोड, भामा, नीरा, माण, सीना)
कृष्णा: (कोयना, वेण्णा, गायत्री, येरळा, वारणा, पंचगंगा, मलप्रभा व घटप्रभा)
कोकणातील नद्या: वैतरणा, तानसा, काळू, उल्हास, आंब, सावित्री, वाशिष्ठी, शुक, गड, शास्त्री व तेरेखोल.
भारतातील स्थानमहाराष्ट्र राज्य हे भारतीय उपखंडाच्या साधारण पश्चिम-मध्य दिशेला स्थित आहे. महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळानुसार ३ रा व लोकसंखेनुसार २ रा क्रमांक लागतो.


ताजे लेखन

या आठवड्यात प्रकाशित झालेले महाराष्ट्र या विभागातील नवीन लेखन


सर्व विभाग / महाराष्ट्र / महाराष्ट्र राज्याची माहिती
विभाग -
माझा महाराष्ट्र · महाराष्ट्र राज्याची माहिती · महाराष्ट्राचा इतिहास · मराठी लोक · सैरसपाटा · मराठी संस्कृती · मराठी साहित्य · महाराष्ट्रीय कला · महाराष्ट्रीय खेळ · महाराष्ट्रीय पदार्थ · महाराष्ट्र फोटो
विषय -
मुंबई · महाराष्ट्राचा इतिहास · महाराष्ट्र

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची