शेषाचल अवतार - व्यंकटेशाची आरती

शेषाचल अवतार, व्यंकटेशाची आरती - [Sheshachal Avatar, Vyankateshachi Aarti] शेषाचल अवतार तारक तू देवा, सुरवरमुनिवर भावे करिती जनसेवा.

शेषाचल अवतार तारक तू देवा, सुरवरमुनिवर भावे करिती जनसेवा

शेषाचल अवतार तारक तू देवा ।
सुरवरमुनिवर भावे करिती जनसेवा ॥
कमळारमणा अससी अगणित गुणठेवा ।
कमळाक्षा मज रक्षुनि सत्वर वर द्यावा ॥ १ ॥

जय देव जय देव जय व्यंकटेशा ।
केवल करुणासिंधू पुरवीसी आशा ॥ ध्रु० ॥

हे निजवैकुंठ म्हणुनि ध्यातो मी तूते ।
दाखविसी गुण कैसे सकळिक लोकांते ॥
देखुनि तुझे स्वरूप सुख अद्भुत होते ।
ध्याता तुजला श्रीपति दृढ मानस होते ॥ जय० ॥ २ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.