मराठी शुभेच्छा संदेश

मराठी शुभेच्छा संदेश | Marathi Greeting Messages and Wishes for All Occasions

विविध प्रसंगांसाठी मराठी शुभेच्छा संदेशांचा मजकुर


मराठी शुभेच्छापत्रेमराठी शुभेच्छा संदेश


वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश
  • वाढदिवस हा आयुष्यातील सर्वांत खास दिवस असतो. त्यामुळे आजचा दिवस मस्तपैकी साजरा करुन धमाल उडवा. तुम्हाला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!
  • तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी आज चक्क सूर्याने देखील आपलं तेज वाढवलं आहे! तुम्हाला वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा!
  • एका विलक्षण व्यक्तिस वाढदिवसच्या अद्वितीय शुभेच्छा!
  • जगातील सर्वात दिलखुलास व्यक्तिला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!
  • आजचा हा तुमचा दिवस आनंदाचा आणि उत्सवाचा जावो आणि जीवनातील प्रत्येक क्षणी तुम्ही सुखी आणि समाधानी राहो. यासाठी तुम्हाला वाढदिवसाच्या असंख्य शुभेच्छा!
  • वयाचे आकडे कितीही वाढले, वर्षे कितीही सरली तरी आजही तुम्ही तेवढेच तरुण आणि तेजस्वी दिसत आहात! तुम्हाला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!
  • आज तुझ्यासाठी एका नवीन सुखमयी वर्षाची सुरुवात झालेली आहे. तुला वाढदिवसाच्या भरभरुन शुभेच्छा!
  • मैत्रीचं नातं काळाच्या आणि वयाच्या पलिकडे असून त्यात सर्व काही स्विकार्य असतं. आपली ही मैत्री शेवटपर्यंत अशीच टिकून राहो आणि तुझा हसरा खेळता चेहरा मला सतत बघायला मिळो! आजच्या या खास दिनी तुला माझ्याकडून अनेक-अनेक शुभेच्छा! सदैव आनंदी रहा..
  • एक खास व्यक्ती आणि आज तिचा एक खास दिवस. आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने वातावरणात आनंदच आनंद भरुन राहिला आहे! तुला आनंदाचे समाधान असेच प्रत्येक क्षणी मिळत राहो! तुला वाढदिवसाच्या प्रेमपूर्वक शुभेच्छा!
  • लहानपणीचे आपण सवंगडी आणि आज वयाने किती मोठे झालो आहोत! पण तुझ्या वयापेक्षाही मला तुझा वाढदिवसच लक्षात राहतो! पुढे कितीही मोठा झालास तरी असाच हसरा खेळता आनंदी रहा.. तुला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा!


  सामायिक करासेवा सुविधा / मराठी शुभेच्छा संदेश