Loading ...

पहाट जागी व्हायची आहे (नरेश रावताला)

पहाट जागी व्हायची आहे (मराठी लेख) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद लेखक नरेश रावताला यांचा पहाट जागी व्हायची आहे हा मराठी लेख.

पहाट जागी व्हायची आहे (नरेश रावताला)

डिजिटल व्यसनातून बाहेर पडून पहाटेच्या शांततेतून स्वतःला आणि जीवनाला पुन्हा शोधण्याचा हा विचारप्रवर्तक लेख आहे...

पहाट जागी व्हायची आहे

नरेश रावताला (धुळे, महाराष्ट्र)

या लेखात काय वाचाल
  • मोबाईल आणि समाजमाध्यमांमुळे जीवन सुलभ झाले असले, तरी त्यांचे व्यसन मानसिक व सामाजिक दुष्परिणाम घडवत आहे.
  • आपण रोजच्या धावपळीत आयुष्यातील साधे, सुंदर क्षण गमावत चाललो आहोत.
  • पहाटेची शांतता आणि निसर्गाचा सहवास मनाला स्थैर्य व सकारात्मकता देतो.
  • संतुलित डिजिटल वापर आणि स्वतःसाठी वेळ राखणे हे अधिक मानवी व सुसंवादी जीवनाचे सूत्र आहे.

आठवणींच्या गहिवरात, मानवी जीवनाच्या ताणतणावात आणि सततच्या धावपळीच्या जगण्यात शांततेचा एक क्षण शोधणेसुद्धा कठीण झाले आहे. आजच्या आधुनिक जगात आपण स्वतःसाठी वेळ देणे फारच कमी करून बसलो आहोत. मोबाईल आणि समाजमाध्यमे आपल्या जीवनातील अन्न, वस्त्र, निवारा यांच्याइतकीच आवश्यक गरज बनून गेली आहेत. त्यात इतके मग्न झालो आहोत की, आपण स्वतःच्या आणि सभोवतालच्या वास्तवाचा विचार करायलाच विसरू लागलो आहोत. सोशल मीडिया, व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांमुळे जग खूप जवळ आले आहे. माहिती लगेच मिळते, संपर्क कायम राहतो आणि जगभरातील घडामोडी आपल्या बोटांच्या टोकावर येतात. ही सोय निश्चितच फायदेशीर आहे; मात्र हळूहळू या माध्यमांचे व्यसन लागणे आपल्याला मानसिक, सामाजिक आणि शारीरिकदृष्ट्या प्रभावित करत आहे. मोबाईल फोन आता केवळ संवादाचे साधन राहिलेले नाही. तो आपले मनोरंजन, आपली ओळख, आपला सन्मान, अगदी आत्मसंतोष मोजणारे साधन बनला आहे. आपले दिवस, आपली नाती, आपले मित्र, इतकेच नव्हे तर आपल्या स्वतःच्या विचारांचाही अनुभव या स्क्रीनमध्ये हरवून जातो. मोबाईलमध्ये बोट फिरवत आपण किती वेळा घरचे जेवण विसरतो, शेजाऱ्याचा हसरा चेहरा न पाहता राहतो, पहाटेची थंड हवा अनुभवायला विसरतो, याची जाणीवच होत नाही. अनेकदा आपण आयुष्यातील ते छोटे, साधे क्षण गमावतो, जे पुढे जाऊन आठवणीतून आनंद देतात. बुद्धी सतत डिजिटल जगात अडकलेली असते, पण शरीर आणि मन मात्र वास्तवात हुक्कामारलेले असते. अनेक संशोधन सांगतात की सतत सोशल मीडियावर सक्रिय राहणे मानसिक तणाव वाढवते, आत्मविश्वास कमी करते आणि अनेकदा एकटेपणाची भावना निर्माण करते. आपण एकाच वेळी अनेक लोकांशी संपर्कात असलो, तरी खरी माणुसकी आणि खऱ्या संवादाची भावना हळूहळू कमी होत जाते. याच पार्श्वभूमीवर, पहाटे जागे होणे म्हणजे केवळ वेळेवर उठणे नाही; तर आपल्या आयुष्यातील “वास्तविक अनुभव” पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न आहे. पहाटेची शांतता, सूर्याची पहिली किरणे, पक्ष्यांचा कलरव, थंड हवा — हे सर्व नैसर्गिक घटक आपल्याला पुन्हा सजीव बनवतात. हे क्षण स्वतःशी संवाद साधायला शिकवतात, मनाला स्थिरता देतात आणि जीवनाची खरी दिशा दाखवतात. जर आपण प्रत्येक सकाळ काही मिनिटे मोबाईल न पाहता, फक्त स्वतःसाठी राखून ठेवली, तर मनातील विचार अधिक स्पष्ट होतात. कल्पनाशक्ती जागृत होते, नवीन संकल्पना उमलतात आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ही ऊर्जा दिवसभरच्या कामाला, नात्यांना आणि निर्णयांना पोषण देते. समाजमाध्यमांचा वापर पूर्णपणे थांबवावा, असा हा लेख सांगत नाही. डिजिटल साधने आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहेत आणि योग्य वापरल्यास ती अत्यंत उपयुक्त ठरू शकतात. महत्त्वाचे आहे ते संतुलन राखणे. मोबाईल वापरण्याचे वेळापत्रक ठरवणे, सोशल मीडिया ब्रेक घेणे आणि दररोज स्वतःसाठी काही क्षण राखणे — हे छोटे बदल मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करतात. आपण हळूहळू या माध्यमांचे मालक होतो, सकंर नाही. सकाळी उठून स्वतःशी बोलणे, निसर्गाशी नाते जोडणे, शांतपणे विचार करणे — हे केवळ आपले जीवन सुसंगत बनवत नाही, तर समाजालाही एक सकारात्मक संदेश देते. आपण स्वतःसाठी वेळ काढू शकलो, तर आपल्या परिवारासाठी, मित्रांसाठी आणि समाजासाठी अधिक उपस्थित राहू शकतो. समाजमाध्यमांच्या जाळ्यात अडकलेली व्यक्ती सतत स्वतःपासून दूर जात असते; पण पहाटेच्या क्षणांना जागा दिली, तर तो स्वतःला पुन्हा शोधू शकतो आणि समाजाशी अधिक वास्तविक संवाद साधू शकतो. “पहाट जागी व्हायची आहे” हे केवळ एक सवय किंवा नियम नाही; हा मानवतेचा, स्वतःच्या जीवनाचा आणि समाजाचा संदेश आहे. मोबाईल आणि सोशल मीडिया ही आपल्या जीवनातील साधने आहेत; त्यांनी आपल्यावर नियंत्रण मिळवू नये. प्रत्येक सकाळ काही मिनिटे फक्त स्वतःसाठी राखणे, निसर्गाचा अनुभव घेणे आणि मनाची शांतता शोधणे — यातून आपण स्वतःसह समाजालाही अधिक समृद्ध करू शकतो. जग वेगाने बदलत आहे; पण पहाटेची शांती आपल्याला कायम मानवतेशी जोडून ठेवते. ती जर आपण जाणीवपूर्वक अनुभवली आणि स्वीकारली, तर मोबाईल आणि समाजमाध्यमांच्या जाळ्यात अडकलेले जीवन पुन्हा माणुसकीने आणि सर्जनशीलतेने भरून निघू शकते.

नरेश रावताला यांचे इतर लेखन वाचा:

अक्षरमंच - मुक्त विचारपीठ

मराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषय सूची