Loading ...
/* Dont copy */

एसएनडीटीतील ५० विद्यार्थिनींना मोफत भोजन

पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातील ५० गरजू विद्यार्थिनींना वर्षभर दररोज मोफत पौष्टिक भोजन मिळणार आहे.

एसएनडीटीतील ५० विद्यार्थिनींना मोफत भोजन

एसएनडीटी महाविद्यालय, अनंत डिफेन्स सिस्टीम्स आणि गुडविल इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ५० गरजू विद्यार्थिनींसाठी वर्षभर दररोज मोफत पौष्टिक भोजन पुरवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे...

एसएनडीटीतील ५० विद्यार्थिनींना मोफत भोजन

हर्षद खंदारे (मराठीमाती डॉट कॉमचे निर्माते-मुख्य संपादक)

प्रस्तावना
  • पुण्यातील एसएनडीटी महाविद्यालयातील ५० गरजू विद्यार्थिनींना वर्षभर दररोज मोफत दुपारचे पौष्टिक भोजन दिले जाणार आहे.
  • या सामाजिक उपक्रमासाठी अनंत डिफेन्स सिस्टीम्स, गुडविल इंडिया आणि एसएनडीटी महाविद्यालय यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
  • या योजनेचा संपूर्ण आर्थिक भार अनंत डिफेन्स सिस्टीम्स उचलणार असून गुडविल इंडिया भोजन पुरवण्याची जबाबदारी पार पाडणार आहे.
  • दैनंदिन भोजनाची चिंता मिटल्याने विद्यार्थिनींना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करून शैक्षणिक प्रगती साधता येईल.

पुण्यातील एसएनडीटी कला आणि वाणिज्य महाविद्यालयातील ५० गरजू विद्यार्थिनींना दररोज मोफत पौष्टिक दुपारचे भोजन उपलब्ध करून देण्यासाठी अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा. लि., गुडविल इंडिया आणि एसएनडीटी महाविद्यालय या तीन संस्थांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. या उपक्रमासंदर्भातील एक वर्षाच्या सामंजस्य करारावर शनिवारी (दि. १ ऑगस्ट) अनंत डिफेन्स सिस्टीम्सचे प्रमुख चेतन धारिया, गुडविल इंडियाचे प्रमुख कालिदास मोरे आणि एसएनडीटीचे प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे यांनी स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार आजपासून पुढील एक वर्ष महाविद्यालयातील ५० गरजू विद्यार्थिनींना दररोज मोफत पौष्टिक दुपारचे भोजन दिले जाणार आहे. या भोजनाचा संपूर्ण आर्थिक भार अनंत डिफेन्स सिस्टीम्स प्रा. लि. उचलणार असून, गुडविल इंडिया ही सामाजिक संस्था विद्यार्थिनींना पौष्टिक भोजन उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पार पाडणार आहे. करार सोहळ्याला अनंत डिफेन्स सिस्टीम्सच्या वतीने संचालक गिरीश बुटाला, संचालिका लिना धारिया, दिशा धारिया आणि रुचा जोशी उपस्थित होत्या. गुडविल इंडियाच्या वतीने विश्वस्त संपदा अलाटे, अनिश मोरे, रजनी मोरे, विवेक विप्रदास आणि प्रसाद घारे उपस्थित होते. तसेच एसएनडीटीच्या वतीने उपप्राचार्या डॉ. अंजली कदम, डॉ. मृणालिनी घाटगे आणि डॉ. प्राजक्ता भडगांवकर यांनीही उपस्थिती लावली. यावेळी चेतन धारिया म्हणाले, “आज या उपक्रमाच्या निमित्ताने तीन संस्थांचा त्रिवेणी संगम झाला आहे. हा केवळ अन्नदानाचा उपक्रम नसून सामाजिक बांधिलकीचे प्रतीक आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील.” गुडविल इंडियाचे प्रमुख कालिदास मोरे म्हणाले, “गरजू विद्यार्थिनींना पौष्टिक अन्न उपलब्ध करून देण्यासाठी तीन संस्था एकत्र आल्या, ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे. अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक परिवर्तन घडण्यास मदत होते.” प्राचार्य डॉ. भरत व्हनकटे म्हणाले, “या उपक्रमामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याला निश्चितच लाभ होईल. रोजच्या जेवणाची चिंता दूर झाल्याने त्यांना अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करता येईल आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीलाही चालना मिळेल.” कार्यक्रमाच्या प्रारंभी एसएनडीटी महाविद्यालयाच्या वतीने चेतन धारिया आणि कालिदास मोरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चेतना खळे यांनी केले, तर आभारप्रदर्शन उपप्राचार्या डॉ. अंजली कदम यांनी केले.

अक्षरमंच - मुक्त विचारपीठमराठीमाती डॉट कॉमच्या मुक्त विचारपीठाचा भाग बना — लेखक, संकलक, स्वयंसेवक किंवा इंटर्न म्हणून सामील होण्यासाठी आजच नोंदणी करा.
अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची