भक्तीचीये पोटी - काकड आरती

भक्तीचीये पोटी, काकड आरती - [Bhaktichiye Poti, Kakad Aarti] भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती, पंचप्राणे जीवे भावे ओवाळू आरती.

भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती, पंचप्राणे जीवे भावे ओवाळू आरती

भक्तीचीये पोटी बोधकाकडा ज्योती ॥
पंचप्राणे जीवे भावे ओवाळू आरती ॥ १ ॥

ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा ॥
दोन्ही कर जोडुनी चरणी ठेविला माथा ॥ ध्रु० ॥ २ ॥

काय महिमा वर्णू आता सांगणे ते किती ॥
कोटि ब्रह्महत्या मुख पाहता जाती ॥ ३ ॥

विटेसहित पाउले जिवे भावे ओवाळू ॥
कोटी रवि शशि जैसे उगवले हेळू ॥ ४ ॥

राई रखुमाबाई दोघी उभ्या दो बाही ॥
मयुरपिच्छचामरे ढाळिती ठाईच्या ठाई ॥ ५ ॥

तुका म्हणे दीप घेउनी उन्मनीत शोभा ॥
विटेवरी उभा जैसा लावण्यगाभा ॥ ६ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.