मराठी भाषा संवर्धन - Marathi Bhasha Sanvardhan
मराठी भाषा संवर्धन कसे करता येईल?
- सर्वप्रथम आपल्या घरात मराठी भाषेतूनच संभाषण करावे.
- समाज माध्यमांवर किंवा इतरत्र कुठेही लेखन स्वरूपात व्यक्त होतांना आपल्या लिखाणात मराठी भाषेचा उपयोग असावा (उदा. व्हॉट्सऍप, फेसबुक, ट्विटर ई.)
- मराठी भाषेतील गाणी ऐकायला हवी.
- मराठी भाषेतील पुस्तकांचं वाचन वाढायला हवे, एखादं इंग्रजी पुस्तक जरी वाचायचे असेल तरी त्याची मराठी भाषेत भाषांतर केलेली प्रत नक्की वाचावी.
- आपल्या घरात, कार्यालयात मराठी भाषेतील पोस्टर्स किंवा भित्तीपत्रके असावी.
- आपल्या अवती भोवती रोजच्या व्यवहारात मराठी भाषा सक्तीने नव्हे तर सवयीने वापरायला हवी.
- मुलांना मराठी शाळेतून शिक्षण द्यावे.
- मुलांना मराठी गोष्टीची पुस्तके वाचायला द्यावी.
- मुलांना आपापसात मराठी भाषेतूनच संभाषण करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे.
- समोरच्या व्यक्तीला मराठी भाषा समजत असल्यास त्याच्या इतर कोणत्याही भाषेतील संभाषणाला केवळ मराठी भाषेतूनच प्रतिसाद द्यावा.
- आपल्या आवडीच्या दर्जेदार मराठी भाषेतील संकेतस्थळांना भेट द्यावी, त्यांची उपयुक्तता आणि माहिती अधिकाधिक सामायिक करावी)
- शुभेच्छा संदेश पाठवतांना संदेशाची भाषा मराठी असावी.
- आपल्या अँड्रॉईड किंवा आयफोनवर मराठी भाषेतून टंकलेखन करण्यासाठी गुगलचे Google Indic Keyboard हे ऍप असावे.
- शाळा, महाविद्यालये, शासकीय किंवा निमशासकीय ठिकाणी आवश्यक तिथे मराठीतूनच अर्ज सादर करावा.
- हॉटेल्स, दुकाने आणि खरेदीच्या ठिकाणी मराठी भाषेतूनच भाषा व्यवहार करावा.
सामायिक करा
विशेष