Loading ...
/* Dont copy */

आमच्याबद्दल – वारसा, मूल्ये आणि मराठीपण

आमच्याबद्दल – वारसा, मूल्ये आणि मराठीपण

सन २००२ पासून मराठीतून मराठीचा वारसा जपण्याची परंपरा...

स्वाती खंदारे,  स्वानंद खंदारे आणि हर्षद खंदारे
स्वाती खंदारे, स्वानंद खंदारे आणि हर्षद खंदारे

सन २००२ पासून...

मराठीमाती डॉट कॉम हे मराठी भाषेसाठी एक समर्पित आणि सर्जनशील व्यासपीठ आहे, जे भाषेच्या डिजिटल संवर्धनात आणि साहित्यिक-सांस्कृतिक जागृतीत महत्त्वाची भूमिका बजावते.

मराठीमाती डॉट कॉम हे पोर्टल मराठी भाषेचा आत्मा जपत तिला नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करत आहे, ज्यामुळे मराठी भाषेच्या भविष्यासाठी मराठीमाती डॉट कॉम चे योगदान मौलिक ठरते.

हर्षद खंदारे - Harshad Khandare

हर्षद खंदारे (निर्माते-मुख्य संपादक)

  • [accordion]
    • मोहिम
      • मराठी भाषा आणि महाराष्ट्र भुमीवर नितांत श्रद्धा आणि असिम प्रेम असणाऱ्या जगभरातील प्रत्येकासाठी सर्वोत्तम अशा मराठी साहित्याचा संग्रह उपलब्ध करून देण्यासोबतच शैक्षणिक माहितीच्या परिपूर्ण ज्ञानाचा एक प्रमुख स्त्रोत निर्माण करण्याचा मराठीमाती डॉट कॉम चा प्रयत्न असणार आहे.

    • संकेतस्थळ
      • ‘माझ्या मातीचे गायन’ या ब्रीदवाक्यासह महाराष्ट्र आणि मराठी भाषेस वाहिलेलं मराठीमाती डॉट कॉम हे एक अग्रगण्य मराठी वेब पोर्टल आहे. याची सुरुवात २७ सप्टेंबर २००२ रोजी पुणे (महाराष्ट्र, भारत) येथे झाली.
        संस्थापक हर्षद खंदारे यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना, कोथरूडमधील एका सायबर कॅफेमधून या उपक्रमाला सुरुवात केली. तेव्हापासून आजपर्यंत मराठीमाती डॉट कॉम हे ‘मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारे मराठमोळे संकेतस्थळ’ म्हणून सातत्याने कार्यरत आहे.

        या पोर्टलवर तुम्हाला –

        • मराठी भाषा आणि तिचा वारसा
        • महाराष्ट्राचा इतिहास आणि सांस्कृतिक परंपरा
        • सैरसपाटा व पर्यटन स्थळे
        • मराठी साहित्य
        • महाराष्ट्राची कला व संस्कृती

        यांसारख्या विषयांवरील समृद्ध आणि अभ्यासपूर्ण माहिती वाचायला मिळते.
        आज मराठीमाती डॉट कॉम हे केवळ एक संकेतस्थळ नसून मराठीची ओळख, संस्कृती आणि परंपरा जपणारे व्यासपीठ आहे.

        मराठीमाती डॉट कॉम (मराठी संकेतस्थळ)
        सप्टेंबर २००२ पासून सातत्याने प्रकाशित होणारे मराठी भाषेतील संकेतस्थळ.
        मराठीमाती डॉट कॉम हे जगभरातील १३६ देश, २३६३ शहरे, आशिया, अमेरिका, युरोप, ओशनिया, अफ्रिका इत्यादी खंड आणि २१ उपखंडांतून भेट दिले जाणारे मराठी भाषेतील सर्वाधिक लोकप्रिय संकेतस्थळ आहे.
        (स्त्रोत: गुगल विश्लेषण - देश · शहरे / १ जानेवारी २००५ ते ३१ डिसेंबर २०१९.)

    • मुक्त व्यासपीठ
      • मराठीमाती डॉट कॉम – अक्षरमंच : मुक्त व्यासपीठ

        मराठी साहित्यप्रेमी, कवी, लेखक आणि वाचक यांच्यासाठी अक्षरमंच हे एक मुक्त व्यासपीठ आहे. येथे प्रत्येकाला आपल्या कविता, कथा, लेख, समीक्षा किंवा अनुभव मांडण्याची संधी मिळते. मराठी भाषेचे संवर्धन आणि नवीन लेखनाला प्रोत्साहन देणे हा या मंचाचा मुख्य हेतू आहे.

        नवीन लेखकांसाठीही अक्षरमंच एक उत्तम संधी उपलब्ध करून देतो. इच्छुक लेखकांनी आपले साहित्य ईमेलद्वारे पाठविण्याची सोय येथे आहे. या प्रक्रियेमुळे अनावश्यक किंवा स्पॅम खाती टाळता येतात आणि संपादकांशी थेट संवाद साधण्याची सुविधा मिळते. अशा प्रकारे प्रत्येक सर्जनशील विचाराला योग्य वाचकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला होतो. लेखक नोंदणी करा

    • आदर्श
      • आम्हा घरी धन

        संत तुकाराम (संत तुकाराम महाराज)

        (तुकाराम गाथा - अभंग ३३९६ / तुका झालासे कळस © टी-सीरीज, १९९० स्वर: पंडित भीमसेन जोशी, संगीत: श्रीनिवास खळे)

        आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने । शब्दाचीच शस्त्रे यत्ने करु ॥ शब्दचि आमुच्या जिवाचे जीवन । शब्दे वाटू धनं जनलोका ॥ तुका म्हणे पहा शब्दचि हा देव । शब्देचि गौरव पूजा करू ॥

    • स्फूर्ती गीत
      • माझ्या मराठी मातीचा

        कुसुमाग्रज (विष्णू वामन शिरवाडकर)

        (माझ्या मराठी मातीचा, © २७ फेब्रुवारी २०१० शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेड, संगीत: कौशल इनामदार, स्वर: कल्याणी पांडे-साळुंके, कौशल इनामदार, मधुरा कुंभार, मिथिलेश पाटणकर)

        माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या दऱ्याखोऱ्यांतील शिळा हिच्या कुशीत जन्मले काळे कणखर हात ज्यांच्या दुर्दम धीराने केली मृत्यूवरी मात नाही पसरला कर कधी मागायास दान स्वर्णसिंहासनापुढे कधी लवली ना मान हिच्या गगनात घुमे आद्य स्वातंत्र्याची द्वाही हिच्या पुत्रांच्या बाहूत आहे समतेची ग्वाही माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा हिच्या संगे जागतील मायदेशातील शिळा






आमची इतर प्रकाशने

NashikDiary.com
NashikDiary.com is the Web Portal of Nashik (Maharashtra,India) the City of Temples, Search Hotels, Travel Information, Education and Places around City and District.

HindiPrabha.com
हिन्दी प्रभा भारत और हिन्दी भाषा को समर्पित वेब पत्रिका।

HarshadKhandare.com
Oficial blog of Harshad Khandare who is author, cartoonist, photographer, artist, traveler and founder of marathimati.com.

सर्व विभाग / आमच्याबद्दल विभाग - हर्षद खंदारे · स्वाती खंदारे · संपादक मंडळ · योगदानकर्ते · लेखक नोंदणी · मराठीमातीचे लेखक · संपर्क साधा · मदत पाहिजे? · नेहमीचे प्रश्न · संदर्भांची यादी · अभिप्राय द्या · अभिप्राय वाचा · मीडिया किट · मीडिया कव्हरेज · कायदेशीय माहिती · प्रताधिकार · गोपनियता धोरण · वापरण्याच्या अटी · अस्वीकरण · ब्रॅंड लोगो बोधचिन्हे धोरण
मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची