Loading ...
/* Dont copy */

मनाचे श्लोक ३१

मनाचे श्लोक - श्लोक ३१ - [Manache Shlok - Shlok 31] महासंकटी सोडिले देव जेणें, प्रतापे बळे आगळा सर्वगूणे.

मनाचे श्लोक - श्लोक ३१ | Manache Shlok - Shlok 31

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक ३१, महासंकटी सोडिले देव जेणें, प्रतापे बळे आगळा सर्वगूणे

मनाचे श्लोक - श्लोक ३१


महासंकटी सोडिले देव जेणें ।
प्रतापे बळे आगळा सर्वगूणे ॥
जयाते स्मरे शैलजा शूलपाणी ।
नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ॥ ३१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३१ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


महा संकटान्मोचिता येन देवाः
बलेन प्रतापैर्गुणैर्यो वरिष्ठः ।
स्मरत्यम्बिका शूलपाणिस्तथा यं
स नोपेक्षते रामचन्द्रः स्वभक्तम् ॥ ३१ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक - श्लोक ३१ - अर्थ


यासंबंधी श्रीसमर्थांची एक कविता आहे. ती अशी -

समीर लोटितो खडे ।
वरुण घालितो सडे ।
मयंक साउली धरी ।
मळीण पावकु हरी ॥

विधी विधीस धाकतो ।
सुरेंद्र बाग राखतो ।
करावयास निग्रहो ।
भुमंडळासि विग्रहो ॥

अखंड चाकरी करी ।
सदा वरुची भादरी ।
सटी आरंधळी दळी ।
गणेश गाढवें वळी ॥

बहु कठीण काळ हो ।
समस्त पावले मोहो ।
हिना-दिनाचिया परी ।
सदा गळीत अंतरी ॥

समस्त केंश लांबले ।
कितेक वेस्त लोंबले ।
नखें चि योग साधले ।
समस्त देव गादले ॥

अशा त्रस्त स्थितीतून महा पराक्रमी व विशेष गुण संपन्न श्रीरामाने देवांना रावणाच्या कैद मधून सोडवले.

शैल्यजा म्हणजे माता पार्वती आणि शूळपाणी म्हणजे भगवान श्रीशंकर. माता पार्वती आणि भगवान शंकर अत्यंत आदरपूर्वक व प्रेमाने श्रीरामाचे स्मरण करतात.


मनाचे श्लोक ११ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची