मनाचे श्लोक - श्लोक १

मनाचे श्लोक - श्लोक १ - [Manache Shlok - Shlok 1] गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा.
मनाचे श्लोक - श्लोक १ | Manache Shlok - Shlok 1

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १, गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा, मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा

मनाचे श्लोक - श्लोक १
गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा ।
मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा ॥
नमूं शारदा मूळ चत्वार वाचा ।
गमूं पंथ आनंत या राघवाचा ॥१॥
- समर्थ रामदास स्वामी


मनाचे श्लोक - श्लोक १ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)
गणेशोऽस्ति यः षड्गुणैश्वर्ययुक्तः
तथा शारदा या चतुर्वाक्स्वरूपा ।
प्रणम्याऽथ तौ सृष्टिनिर्माणमूलं
अनन्तं हितं राममार्गं प्रवक्ष्ये ॥१॥
- समर्थ रामदास स्वामी


मनाचे श्लोक - श्लोक १ - अर्थ
शिवगणांचा आधीश.
षड्गुणेश्वर.
गणाधीश तो ईश सर्वां गुणेंसी ।

मुळारंभ म्हणजे तो निर्गुणाचा आरंभ. निर्गुणाला जेथे सगुणत्व प्राप्त झाले ती प्रथम भूमिका.

जो कर्तुत्वास आरंभ । मूळपुरुष मुळारंभ ।
जो परात्पर स्वयंभ । आदिअंती ॥

शब्दमूळ वाग्देवता । माहं माया ॥
तींही वाचा अंतरी आलें । तें वैखरिया प्रगट केलें ।
म्हणौन कर्तुत्व जितुकें जालें ।
तें शारदागुणें ॥

“सत्यं ज्ञानं अनन्तं ब्रह्म” (पुढे श्लोक १४६ ते श्लोक १५०, श्लोक १६९, श्लोक १८४ पहा).

प्रणवरुप आद्य गणेश व शब्दमूळ शारदा यांना नमन करुन ब्रह्मस्वरुपाकार राघवाचा शाश्वत असा जो पंथ तो आपणांस कळावा अशी या श्लोकात प्रार्थना करुन मनाच्या श्लोकांचा आरंभ केला आहे; व त्या प्रार्थनेप्रमाणे शेवटी सरासरी श्लोक १८४ पासून तो अखेरपर्यंत राघवस्वरुपाचा निश्चय झाला आहे.
अभिव्यक्ती        विचारधन

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.