Loading ...

मनाचे श्लोक १७

मनाचे श्लोक १७ - समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेले मनाचे श्लोक १७. मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनि जाते [Manache Shlok 17].

मनाचे श्लोक १७ | Manache Shlok 17

समर्थ रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक मधील श्लोक १७, मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊनि जाते

मनाचे श्लोक १७


मनीं मानवा व्यर्थ चिंता वहाते ।
अकस्मात होणार होऊनि जाते ॥
घडें भोगणे सर्वही कर्मयोगे ।
मतीमंद तें खेद मानी वियोगें ॥ १७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १७ - संस्कृत रुपांतर (मनोबोधः)


जनो मूढभावेन शोचत्यपार्थं
क्षणेनैव भाव्यं भवत्येव नित्यम् ।
भवेत् कर्मणा स्वेन पुत्रादियोगो
वृथा खिद्यते तद्वियोगेऽल्पबुद्धिः ॥ १७ ॥

- समर्थ रामदास स्वामी

मनाचे श्लोक १७ - अर्थ


श्रीसमर्थांची मनाला येथे शिकवण आहे की -

सर्व कांही चिंता केली भगवंतानें ।
आपले चिंतेनें काय होते ॥

होणार तें कांही आतां पालटेना ।
तरी चिंता मना कां करीसी ॥

पूर्वसंचित आणि या जन्मातील कर्मांचे फळ मिळून जीवन जगताना जे चांगले-वाईट भोग वाट्याला येणारच आहेत, त्यांची व्यर्थ चिंता का करावी? ते तर न चुकता घडणारच आहे.

हानी मृत्य लाभ होणार जाणार ।
सर्व ही संसार संचीताचा ।
लल्लाटीं लिहिलें होउनियां गेलें ।
संचीत भोगीलें पाहिजे तें ॥

मनाविरुद्ध गोष्टी घडल्याने किंवा मृत्यूमुळे होणाऱ्या वियोगाने मनुष्य त्याबाबतीत खेद करत बसतो. अशांना समर्थांनी मतीमंदची उपमा दिली आहे.


मनाचे श्लोक १७ (व्हिडिओ)





सर्व विभाग / अभिव्यक्ती / विचारधन / मनाचे श्लोक
विभाग -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक · तुकाराम गाथा · ज्ञानेश्वरी · दासबोध · पुस्तकातून · तत्वज्ञान · चाणक्यनीति

विषय -
मराठी सुविचार · मनाचे श्लोक

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची