Loading ...

बाभुळझाड - मराठी कविता (वसंत बापट)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वसंत बापट यांची बाभुळझाड ही लोकप्रिय मराठी कविता.

बाभुळझाड - मराठी कविता (वसंत बापट)

अस्सल लाकूड, भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ


बाभुळझाड - मराठी कविता (वसंत बापट)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वसंत बापट यांची बाभुळझाड ही लोकप्रिय मराठी कविता.



अस्सल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे

देहा फुटले बारा फाटे
अंगावरचे पिकले काटे
आभाळात खुपसून बोटे
बाभुळझाड उभेच आहे

अंगावरची लवलव मिटली
माथ्यावरची हळद विटली
छाताडाची ढलपी फुटली
बाभुळझाड उभेच आहे

जगले आहे, जगते आहे
काकुळतीने बघते आहे
खांध्यावरती वरती सुताराचे
घरटे घेउन उभेच आहे

टक... टक... टक... टक...
चिटर फटर... चिटर फटक
सुतारपक्षी म्हाताऱ्याला
सोलत आहे, शोषत आहे

आठवते ते भलते आहे
उरात माझ्या सलते आहे
आत काही कळते आहे
आत फार जळते आहे

अस्स्ल लाकूड, भक्कम गाठ
ताठर कणा टणक पाठ
वारा खात गारा खात
बाभुळझाड उभेच आहे

- वसंत बापट

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची