आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती

श्रीज्ञानदेवाची आरती ज्ञानराजा, आरती - [Shri Dnyandevachi Aarti Dnyanraja, Aarti] आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा, सेविती साधुसंत, मनु वेधला माझा.
श्रीज्ञानदेवाची आरती ज्ञानराजा - आरती | Shri Dnyandevachi Aarti Dnyanraja - Aarti

आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा

आरती ज्ञानराजा ॥
महाकैवल्यतेजा ॥
सेविती साधुसंत ॥
मनु वेधला माझा ॥ ध्रु० ॥

लोपलें ज्ञान जगीं ॥
त नेणती कोणी ॥
अवतार पांडुरंग ॥
नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती ॥ १ ॥

कनकांचे ताट करीं ॥
उभ्या गोपिका नारी ॥
नारद तुंबरु हो ॥
साम गायन करी ॥ आरती० ॥ २ ॥

प्रगट गुह्य बोले ॥
विश्व ब्रह्मची केलें ॥
रामा जनार्दनीं ॥
पायीं ठकचि ठेलें ॥ आरती० ॥ ३ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.