आजचे मराठी पंचांग

आजचे मराठी पंचांग | Today's Marathi Panchang
भारतीय प्राचीन शास्त्रशुद्ध कालगणना पद्धती नुसार मराठीतून माहिती देणारे समग्र विस्तृत मराठी पंचांग.
भारतीय प्राचीन शास्त्रशुद्ध कालगणना पद्धती नुसार मराठीतून माहिती देणारे समग्र पंचांग.
भारतीय मराठी पंचांग (Marathi Panchang) भारतीय प्राचीन शास्त्रशुद्ध कालगणना पद्धती नुसार तिथी, वार, नक्षत्र, योग, करण, सुर्योदय, सुर्यास्त, शुभ-अशुभ, चंद्रराशी आणि दिनविशेष विषयी मराठीतून अचुक माहिती देणारे समग्र विस्तृत मराठी पंचांग.

आजचे पंचांग

दिनांक७ जुलै २०२२
वारगुरुवार
शक१९४४, शुभकृत्‌ संवत्सर
अयनदक्षिणायन
ऋतूग्रीष्मऋतु
मासआषाढ
पक्षशुक्लपक्ष
तिथिअष्टमी १९:२९
नक्षत्रहस्त १२:२०
योगपरिघ १०:३८
करणविष्टि ०७:४४
चंद्रराशि२४:२२ नंतर तूळ
रविराशिमिथुन
नक्षत्रपुनर्वसु
गुरुराशिमीन
शुक्रराशिवृषभ
विवरणचांगला दिवस
शास्त्रार्थदुर्गाष्टमी, भद्रा ७:४४ पर्यंत.
राशिप्रवेशराशिप्रवेश नाहीत
राहुकाल१४:२२ नंतर - १६:०१ पर्यंत
सुर्योदय०६:०६
सुर्यास्त१९:२०
दिनविशेषभारतीय क्रिकेट खेळाडू महेंद्रसिंग धोणी यांचा जन्मदिवस.

स्त्रोत: दाते पंचांग, कालनिर्णय, रुईकर पंचांग.


पंचांग म्हणजे काय?

मराठी पंचांग / हिंदू पंचांग हे फार जुन्या काळापासून भारतात प्रचलित असलेल्या हिंदू पद्धतीच्या दैनंदिन कालगणनेचे कोष्टक आहे.

भारतातील राज्याराज्यांत वेगवेगळी हिंदू पंचांगे चालत असली तरी त्यांत काही समान गोष्टी आहेत; जसे या सर्व पंचांगात दैनंदिन कालगणनेची पाच अंगे आहेत. ती म्हणजे तिथी, वार, नक्षत्र, योग व करण. या पाच अंगांची माहिती यात असते म्हणून या कोष्टकाला पंचांग म्हणतात.


पंचांग शब्दाचा अर्थ

पंचानाम् अंगानां समाहारः ।
- अर्थात ज्यात पाच अंगांचा समावेश असतो ते (पंचांग हा मुळचा ‘संस्कृत’ शब्द आहे).

पंचांगात तिथी, वार, नक्षत्र, योग व करण या पाच बाबींशिवाय आणखीही माहिती असते; जसे शक, संवस्तर, अयन, ऋतू, मास, पक्ष, राहुकाल तसेच पंचांगात ग्रहांचे योग देखील वर्तवलेले असतात.

पंचांगात नित्योपयोगी व उपयुक्त धार्मिक, खगोलशास्त्रीय व ज्योतिषींना लागणारी माहिती दिलेली असते. विवाह - मुंज मुहूर्त, वधूवरांचे गुणमेलन कोष्टक, अवकहडा चक्र, व्रते, धार्मिक सण-उत्सव, जयंती, पुण्यतिथी, यात्रा, रोजची ग्रहस्थिती, ग्रहणांची माहिती, धार्मिक कृत्यां विषयीचे निर्णय आदी गोष्टी पंचांगांत सापडतात.

पंचांगात हिंदूं व्यतिरिक्त अन्य भारतीयांच्या दैनंदिन कालगणनेची थोडक्यात दिलेली माहिती देखील असते. १०० वर्षांची परंपरा असलेले दाते पंचांग आणि कालनिर्णय दिनदर्शिका या महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय दिनदर्शिकेत देखील रोजचे पंचांग दिले जाते.

संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा