Loading ...

जागतिक महिला दिन (८ मार्च)

जागतिक महिला दिन (८ मार्च)

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करण्यात येतो


जागतिक महिला दिन (८ मार्च)

(8th March International Women's Day) महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ / ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.


नमस्कार मैत्रिणींनो,

“आजची स्त्री पुरूषाच्या खांद्याला खांदा लावून सर्व क्षेत्रात वर्चस्व गाजवत आहे” किती विरोधाभासाने भरलेले वाक्य आहे हे! आजही एका स्त्रीला तिची योग्यता, कार्यकुशलता सिद्ध करण्यासाठी पुरूषासोबत तुलनात्मक दृष्टीने बघीतले जाते.

देश स्वतंत्र झाला. पुरूषांसोबतच स्त्रीयांनाही स्वातंत्र्याचा अधिकार मिळाला. परंतु तो अधिकार केवळ नावापुरताच असल्याचे चित्र आजही आपल्याला सहज दिसुन येते. कारण आजही स्त्री-पुरुष विषमता आहे. आजच्या सोकॉल्ड स्त्री-पुरुष समानतेच्या काळात स्त्रीयांना स्वातंत्र्याचा हक्क मिळालेला दिसून येत नाही.

स्त्रीने आपल्या भावना, विचार, कौशल्य हे विविध माध्यमांतून बोलत्या करणे गरजेचे आहे. मराठीमाती डॉट कॉम चे हे मुक्त व्यासपीठ माझ्या सर्व सख्यांसाठी नेहमीच खुले असेल.

- स्वाती खंदारे
(सह-संपादिका, मराठीमाती डॉट कॉम)


जागतिक महिला दिन (८ मार्च)

दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिवस / आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो

दिनांक २८ फेब्रुवारी १९०९ रोजी, न्यूयॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला असला तरीही, सन १९१० च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.

पुरुषप्रधान व्यवस्थेतील स्त्री - पुरुष विषमतेचे एक उदाहरण म्हणजे जगभरच्या स्त्रियांना विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मतदानाचा हक्क नव्हता आणि या अन्यायाविरुद्ध स्त्रिया आपापल्या परीने संघर्ष करीत होत्या.

१९०७ साली स्टुटगार्ड येथे पहिली आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषद भरली. त्यामध्ये ‘क्लारा झेटकिन’ या अतिशय लढाऊ बाण्याच्या, झुंजार कम्युनिस्ट कार्यकर्तीने ‘सार्वत्रिक मतदानाचा हक्क मिळवण्यासाठी संघर्ष करणे हे समाजवादी स्त्रियांचे कर्तव्य आहे’ अशी घोषणा केली. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री-कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली.

८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री-कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा ‘जागतिक महिला दिन’ म्हणून क्लाराने मांडलेला ठराव पास झाला.

भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने ‘जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया ‘बोलत्या’ व्हायला लागल्या.


मराठीमाती डॉट कॉम परिवारातील ‘स्त्री’ लेखिका

लेखिका नोंदणी करा · संपर्क करा


सर्व विभाग / विशेष / जागतिक महिला दिन (८ मार्च)
विभाग -
मराठी · मराठी भाषा · मराठी भाषा संवर्धन · मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) · महाराष्ट्र दिन (१ मे) · जागतिक महिला दिन (८ मार्च) · गणेशोत्सव विशेष · पुण्याचा गणेशोत्सव · दिवाळी सण विशेष · रिस्पेक्ट झेब्रा · वारी विशेष · पर्यावरणपूरक गणेशोत्सव · मातीचा बाप्पा · माझा बाप्पा · शिवजयंती

विषय -
विशेष · मराठी · कुसुमाग्रज · तिच्या कविता · आज

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची