८ मार्च दिनविशेष

८ मार्च दिनविशेष - [8 March in History] दिनांक ८ मार्च च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
८ मार्च दिनविशेष | 8 March in History

दिनांक ८ मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


जागतिक महिला दिन - (८ मार्च) भारतात मुंबई येथे पहिला ८ मार्च हा महिला दिवस १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष' म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली. स्त्रिया ‘बोलत्या’ व्हायला लागल्या. बदलत्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीनुसार काही प्रश्नांचे स्वरूप बदलत गेले तशा स्त्री संघटनांच्या मागण्याही बदलत गेल्या. आता बँका, कार्यालयांमधूनही ८ मार्च साजरा व्हायला लागला आहे.


जागतिक दिवस
 • जागतिक महिला दिन.
 • मातृ दिन: आल्बेनिया.
 • धुम्रपान निषिद्ध दिन: युनायटेड किंग्डम.
ठळक घटना / घडामोडी
 • १६१८: योहान्स केप्लरने ग्रहभ्रमणाचा तिसरा नियम शोधला.
 • १८१७: न्यू यॉर्क शेअर बाजाराची (NYSE) स्थापना.
 • १९११: जागतिक महिला दिन पहिल्यांदा मानला गेला.
 • १९४८: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला की सरकारी शाळांमधून धर्माचे शिक्षण देणे अमेरिकेच्या संविधानाच्या विरुद्ध आहे.
 • १९४८: एअर इंडिया इंटरनॅशनल या पहिल्या भारतीय विमानवाहतूक कंपनीच्या आंतरराष्ट्रीय सेवेचे उद्घाटन
 • १९४८: फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.
 • १९५०: सोवियेत संघाने आपल्याकडे अणुबॉम्ब असल्याचे जाहीर केले.
 • २०१८: भारतीय सर्वोच्च न्यायालयाने इच्छामृत्यू कायदेशीर असल्याचे ठरविले.
जन्म / वाढदिवस
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / मार्च
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.