जय जगत्महरणा - सूर्याची आरती

जय जगत्महरणा, सूर्याची आरती - [Jai Jagatmaharna, Suryachi Aarti] जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिराणा, उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा.

जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिराणा, उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा

जय जय जगत्महरणा दिनकर सुखकिराणा ।
उदयाचल जगभासक दिनमणि शुभस्मरणा ॥
पद्मासन सुखमुर्ती सुहास्यवरवदना ।
पद्मकरा वरदप्रभ भास्वत सुखसदना ॥ १ ॥

जय देव जय देव जय भास्कर सूर्या ।
विधिहरिशंकररूपा जय सुरवरवर्या ॥ ध्रु० ॥

कनकाकृतिरथ एकचक्रांकित तरणी ।
सप्ताननाश्वभूषित रथि ता बैसोनी ॥
योजनसह्स्त्र द्वे द्वे शतयोजन दोनी ।
निमिषार्धे जग क्रमिसी अद्भुत तव करणी ॥ जय० ॥ २ ॥

जगदुद्भवस्थितिप्रलय-करणाद्यरूपा ।
ब्रह्म परात्पर पूर्ण तूम अद्वय तद्रूपा ॥
तत्त्वपदव्यतिरिक्ता अखंड सुखरूपा ।
अनन्य तव पद मौनी वंदित चिद्र्पा ॥ जय० ॥ ३ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.