Loading ...
/* Dont copy */

जय जय त्र्यंबकराज - त्र्यंबकेश्वराची आरती

जय जय त्र्यंबकराज, त्र्यंबकेश्वराची आरती - [Jai Tryambakraj, Shri Tryambakeshwarachi Aarti] जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो, त्रिशूलपाणी शंभो.

जय जय त्र्यंबकराज - त्र्यंबकेश्वराची आरती | Jai Tryambakraj - Shri Tryambakeshwarachi Aarti

जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो


त्र्यंबकेश्वराची आरती - महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक श्री शंकराचे (महादेवाचे) स्वयंभू स्थान. श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर सह्याद्रीचा एक मानबिंदू असलेल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या कुशीत नाशिक पासुन साधारण २८ कि.मी. अंतरावर स्थित आहे. श्री त्र्यंबकेश्वर येथे संपूर्ण भारतातून श्रध्दायुक्त अंत:करणाने श्री त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी, कुशावर्त तीर्थ स्नानासाठी, ब्रम्हगिरीची परिक्रमा करण्यासाठी, संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी अनेक श्राध्द विधी व सर्व रोग दु:ख, पाप नष्ट होण्यासाठी सतत भाविकांचा ओघ चालु असतो. दर बारा वर्षांनी भरणारा सिंहस्थ त्र्यंबकेश्वरमधील कुशावर्त तीर्थावर भरतो.नागा साधू हे त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य मानले जाते. त्र्यंबकेश्वरमध्ये आखाड्यांचे मठ व आश्रम आहेत. अशा या लोकप्रिय तिर्थक्षेत्र असलेल्या श्री त्र्यंबकेश्वराची आरती.



जय जय त्र्यंबकराज गिरिजानाचा गंगाधरा हो ॥
त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीचा शशिशेखरा हो ॥
वृषभारूढ फणिभुषण दशभुज पंचानन शंकरा हो ॥
विभूतिमाळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥ ध्रु० ॥

पडलें गोहत्येचें पातक गौतमऋषिच्या शिरीं हो ॥
त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरीं हो ॥
प्रसन्न हो‍उनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो ॥
औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय० ॥ १ ॥

धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं किती हो ॥
आणिकही बहु तीर्थें गंगाद्वारादिक पर्वतीं हो ॥
वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो ॥
तुझिया दर्शनमात्रें प्राणी मुक्तीतें पावती हो ॥ जय० ॥ २ ॥

ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरि घडे हो ॥
तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणीं रुपती खडे हो ॥
तंव तंव पुण्य विशेष किल्मिष अवघें त्यांचें झडे हो ॥
केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पायां पडे हो ॥ जय० ॥ ३ ॥

लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो ॥
संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ॥
शिव शिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो ॥
गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥ जय जय० ॥ ४ ॥

त्र्यंबकेश्वर संबंधी महत्त्वाचे दुवे:

अभिप्राय

तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची