नेहमीचे प्रश्न

नेहमीचे प्रश्न | FAQ
नेहमीचे प्रश्न (FAQ).
मराठीमाती डॉट कॉम च्या वाचक आणि श्रोत्यांच्या सहाय्यासाठी नेहमीच विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे.

मराठीमाती डॉट कॉम च्या वाचक आणि श्रोत्यांच्या सहाय्यासाठी नेहमीच विचारल्या जाणार्‍या प्रश्नांची उत्तरे देण्याचे प्रयत्न करतो. जर आपल्या प्रश्नांची उत्तरे येथे उपलब्ध नसतील तर कृपया आम्हाला येथे संपर्क करा किंवा info@marathimati.com वर ईमेल करा.

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

येथे कोणत्या प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे?

ऐतिहासिक लेख, संदर्भांच्या नोंदी (उदा. दिनविशेष), बालसाहित्य, पाककृती, कथा, कविता, छायाचित्रे, व्हिडिओ, ऑडिओ या आणि अशा एकुन ५३ हून अधिक विषयांचे विभागवार साहित्य मराठीमाती डॉट कॉम येथे उपलब्ध आहे. (सर्व विभाग या दुव्याच्या आधारे आपण उपलब्ध असलेले सर्व विषय पाहू शकता)

येथील साहित्य कोणत्या वयोगटासाठी आहे?

मराठीमाती डॉट कॉम वर प्रकाशित होणारे एकंदर सर्वच साहित्य हे सर्व वयोगटांतील व्यक्तींसाठी आहे, आम्ही कोणत्याही प्रकारचे अश्लील / अव्यवहारिक भाषेतील साहित्य प्रकाशित करत नाही.

बाल साहित्याचा एखादा स्वतंत्र विभाग येथे आहे का?

हो आहे. माझा बालमित्र हा जीवनशैली या मुख्य विभागातील उपविभाग आपल्याला उपयुक्त ठरेल, या विभागात लहान मुलांसाठी गोष्टी, कथा, छोट्यांचे विनोद, बालगीते, बालकविता, सामान्य ज्ञान, संस्कार आणि शालेय दिनविशेष हे साहित्य उपलब्ध आहे (या विभागातील साहित्य नियमितपणे अद्ययावत केले जाते).


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.