हर्षद खंदारे

हर्षद खंदारे - Harshad Khandare

मराठीमाती डॉट कॉमचे संस्थापक आणि मुख्य संपादक


  १९८१      पुणे, महाराष्ट्र (भारत)“रंग आणि सिमारेषा या पलिकडचा ‘महाराष्ट्र भाषा बोध’ करून देणार्‍या माझ्या चैतन्यास साभार समर्पित!”
- हर्षद खंदारे

मराठीमाती डॉट कॉम म्हणजे...
मराठी भाषेच्या प्रेमात अनेका प्रमाणे मी ही लहानपणा पासून आहेच, मराठी भाषेचं सामर्थ्य त्याची व्यापकता आणि विविधता, मराठी भाषेचं ‘अंतराळ’ तर्क - अनुमानाच्या पलीकडे असल्याचा मला जसा - जसा बोध झाला तसा - तसा या भाषेच्या कैफात मी अधिकच बुडालो आणि मराठी मन म्हणजे मराठी भाषेचं एक दालन असु शकतं, असा बोध होत असतांनाच या भाषेच्या अंतरंगात शिरण्याची मला प्रेरणा झाली. आणि म्हणुन शब्दांना पकडून मराठी भाषा कशी हे जर सांगण्याची वेळ आली तर...

अनेकांचे निराकार विचार जेथे साकार होतात, शिवाय बहू आयामी आणि ‘विश्व स्पर्शि शिल्प’ कलाकार जिच्यातून निर्माण करतात ती माझी, तुमची, सर्वांची मराठी मायबोली मी मानतो.

मराठीमाती विषयी अनेकांनी खुप काही सांगीतलेले आहे, अनेकांच्या अनेक संकल्पना आहेत, मुळात मराठीमाती हा विषय हा विषय एक खजीना आहे किंवा त्याला महासागराची उपमा देता येईल.

“भाषेच्या काठावरुन सागराच्या तळाशी आपण जीतके खोल जावु तेवढ्या प्रमाणात शब्द सामर्थ्याची आणि विविध माहितीची दौलत हाती लागेल, यावर माझा विश्वास आहे, आणि माझी ही छोटीशी बुडी माझ्या इवल्याश्या मुठीत जे काही देईल ती मुठ तुमच्या समोर उघडी करतांना मला आनंद होत आहे”.


                


हर्षद खंदारे यांचे लेखन

    हर्षद खंदारे यांचे सर्व लेखन  सामायिक करा


आमच्याबद्दल