श्यामलवर्णा षड्रिपुदमना - कृष्णाची आरती

श्यामलवर्णा षड्रिपुदमना, कृष्णाची आरती - [Shyamalvarna Shadripudamana, Krushnachi Aarti] श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूच हरी, आरति करितो बहुप्रेमाने भवभयसंकट दूर करी.

श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूच हरी, आरति करितो बहुप्रेमाने भवभयसंकट दूर करी

श्यामलवर्णा षड्रिपुदमना राधारमणा तूच हरी ।
आरति करितो बहुप्रेमाने भवभयसंकट दूर करी ॥ ध्रु० ॥

दानवदमना भूभयहरणा भक्तरक्षणा अवरतसी ।
भक्तकाजकल्पद्रुम म्हणुनी निशिदिनी ध्याती भक्त तुशी ॥
अतिविषधर जो काळा फणिवर कालिया यमुनाजलवासी ।
तत्फणिवर तू नृत्य करूनी पोचविले त्या मुक्तीसी ॥ १ ॥

कैटभ चाणुर कंसादिक हे शौर्ये वधिले अमित अरी ।
नारद तुंबर गाती सुस्वर वर्णिति लीला बहुत परी ॥
अपार महिमा श्रवण करोनी भजली त्याते मुक्त करी ।
दास तुझा दत्तात्रय नमुनी प्रार्थित अज्ञानास हरी ॥ २ ॥

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.