सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४

सात दिवस आणि सहा रात्री भाग ४ मराठी कथा - मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणाऱ्या भयकथेचा भाग ४.
सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ - मराठी कथा | Saat Diwas Aani Saha Ratri Part - 4 - Marathi Katha
सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (मराठी भयकथा), चित्र: हर्षद खंदारे.
पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयानक घटना अनुभवन्यास मिळतात व इथेच मैत्री, प्रेम आणि आयुष्याची खरी किंमत त्यांना कळते या मित्रांच्या सहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा.

नेहाला मात्र तिचा जरा संशय येतो. विवेक अजिंक्यला म्हणतो, “अजिंक्य, तू प्रार्थनाला घेऊन रूमवर जा. आम्ही येतो लगेच.” अजिंक्य प्रार्थनाला दोन्ही हातांनी उचलून वर रूमकडे घेवून जातो. तो तिला पलंगावर अलगद झोपवतो व तिथून जात असताना अचानक प्रार्थना त्याचा हात धरते व त्याला आपल्याकडे खेचून घेते आणि त्याच्याशी प्रणय करायला लागते. अजिंक्यला आता याचा फार कंटाळा आलेला असतो. तो प्रार्थनाला आपल्या पासून दूर करतो आणि रागवून म्हणतो.

“ए प्रार्थना, मी खूप थकलोय यार. प्लीज आता नको. तू अचानक अशी का वागू लागली आहेस.” अजिंक्यच्या या नकारावर प्रार्थनाच्या शरीरात असलेली ती अतृप्त आत्मा फार चिडते व अजिंक्यला एक जोराचा धक्का देते. त्या धक्यामुळे अजिंक्य समोरच्या भिंतीवर जावून आदळतो व प्रार्थना एक मोठी किंकाळी फोडते व तिचे शरीर हवेत उचलले जाते. ती आत्मा आपल्या असुरी आवाजात अजिंक्यला धमकी देते, “तू जर आता मला शरीरसुख दिले नाही तर मी या शरीराचे हाल - हाल करेन व या मुलीला ठार मारेन.” त्याचबरोबर प्रार्थनाच्या हातांची नखे मोठी होतात.

अजिंक्य बिचारा तळमळत उठतो व तीला म्हणतो, “ए प्लीज, माझ्या प्रार्थनाला काही करू नको! मी तू सांगेल ते करायला तयार आहे.” हे ऐकून ती आत्मा फार खूष होते आणि अजिंक्यसोबत खूप वेळ प्रणय करते. इकडे त्याच्या मित्रांना अजिंक्यची काळजी लागते. कारण अजिंक्य सोबत प्रार्थना जेव्हा रूमवर जात असते तेव्हा तिच्या चेहर्‍यावरील असुरी आनंद नेहाने टिपलेला असतो. अजिंक्यच्या शरीराचा पुरेपुर वापर करून झाल्यानंतर ती आत्मा आता गाढ झोपी जाते, या संधीचा फायदा घेऊन अजिंक्य तिथून अर्धमेल्या अवस्थेत बाहेर पडतो. ते थेट आपल्या मित्रांकडे जातो. आपल्या मित्रांना पाहून त्याला रडू कोसळते. अजिंक्यला त्याचे मित्र धीर देतात. तो आपल्या मित्रांना कळवळलेल्या सुरात म्हणतो, “मला वाचवा! ती कोण दुसरीच आहे.”

आता अजिंक्यला नेहा जे बोलत होती ते खरे आहे हे कळून चुकलेले असते. आपल्या मित्रांना अजिंक्य घडलेला सर्व प्रसंग सांगतो. ते ऐकून त्याचे मित्र हबकतात व अजिंक्यला घेऊन लॉजच्या बाहेर पडतात. सर्वांना एकच प्रश्न पडलेला असतो कि हे सर्व काय घडत आहे? ती आत्मा आहे कोण? अजिंक्य तर पुरता हादरलेला असतो. ते सर्वजण खूप टेंशनमध्ये असतात. तेवढ्यात त्यांना पाठीमागून एक आवाज ऎकू येतो. “मला या प्रश्नांची उत्तरे माहीत आहेत.” अचानक आलेल्या आवाजामुळे ते सर्व मागे पाहतात. तर मागे तो तरूण उभा असतो. ज्याला येथील लोक ‘वेडसर’ समजत असतात. त्याचे नाव ‘राजेश’ असते. तो वेडा नसून त्या बरोबर एक ‘भयानक प्रसंग’ घडलेला असतो व त्यामुळेच राजेशची अशी अवस्था झालेली असते. अजिंक्यची प्रश्न विचारण्याची उद्वीगता पाहून राजेश त्यांना म्हणतो, “आपण या गोष्टीवर इथे नको बोलायला हवे. इथे आपल्याला धोका आहे. येथून जवळच्या अंतरावर एक चर्च आहे. आपण तिथे जाऊया.”

त्या चौघांच्या चेहर्‍यावरून राजेशला असे वाटते कि यांचा माझ्यावर विश्वास नाही. पण तो त्यांना म्हणतो, “विश्वास ठेवा माझ्यावर. मी इथे तुमची मदत करायला आलो आहे.” राजेशचे बोलणे नेहा व अजिंक्यला पटते व ते चौघेही राजेशसोबत चर्चमध्ये जातात. चर्चमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यांची मोठी मुर्ती असते. ते पाचही जण त्या मुर्तीला नमन करतात. आता राजेश क्षणभर ही विलंब न लावता या सर्व घटनांचा खुलासा करायला लागतो. तो म्हणतो, “तुमच्या मैत्रिणीच्या शरीरात जी प्रेत आत्मा शिरलेली आहे, ती माझी पत्नी ‘प्रेरणा’ आहे.” हे ऐकून ते सर्व थक्क होतात. राजेश आता त्याच्या आयुष्यातील रहस्यांचा उलगडा करू लागतो.

“तुम्ही जशी येथे पिकनिक सेलीब्रेट करायला आला होता तसा मी देखील दोन वर्षांपूर्वी माझी पत्नी प्रेरणाला घेऊन याच दिवसात येथे हनीमून सेलीब्रेट करायला आलो होतो. प्रेरणाशी माझी ओळख कॉलेजपासून होती. आम्ही एक वर्षे लव्ह रिलेशनमध्ये होतो व नंतर आम्ही लग्नाच्या बेडीत अडकलो.”

प्रेरणा खूप सुंदर, देखणी व रोमॅंटिक होती. तिला शरीरसुखाची फार आवड होती. जशी ती सुंदर, रोमॅंटिक होती, तशीच ती फार जिद्दी व हट्टी होती. एखादी गोष्ट तिच्या मनासारखी झाली नाही तर ती स्वतःच्या जिवाचे बरेवाईट करून घ्यायला ही ती मागेपुढे पाहत नसायची व एकेदिवशी मला या गोष्टीचा अनुभव आला. त्या दिवशी आम्ही लॉंगट्रीपसाठी लोणावळ्याला जाणार होतो. व त्याच दिवशी आई - बाबांनी मला लग्नासाठी स्थळ दाखविण्याचा घाट घातला. प्रेरणा मला सतत फोन व मॅसेजेस करत होती. मी दोन्ही गोष्टींचा रिप्लाय देत नाही हे पाहून तिने तडक माझे घर गाठले. तेव्हा घरी पाहूणे आले होते. प्रेरणाने मला शेवटचा मेसेज केला. त्या मेसेजमध्ये तिने लिहिले होते कि ‘मला भेटायला आला नाही तर मी तुझ्या घरासमोर स्वतःचा जीव देईन’ तेव्हा मी फार घाबरलो व बाहेर पाहिले असता प्रेरणा गेटजवळ स्वतःच्या गळ्याला चाकू लाऊन उभी होती. मी ताबडतोब तिच्याजवळ गेलो. तिच्या हातातील चाकू बाजूला केला. तिने लगेच माझे एक चुंबन घेतले व मला मिठी मारली. हा प्रकार घरात आलेले पाहूणे व आई - बाबांनी पाहिला. लग्नाचा प्रस्ताव घेऊन आलेले पाहुणे बाबांना अपमानित करून निघून गेले. बाबांना तो अपमान सहन झाला नाही. रागाच्या भरात त्यांनी मला घरातून व इस्टेटीतून बेदखल केले. प्रेरणाचा माझ्या आयुष्यात येण्याने हा पहिला कटू प्रसंग माझ्या बरोबर घडला.

पण सर्वकाही विसरून आम्ही नव्या उमेदीने आयुष्य जगण्याचा प्रयत्न करायचे ठरवले. आम्ही दोघांनी रजिस्टर्ड मॉरेज केले व हनीमून सेलिब्रेट करायला इथे आलो. लॉज बुक केला. येथील गुलाबी थंडी व सोबत माझा प्रियकर आहे, या भावनेने प्रेरणा फार कामातुर व पुल्कित होते. एकेदिवशी ते दोघे एका पलंगावर संपूर्ण दिवस प्रणय अवस्थेत असतात. राजेश फार थकलेला असतो. पण प्रेरणाचा कामाग्नी काही शांत होत नसतो. ती पुन्हा पुन्हा राजेशसोबत लगट करू लागते. राजेश तिच्या अशा वागण्याला कंटाळून तिला दूर सारतो व प्रणयास नकार देतो. हा नकार प्रेरणाला सहन होत नाही. ती क्रोधाने तिथून उठते व आपल्या हाती येईल त्या वस्तू त्याला फेकून मारते. राजेशला तेव्हा जाणीव होते कि आपण या मुर्ख मुलीशी का लग्न केले? मी माझ्या आई वडिलांसोबत सुखी आयुष्य जगत होतो. मी त्यांचा विचार केला नाही, असे अनेक प्रश्न मला त्यावेळी सतावत होते.

तेवढ्यात प्रेरणा मला म्हणाली, “तू आज माझे समाधान केले नाहीस. तर मी स्वतःचा जीव देईन.” मी त्या परिस्थितीत फार ट्रेसमध्ये होतो. मी तिला म्हणालो, “जा, काहीही कर.” माझ्या या बोलण्यावर ती खूप दुखावली गेली व तडक रूममधून बाहेर पळत सुटली आणि काही कळायच्या आत मला तिची मोठी किंचाळी ऐकू आली. ती किंचाळी ऐकून मी रूमच्या बाहेर आलो. रात्रीचा अंधार घनदाट जंगल असल्याने प्रेरणाला समोरची मोठी दरी नजरेस पडली नाही. तिच्या साडीचा पदर झाडाच्या फांदीत अडकून तिला गळफास लागला होता. तिने तिच्या शरीरसुखाच्या हव्यासापोटी स्वतःसोबत माझे जीवन देखील कायमचे उद्धवस्त केले होते. त्यामुळे मला प्रचंड मानसिक धक्का बसला व माझी अशी अवस्था झाली.

“आता ती तुमच्या मैत्रिणीच्या शरीराचा वापर करून स्वतःची अतृप्त कामेच्छा पूर्ण करून घेत आहे व हे असेच सुरू राहिले तर एकदिवस तुम्हा दोघांचा मृत्यू देखील होवू शकतो. ती एक अतृप्त आत्मा आहे. तुमच्या दोघांचा ती खेळण्यासारखा वापर स्वतःच्या शरीराची भूक भागवत आहे. तुम्ही मेलात तरी तिला काही फरक पडणार नाही ती दुसरे शरीर शोधायला रिकामी आहे.” हा सर्व प्रकार ऐकून ते चौघेही एकदम शॉक होतात. त्यांची फार घाबरगुंडी उडते. कारण हे सर्व त्यांच्या दृष्टीने नवीन असते. तेवढ्यात त्या चर्चचे ‘फादर ’आपल्या अनुयायांसह तिथे येतात. राजेश फादर थॉमस यांना घडलेली सर्व घटना सांगतो व त्यांना हात जोडून विनंती करतो कि या भयानक परिस्थितीतून आमच्या सर्वांचे रक्षण करा. फादर त्या सर्वांना अभय देतात व म्हणतात, “ईश्वरपुढे अशा सर्व शक्तींचा नाश होतो. पण त्या शक्तीशी आपल्याला लढले तरी पाहिजेच अशा शक्तींना जेरबंद करण्याचा एक उपाय आहे. तो म्हणजे ‘एक्झॉर्सिजम’(Exorcism).

फादर त्या सर्वांना एक्झॉर्सिजमची माहिती देतात व त्यांच्या सांगण्यावरून पुढचा प्लान ठरतो. आता अजिंक्य एकटाच आपल्या रूमवर जातो. भेदरलेल्या अवस्थेत रूमचे दार उघडतो. तेव्हा प्रार्थना बिछान्यावर एका सेक्सी अवस्थेत पडलेली असते. तिच्या हातात अजिंक्यचा फोटो असतो. ती त्या फोटोवरून हात फिरवित स्माईल करत असते. दारात अजिंक्य आलेला पाहून ती ताडकन उभी राहते व त्याला म्हणते, “अजिंक्य, कुठे गेला होतास तू मला एकटीला सोडून?” तेव्हा अजिंक्यला फादर थॉमस यांचे बोल आठवतात अजिंक्यने प्रार्थनाशी तिला आवडेल अशा प्रेमळ गोड भाषेत बोलून तिला विश्वास द्यायला हवा कि ती जे म्हणेल ते तो करायला तयार आहे व अशातच त्याने तिला एक्झॉर्सिजमच्या ठरलेल्या जागेत आणायचे. ती जागा लॉजच्या ठिकाणापासून थोडे दूर आजूबजूला चार - पाच वृक्ष व मधोमध मोकळी जागा त्या मोकळ्या जागेत प्रार्थनाला आणायचे असते. अजिंक्य हे सर्व आठवत असताना प्रार्थना त्याच्या डोळ्यांसमोर चुटकी वाजवते व म्हणते, ‘हे, कुठे हरवला आहेस?’ असे म्हणून त्याच्यासोबत प्रणय करू लागते.

क्रमशः

इंद्रजित नाझरे
सभासद, मराठीमाती डॉट कॉम । इचलकरंजी, महाराष्ट्र (भारत)
कादंबरी, कथा वाचनाची आवड असणारे इचलकरंजी, कोल्हापूर येथील इंद्रजित नाझरे हे मराठीमाती डॉट कॉम येथे मराठी कथा या विभागात लेखन करतात.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

८ टिप्पण्या

  1. khup sundar.
  2. khup sundar.
  3. छान कथा आहे.
  4. छान कथा आहे.
    सर्वच भाग रंजक आहेत.
  5. छानच...
  6. छानच...
  7. छानच...
  8. कथा आवडली.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.