२४ ऑगस्ट दिनविशेष - [24 March in History] दिनांक २४ ऑगस्ट च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक २४ ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - (TEXT - TEXT) TEXT.
शेवटचा बदल २३ ऑगस्ट २०२१
जागतिक दिवस
२४ ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- -
ठळक घटना / घडामोडी
२४ ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- ७९: इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम व स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाउन नष्ट.
- १२१५: पोप इनोसंट तिसर्याने मॅग्ना कार्टा रद्द केल्याचे जाहीर केले.
- १४५६: गटेनबर्ग बायबलची छपाई संपूर्ण.
- १५११: अफोन्सो दि आल्बुकर्कने मलाक्काच्या सल्तनतीचा पाडाव केला.
- १६०८: ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत येथे उतरला.
- १६९०: कोलकाता शहराची स्थापना.
- १८१४: १८१२चे युद्ध - ब्रिटीश सैन्य अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डी.सी.मध्ये घुसले व व्हाइट हाउससह अनेक इमारतींची जाळपोळ केली.
- १८२१: कोर्दोबाचा तह - मेक्सिकोच्या स्वातंत्र्ययुद्धाची सांगता.
- १८५८: अमेरिकेच्या रिचमंड शहरात शिकल्याबद्दल ९० श्यामवर्णीय व्यक्तींना अटक करण्यात आली.
- १८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले.
- १८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेर्याचा पेटंट मिळवला.
- १९०९: पनामा कालव्याचे बांधकाम सुरू.
- १९१२: अलास्का अमेरिकेचा प्रांत झाले.
- १९२९: तुर्कस्तान व पर्शियामध्ये मैत्री करार.
- १९२९: पॅलेस्टाईनमधील वांशिक दंगलींमध्ये १०७ ज्यू व्यक्ती ठार.
- १९३१: फ्रान्स व रशियामध्ये ना-युद्ध करार.
- १९३६: ऑस्ट्रेलियन अंटार्क्टिक प्रदेश तयार करण्यात आला.
- १९४४: दुसरे महायुद्ध - दोस्त राष्ट्रांनी पॅरिसवर हल्ला केला.
- १९५०: एडिथ सॅम्पसन हा संयुक्त राष्ट्रात जाणारा पहिला कृष्णवर्णीय अमेरिकन प्रतिनिधी ठरला.
- १९५४: अमेरिकेत कम्युनिस्ट पक्षावर बंदी.
- १९५४: ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्ष गेतुलियो दोर्नेलेस व्हार्गासने आत्महत्या केल्यावर होआव काफे फिल्हो राष्ट्राध्यक्षपदी.
- १९६०: व्होस्तोक, अंटार्क्टिका येथे जगातील सगळ्यात कमी तपमान (-८८ सेल्शियस) नोंदले गेले.
- १९६६: विक्रमवीर भारतीय जलतरणपटू मिहीर सेन यांनी जिब्राल्टरची सामुद्रधुनी पोहून पार केली.
- १९६६: रशियाचे लुना-११ हे मानव विरहित यान चांद्र मोहिमेवर निघाले.
- १९६८: फ्रांसने हायड्रोजन बॉम्बचा स्फोट घडवला.
- १९९१: मिखाईल गोर्बाचोव्हने सोवियेत युनियनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
- १९९१: युक्रेनला सोवियेत संघापासून स्वातंत्र्य.
- १९९२: चीन व दक्षिण कोरियाने राजनैतिक संबंध पुनःप्रस्थापित केले.
- १९९२: हरिकेन ॲंड्रु हे कॅटेगरी ५चे वादळ फ्लोरिडाच्या किनार्यावर आले.
- १९९५: मायक्रोसॉफ्टने विन्डोज ९५ ही संगणकप्रणाली प्रकाशित केली.
- २००१: एर ट्रॅन्सॅट फ्लाइट २३६ हे एरबस ए३३० प्रकारचे विमान इंधन संपल्यामुळे एझोर्स द्वीपांवर उतरले.
- २००४: मॉस्कोच्या दॉमोदेदोवो आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन निघालेली दोन विमाने आत्मघातकी हल्लेखोरांच्या बॉम्बहल्ल्यात नष्ट. शेकडो ठार.
- २००६: आंतरराष्ट्रीय खगोल संघाने प्लुटो हा ग्रह नसल्याचे ठरवले.
जन्म / वाढदिवस / जयंती
२४ ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८३३: नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद (गुजराथी लेखक समाजसुधारक, मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६).
- १८७२: न. चिं. केळकर (केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद, मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७).
- १८८०: बहिणाबाई चौधरी (निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री, मृत्यू: ३ डिसेंबर १९५१).
- १८८८: बाळ गंगाधर खेर (स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री, मृत्यू: ८ मार्च १९५७).
- १८८८: वेलेंटाइन बेकर (मार्टिन बेकर एरिक कंपनी चे सहसंस्थापक, मृत्यू: १२ सप्टेंबर १९४२).
- १९०८: शिवराम हरी राजगुरू (क्रांतिकारक, मृत्यू: २३ मार्च १९३१).
- १९१७: पं. बसवराज राजगुरू (किराणा घराण्याचे गायक, मृत्यु: २१ जुलै १९९१).
- १९१८: सिकंदर बख्त (केंद्रीय परराष्ट्रमंत्री, मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४).
- १९२७: हॅरी मार्कोवित्झ (नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ).
- १९२७: अंजली देवी (भारतीय अभिनेत्री आणि निर्मात्या, मृत्यु: १३ जानेवारी २०१४).
- १९२९: यासर अराफत (नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाइनचे नेते, मृत्यू: ११ नोव्हेंबर २००४).
- १९४४: संयुक्ता पाणिग्रही (ओडीसी नर्तिका, मृत्यू: २४ जून १९९७).
- १९४५: विन्स मॅकमेहन (डब्ल्यू.डब्ल्यू.ई. (WWE) चे सहसंस्थापक).
- १९४७: पाउलो कोएलो (ब्राझीलियन लेखक).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
२४ ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९२५: सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर (संस्कृत पंडित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक, जन्म: ६ जुलै १८३७).
- १९६७: हेन्री जे. कैसर (कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियम चे संस्थापक हेन्री जे. कैसर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८२).
- १९९३: दि. ब. देवधर (क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू, जन्म: १४ जानेवारी १८९२).
- २०००: कल्याणजी वीरजी शहा (कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू, जन्म: ३० जून १९२८).
- २००८: वै वै (चिनी भाषेमधील कवी, लेखक, पत्रकार, जन्म: १६ जानेवारी १९२०).
- २०१९: अरुण जेटली (भारताचे केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते, जन्म: २८ डिसेंबर १९५२).
दिनविशेष ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |
अभिप्राय