दिनांक १० ऑगस्ट च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
TEXT - (TEXT - TEXT) TEXT.
शेवटचा बदल ८ ऑगस्ट २०२१
जागतिक दिवस
१० ऑगस्ट रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- स्वातंत्र्य दिन: इक्वेडोर.
ठळक घटना / घडामोडी
१० ऑगस्ट रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १५१९: फर्डिनांड मॅगेलन पाच जहाजे घेऊन पृथ्वी-प्रदक्षिणेसाठी निघाला.
- १६७५: चार्ल्स (दुसरा) याने ग्रीनीच येथील जगप्रसिद्ध वेधशाळेचा (Royal Observatory) शिलान्यास केला.
- १६८०: न्यू मेक्सिकोत पेब्लो क्रांती सुरू.
- १७९२: फ्रेंच क्रांती - राजा लुई सोळाव्याला अटक..
- १८०९: इक्वेडोरची राजधानी क्विटोने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
- १८१०: स्मिथसोनियन इन्स्टिट्युशन ची स्थापना झाली.
- १८२१: मिसुरी अमेरिकेचे २४वे राज्य झाले.
- १८४६: जेम्स स्मिथसनच्या ५,००,००० डॉलरच्या देणगीने स्मिथसॉनियन इंस्टीट्युटची स्थापना.
- १९१३: दुसरे बाल्कन युद्ध-बुखारेस्टचा तह - युद्धाचा अंत.
- १९२०: पहिले महायुद्ध-सेव्ह्रेसचा तह - दोस्त राष्ट्रांनी ऑट्टोमन साम्राज्य आपसांत वाटून घेतले.
- १९८८: दुसर्या महायुद्धात बेकायदेशीरपणे बंदिवासात टाकलेल्या जपानी वंशाच्या अमेरिकन नागरिकांना अमेरिकेने प्रत्येकी २०,००० डॉलर देण्याचे कबूल केले.
- १९९०: मॅगेलन अंतराळयान शुक्र ग्रहावर पोचले.
- १९९९: औषधांच्या दुकानांत विकल्या जाणार्या औषधांत प्राणिज पदार्थ असल्यास त्याचा उल्लेख वेष्टणावर करणे अनिवार्य असल्याचा केंद्रसरकारच्या सामाजिक न्याय खात्याचा निर्णय.
- १९९९: इंडियन फिजिक्स असोसिएशन तर्फे देण्यात येणारा डॉ. मो. वा. चिपळोणकर स्मृती पुरस्कार डॉ. निवास पाटील व डॉ. प्रकाश तुपे यांना जाहीर.
- २००६: युनायटेड किंग्डमची गुप्त पोलिस संस्था स्कॉटलंड यार्डने इंग्लंडहून अमेरिकेला जाणारी विमाने नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळून लावला.
जन्म / वाढदिवस / जयंती
१० ऑगस्ट रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १७५५: नारायणराव पेशवा (५ वे पेशवा, मृत्यू: ३० ऑगस्ट १७७३).
- १८१०: कॅमिलो बेन्सो (इटलीचे पहिले पंतप्रधान, मृत्यू: ६ जून १८६१).
- १८१४: हेनरी नेस्ले (नेस्ले कंपनी चे संस्थापक, मृत्यू: ७ जुलै १८९०).
- १८५५: उस्ताद अल्लादियाँ खाँ (जयपूर – अत्रौली घराण्याचे संस्थापक व कोल्हापूर दरबारचे प्रसिद्ध गायक गान सम्राट, मृत्यू: १६ मार्च १९४६).
- १८६०: पं. विष्णू नारायण भातखंडे (संगीतशास्त्रकार, हिन्दुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक, मृत्यू: १९ सप्टेंबर १९३६).
- १८७४: हर्बर्ट हूव्हर (अमेरिकेचे ३१ वे राष्ट्राध्यक्ष, मृत्यू: २० ऑक्टोबर १९६४).
- १८८९: चार्ल्स डॅरो (मोनोपोली खेळाचे निर्माते, मृत्यू: २८ ऑगस्ट १९६८).
- १८९४: व्ही. व्ही. गिरी (भारताचे चौथे राष्ट्रपती, लोकसभा सदस्य आणि केंद्रीय मंत्री, मृत्यू: २३ जून १९८०).
- १९०२: नॉर्मा शिअरर (कॅनेडियन - अमेरिकन अभिनेत्री, मृत्यू: १२ जून १९८३).
- १९१३: डॉ. अमृत माधव घाटगे (संस्कृत व प्राकृत विद्वान, मृत्यू: ८ मे २००३).
- १९३३: किथ डकवर्थ (कोसवर्थ कंपनी चे संस्थापक, मृत्यू: १८ डिसेंबर २००५).
- १९४३: पारू शफकत राणा (भारतीय - पाकिस्तानी क्रिकेट).
- १९५६: पेरीन वॉर्सी (भारतीय - इंग्रजी उद्योगपती).
- १९६०: देवांग मेहता (भारताच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व आणि नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्विस कंपनीज (NASSCOM) चे अध्यक्ष, मृत्यू: १२ जुलै २००१).
- १९६३: फुलन देवी (भारतीय राजकारणी, (मृत्यू: २५ जुलै २००१).
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
१० ऑगस्ट रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १९५०: खेमचंद प्रकाश (संगीतकार, जन्म: १२ डिसेंबर १९०७).
- १९८२: मनाली कल्लट तथा एम. के. वैणू बाप्पा (भारतीय खगोलशास्त्रज्ञ, जन्म: १० एप्रिल १९२७).
- १९८६: अरुणकुमार वैद्य (महावीरचक्र प्राप्त जनरल, जन्म: २७ जानेवारी १९२६).
- १९९२: शंकरराव पांडुरंगराव (पाटील) तथा एस. पी. पी. थोरात (कीर्तिचक्र, पद्मश्री लेफ्टनंट जनरल).
- १९९९: आचार्य बलदेव उपाध्याय (भारतीय इतिहासकार, विद्वान आणि समीक्षक, जन्म: १० ऑक्टोबर १८९९).
- २०१२: सुरेश दलाल (साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गुजराथी कवी, लेखक आणि संपादक, जन्म: ११ ऑक्टोबर १९३२).
दिनविशेष ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |