बोगदा मराठी चित्रपटाचे पोस्टर

बोगदा या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन, चित्रपट - [Bogda Marathi Movie Poster Launch, Movie].
बोगदा मराठी चित्रपटाचे पोस्टर

मुलगी आणि आईच्या नात्यातील वैविध्यपूर्ण पैलू उलगडणारा बोगदा

मुलगी आणि आईच्या नात्यातील वैविध्यपूर्ण पैलू उलगडणाऱ्या ‘बोगदा’ या आगामी मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच सोशल नेटवर्कींग साईटवर प्रकाशित करण्यात आले आहे.

‘निशिता केणी’ लिखित आणि दिग्दर्शित या सिनेमात अभिनेत्री ‘मृण्मयी देशपांडे’ आणि ज्येष्ठ अभिनेत्री ‘सुहास जोशी’ यांची प्रमुख भूमिका आहे.

बोगदा या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे प्रकाशन - चित्रपट | Bogda Marathi Movie Poster Launch - Movie
बोगदा या मराठी चित्रपटाचे पोस्टर

मायलेकीच्या नात्यामधला भावबंध मांडणारा हा सिनेमा येत्या ७ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

‘व्हिसलिंग वूड्स’ च्या शिलेदारांच्या मेहनतीतून साकार झालेल्या या ‘बोगदा’ चित्रपटाचे ‘नितीन केणी’ प्रस्तुतकर्ते असून, दिग्दर्शिका ‘निशिता केणी’ सोबत ‘करण कोंडे’, ‘सुरेश पानमंद’, ‘नंदा पानमंद’ या तिकडींनी सिनेमाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.


बोगदाटिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.