
ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर) यांची प्रसिद्ध कविताकणामराठीमाती डॉट कॉम चे वाचक आणि प्रसिद्ध छायाचित्रकार योगेश कर्डिले यांच्या आवाजात.
ओळखलत का सर मला? पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती पाहून गंगामाई पाहुणी आली, गेली घरट्यात राहुन माहेरवाशिणीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी, बायको मात्र वाचली भिंत खचली, चूल विझली, होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यांवरती पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेउन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे, चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोत सर, जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्त लढ म्हणा!
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा