Loading ...
/* Dont copy */

मराठी भाषा गौरव दिन - निमित्त (चैताली गिते)

मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद लेखिका श्रीमती चैताली गिते (मराठा हायस्कूल, नाशिक) यांचा मराठी भाषा गौरव दिन हा मराठी लेख.

मराठी भाषा गौरव दिन - निमित्त (चैताली गिते)

मराठी भाषा गौरव दिन हा मातृभाषेच्या अभिमान, जतन आणि संवर्धनाची जाणीव करून देणारा दिवस आहे...

मराठी भाषा गौरव दिन

श्रीमती चैताली गिते (मराठा हायस्कूल, नाशिक)

या लेखात काय वाचाल

• मराठी भाषा गौरव दिन २७ फेब्रुवारी रोजी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. • मराठी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरेचा मूलाधार आहे. • जागतिकीकरणाच्या काळात तिच्यासमोर अनेक आव्हाने उभी आहेत. • भाषेचे जतन व संवर्धन हे प्रत्येक नागरिकाचे सामूहिक कर्तव्य आहे.

मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी परिश्रम घेतले आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. कुसुमाग्रजांची मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. मराठी भाषेच्या गौरवाचा, आत्मपरीक्षणाचा आणि भाषिक कर्तव्याची जाणीव करून देणारा हा दिवस असतो. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेचा, वैचारिक परंपरेचा आणि सामाजिक जाणिवेचा मुलाधार आहे. मराठी भाषेची परंपरा अत्यंत समृद्ध आणि व्यापक आहे. संत ज्ञानेश्वर यांच्या ओवींपासून ते संत तुकाराम यांच्या अभंगांपर्यंत, शाहिरी व पोवाड्यांपासून आधुनिक काव्य-नाटकांपर्यंत मराठीने काळानुरूप आपले रूप विकसित केले आहे. या भाषेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, राष्ट्रभक्ती, सामाजिक समता आणि मानवी मूल्यांचा पुरस्कार झाला. त्यामुळे मराठी भाषा ही भावनांचीच नव्हे तर विचारांची, विवेकाची आणि परिवर्तनाची भाषा ठरली आहे. आजच्या जागतिकीकरणाच्या काळात मराठी भाषेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत. इंग्रजी आणि इतर परकीय भाषांचा वाढता प्रभाव, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील मराठीचा मर्यादित वापर आणि दैनंदिन व्यवहारातील भाषिक दुर्लक्ष यामुळे मातृभाषेची उपेक्षा होताना दिसते. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त या वास्तवाकडे आपण सर्वांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. मराठी भाषेचा गौरव केवळ लिहिण्यापुरता, घोषणा देण्यापुरता किंवा कार्यक्रमांपुरता मर्यादित न राहता तो प्रत्येक नागरिकाने प्रत्यक्ष कृतीत उतरवला पाहिजे. मराठी भाषेचे खरे जतन व संवर्धन तिच्या नियमित आणि शुद्ध वापरानेच होणार आहे.

विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)
विष्णू वामन शिरवाडकर (कुसुमाग्रज)

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध कवी विष्णू वामन शिरवाडकर हे आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असलेले लेखक मानले जातात. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळविणारे ते दुसरे साहित्यिक होते. म्हणूनच त्यांच्या जन्मदिवशी मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. नवीन पिढीत मराठी वाचनाची सवय, लेखनाची आवड आणि भाषेबद्दलचा आत्मसन्मान निर्माण करणे ही आपली सर्वांचीच सामूहिक जबाबदारी आहे. भाषा टिकते ती बोलणाऱ्यांच्या निष्ठेमुळे आणि वापरणाऱ्यांच्या जाणिवेमुळे. मराठी भाषा गौरव दिन हा केवळ उत्सवाचा दिवस नसून तो आपल्या कर्तव्याची आठवण करून देणारा दिवस आहे. मराठी भाषा जपणे, तिचे संवर्धन करणे, तिचा वारसा जपणे आणि तिचे जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते — “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.” मराठीचा अभिमान शब्दांत न राहता आचरणात उतरला तरच मराठी भाषेचा खरा गौरव साध्य होईल. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये मराठी गायन, वादन, वक्तृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाते. मराठी भाषेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला जातो. ज्या मायबोलीत आपण जन्मलो आणि ज्या मायबोलीने आपल्याला घडविले, त्या मायबोलीचा आदर आपण केलाच पाहिजे. ही मूल्ये विद्यार्थ्यांमध्येही रुजवली पाहिजेत. मराठी भाषेचे संवर्धन व जतन हे आपले आद्य कर्तव्य आहे, हे आपण नेहमी लक्षात ठेवले पाहिजे आणि ते येणाऱ्या पिढीलाही समजावून सांगितले पाहिजे. “माझ्या मराठीची बोलू कौतुके । परी अमृतातेही पैजासी जिंके । ऐसी अक्षरे रसिक मिळविण ॥” असे लिहून संत ज्ञानेश्वर म्हणतात की मराठी भाषेचा गोडवा हा अमृतापेक्षाही अधिक आहे.

श्रीमती चैताली गिते यांचे इतर लेखन वाचा:

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची