२७ फेब्रुवारी दिनविशेष - [27 February in History] दिनांक २७ फेब्रुवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक २७ फेब्रुवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज - (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो.
जागतिक दिवस
- जागतिक मराठी भाषा दिवस (कुसुमाग्रजांचा जन्म दिन)
- स्वातंत्र्य दिन: डॉमिनिकन प्रजासत्ताक.
- १८५४: झांसी संस्थान ईस्ट इंडिया कंपनीने ताब्यात घेतले. गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने झांसी संस्थानचे प्रमुख राजे गंगाधरराव नेवाळकर यांनी घेतलेला दत्तक नामंजूर केला. याचा धक्का बसून गंगाधररावांचे निधन झाले. राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध लढण्याचे ठरवले.
- १८७९: सॅकेरिन या साखरेसारख्या मानवनिर्मित गोड पदार्थाचा शोध.
- १९९८: मुंबईत कांदिवली व विरार रेल्वे स्टेशनमध्ये बॉम्बस्फोट. ३ ठार .
- २००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.
- २००२: गुजरातच्या गोधरा रेल्वे स्थानकात साबरमती एक्सप्रेसला आग लावण्यात आली. ५८ यात्रेकरू ठार. या घटनेचा सूड म्हणून उसळलेल्या जातीय दंग्यांमध्ये १,००० हून अधिक व्यक्तींचे प्राण गेले.
- २०१०: चिलीमध्ये रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.८ तीव्रतेचा भूकंप.
- १८६०: वैजनाथ काशिनाथ राजवाडे, वैदिक वाङ्मयाचे अभ्यासक.
- १८८२: विजय सिंह पथिक, राजस्थानचे प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी.
- १९०५: शं. रा. हातवळवणे, भाषाविषयक लेखक.
- १९१२: विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज, मराठी कवी, नाटककार. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार.
- १९२६: ज्योत्स्ना देवधर, मराठी व हिंदी लेखिका.
- १९८६: संदीप सिंग, भारतीय हॉकी खेळाडू.
- १९३१: चंद्रशेखर आझाद, थोर क्रांतिकारक.
- १९५६: गणेश वासुदेव मावळणकर, भारतीय वकील आणि राजकारणी.
- १९७६: के. सी. रेड्डी, कर्नाटकचे प्रथम मुख्यमंत्री तथा मध्य प्रदेशचे भूतपूर्व राज्यपाल
- १९८७: अदि मर्झबान, अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक.
- १९९७: श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीवर, गीतकार.
- २०१०: नानाजी देशमुख, भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते.
- २०१७: प्रा. डॉ. अंजली रॉय.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / फेब्रुवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #फेब्रुवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ |
अभिप्राय