Loading ...
/* Dont copy */

मराठी भाषा दिवस

मराठी भाषा गौरव दिन - २७ फेब्रुवारी | 27th February - Marathi Bhasha Gaurav Din

मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)

मराठी साहित्याचा मानदंड ‘वि. वा.शिरवाडकर’ यांचा जन्मदिवस - ‘२७ फेब्रुवारी’ अर्थात ‘मराठी भाषा गौरव दिन’ (Marathi Bhasha Gaurav Din). मराठी भाषा दिवस (Marathi Bhasha Diwas) जागतिक मराठी भाषा दिवस / मराठी भाषा दिन / मराठी भाषा गौरव दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जातो.


मराठी भाषा गौरव दिन (वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस - २७ फेब्रुवारी).


मराठी राजभाषा दिन: मराठी भाषा दिन / मराठी राजभाषा दिन हा दिवस १ मे रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो.
मराठी राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे दोन्ही दिवस वेगवेगळे असून मराठी भाषेसंदर्भातील महत्त्वाचे आहेत.

कुसुमाग्रज / विष्णू वामन शिरवाडकर - (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. हे एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार होते. वि. वा. शिरवाडकर हे कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन करायचे. कुसुमाग्रजांचा जन्म २७ फेब्रुवारी १९१२ रोजी पुणे जिल्ह्यात झाला. मात्र नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील शिरवाडे हे गाव त्यांचे जन्मगाव म्हणूनच ओळखले जाते.

जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह आहेत. विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी त्यांची गाजलेली नाटके आहेत.

१९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.



मराठी भाषा गौरव दिन (महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे)


  • [accordion]
    • मराठी भाषा गौरव दिन कोणाचा जन्मदिवस आहे?
    • मराठी राजभाषा दिन केव्हा साजरा केला जातो?
      • १ मे रोजी ‘मराठी राजभाषा दिन’ महाराष्ट्रभर साजरा केला जातो.

    • मराठी भाषा कोणत्या लिपीत लिहिली जाते?
      • मराठी भाषा देवनागरी लिपीत लिहिली जाते.

        नागरी लिपी हि एक प्रसिद्ध भारतीय लिपी आहे. महाराष्ट्रात या लिपीचे ‘देवनागरी लिपी’ असेही एक नाव विशेष रूढ आहे. दहाव्या शतकाच्या आरंभी अखिल भारतात थोड्याफार फरकाने या लिपीचा अंगीकार केलेला आढळून येतो. आठव्या शतकापासून दहाव्या शतकापर्यंत ‘सिद्धमातृका लिपी’ किंवा ‘कीलकशीर्षक लिपी’ चे हळूहळू नागरी लिपीत रूपांतर होऊ लागले.

    • कुसुमाग्रज कोण होते?
    • कवी कुसुमाग्रज यांचा पहिला काव्यसंग्रह कोणता?
      • जीवनलहरी हा कुसुमाग्रजांचा पहिला काव्यसंग्रह.

        झंकारूनि अव्याहत तात तुटे वीणेवर, हौनिया खिन्न जणू कोसळुनी पडती स्वर! घेता मधु गन्ध जरी कोमेजत कुसुम करी जीवन, तव सुन्दरता सुन्दर होण्यात सरे!

        - कुसुमाग्रज (जीवनलहरी).

    • मराठी भाषा गौरव दिन केव्हा साजरा केला जातो?
      • दर वर्षी २७ फेब्रुवारी रोजी म्हणजेच कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो.

    • जागतिक मातृभाषा दिन केव्हा साजरा केला जातो?
    • कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त कोणता दिन साजरा केला जातो?
      • कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो.


माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा


माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या
दऱ्याखोऱ्यांतील शिळा

हिच्या कुशीत जन्मले
काळे कणखर हात
ज्यांच्या दुर्दम धीराने
केली मृत्यूवरी मात

नाही पसरला कर
कधी मागायास दान
स्वर्णसिंहासनापुढे
कधी लवली ना मान

हिच्या गगनात घुमे
आद्य स्वातंत्र्याची द्वाही
हिच्या पुत्रांच्या बाहूत
आहे समतेची ग्वाही

माझ्या मराठी मातीचा
लावा ललाटास टिळा
हिच्या संगे जागतील
मायदेशातील शिळा

- कुसुमाग्रज
माझ्या मराठी मातीचा (© २७ फेब्रुवारी २०१० शेमारू एंटरटेनमेंट लिमिटेड)
संगीत: कौशल इनामदार, स्वर: कल्याणी पांडे-साळुंके, कौशल इनामदार, मधुरा कुंभार, मिथिलेश पाटणकर


मराठी भाषा गौरव दिन (पोस्टर्स / भित्तीचित्रे)


मराठी भाषा गौरव दिन संबंधी महत्त्वाचे दुवे:







सर्व विभाग / विशेष / मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)
विभाग -
मराठी · मराठी भाषा · मराठी भाषा संवर्धन · मराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी) · महाराष्ट्र दिन (१ मे) · जागतिक महिला दिन (८ मार्च) · गणेशोत्सव विशेष · पुण्याचा गणेशोत्सव · दिवाळी सण विशेष · रिस्पेक्ट झेब्रा · वारी विशेष · पर्यावरणपूरक गणेशोत्सव · मातीचा बाप्पा · माझा बाप्पा · शिवजयंती

विषय -
विशेष · मराठी

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची