१० मार्च दिनविशेष - [10 March in History] दिनांक १० मार्च च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक १० मार्च च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
सावित्रीबाई फुले - (१२ जानेवारी १८३१ - १० मार्च १८९७)या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती जोतिराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपलया नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला.काही क्रूर रूढींनाही त्यांनी आळा घातला.पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही सावित्रीबाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ‘गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.सावित्रीबाईंच्या सामजिक कार्याबद्दल कृतज्ञता म्हणून १९९५ पासून ३ जानेवारी हा सावित्रीबाईचा जन्मदिन हा ‘बालिकादिन’ म्हणून साजरा केला जातो.
जागतिक दिवस
- -
- १८४९: अब्राहम लिंकन यांचा पेटंट साठी अर्ज; अमेरिकन राष्ट्रपतींचा पहिलाच असा अर्ज.
- १८६२: अमेरिकेत सर्वप्रथम कागदी चलनांची अर्थात नोटांची सुरूवात.
- १८७६: पहिला दूरध्वनी संपर्क अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल ने थॉमस वॅटसन शी संपर्क साधला.
- २०१७: ‘वॉटर जेट फास्ट अॅटेक क्राफ्ट’ प्रकारातील आयएनएस तिल्लनचांग नावाच्या जहाजाला भारतीय नौदलात दाखल करण्यात आले. कर्नाटकातील कारवार येथील नौदलाच्या मुख्यालयात हा समारंभ झाला. व्हाईस अॅडमिरल गिरीश लुथरा यांनी तिल्लनचांगला नौदलाच्या ताफ्यात सामील केले.
- १६२८: कॉन्स्टॅन्टाईन हायगेन्स, जुनियक, डच कवि, चित्रकार, व्यंगचित्रकार.
- १८१२: विक्टर तेश, बेल्जियन वकील व कायदा मंत्री.
- १८९७: सावित्रीबाई फुले, शिक्षणप्रसारक, समाजसुधारक, कवयित्री.
- १९५७: ओसामा बिन लादेन, अल कायदा नामक इस्लामी मूलतत्त्ववादी संघटनेचा संस्थापक.
- १८७२: ज्युसेप्पे मॅझिनी, इटालियन राजकारणी.
- १९१३: हॅरियेट टबमन, अमेरिकन क्रांतिकारी.
- १९४२: विल्यम हेन्री ब्रॅग, नोबेल पारितोषिक विजेता इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ.
- १९८४: आय. एस. जोहर (इंदरसेन जोहर) हिंदी चित्रपट अभिनेता, लेखक, निर्माता व दिग्दर्शक.
- १९९८: लॉईड ब्रिजेस, अमेरिकन अभिनेता.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / मार्च | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |
अभिप्राय