यशवंतराव चव्हाण - (१२ मार्च १९१३ - २५ नोव्हेंबर १९८४) हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांनी काही काळ भारताचे उपपंतप्रधान म्हणून काम केले होते. तर काही काळ ते भारताचे संरक्षणमंत्री सुद्धा होते. यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचा जन्म १२ मार्च १९१३ रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी झाला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ते ओळखले जातात. ते प्रागतिक विचारसरणीचे होते. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ख्याती आहे. ते रसिक व साहित्यिकही होते. ‘युगांतर’, ‘सह्याद्रीचे वारे’, ‘कृष्णाकाठ’, ‘ऋणानुबंध’ ही त्यांची साहित्यसंपदा आहे.
जागतिक दिवस
१२ मार्च दिनविशेष रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- राष्ट्र दिन: मॉरिशियस.
ठळक घटना (घडामोडी)
१२ मार्च दिनविशेष रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १९२८: कॅलिफोर्नियातील सेंट फ्रांसिस धरण फुटून आलेल्या पुरात ४०० मृत्युमुखी.
- १९३०: ब्रिटीश सरकारने भारतात तयार केलेल्या मीठावर लादलेल्या कराविरुद्ध महात्मा गांधींनी दांडी यात्रा सुरू केली.
- १९६०: दक्षिण कोरियाच्या पुसान शहरातील रसायन कारखान्याला आग. ६८ ठार.
- १९९२: मॉरिशस प्रजासत्ताक राष्ट्र झाले.
- १९९३: मुंबईत १२ ठिकाणी बॉम्बस्फोट. ३०० ठार (अधिकृत आकडा), हजारो जखमी.
- २००६: क्रिकेटच्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने केलेल्या ४३४ धावांना दक्षिण आफ्रिकेचा ९ बाद ४३८ असे उच्चांकी प्रत्युत्तर.
जन्म (वाढदिवस, जयंती)
१२ मार्च दिनविशेष रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १९१३: यशवंतराव चव्हाण, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
- १८२१: सर जॉन ऍबट, कॅनडाचा तिसरा पंतप्रधान.
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
१२ मार्च दिनविशेष रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १४४७: शाह रुख, पर्शियाचा राजा.
- १९८०: वसंतराव आचरेकर, सुप्रसिध्द तबलावादक.
- २००१: रॉबर्ट लुडलुम, अमेरिकन लेखक.
गॅलरी (१२ मार्च दिनविशेष)
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
मार्च महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहानवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण