
TEXT - TEXT.
जागतिक दिवस
३१ मार्च रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस- मुक्ती दिन: माल्टा.
ठळक घटना (घडामोडी)
३१ मार्च रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी- १८६७: प्रार्थना समाजची स्थापना.
- १९२७: डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी महाराष्ट्रीय ज्ञानकोश हा महाप्रचंड ज्ञानकोश प्रकल्प पूर्ण केला.
- १९९७: भारतीय शास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर आणि चेक शास्त्रज्ञ डॉ. निरी ग्रायगर यांना विज्ञान लोकप्रिय करण्याच्या कार्याबद्दल युनेस्कोतर्फे दिला जाणारा कलिंग पुरस्कार प्रदान.
- २००१: भारतीय फलंदाज सचिन तेंडुलकर याने एकदिवसीय क्रिकेट प्रकारामध्ये १०,००० धावा पूर्ण केल्या.
- २०१७: ज्येष्ठ नेते शरद पवार यांना राष्ट्रपतिभवनात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात ’पद्मविभूषण पुरस्कार’ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
जन्म (वाढदिवस, जयंती)
३१ मार्च रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १८४३: बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (मराठी रंगभूमीचे जनक, मृत्यू: २ नोव्हेंबर १८८५).
- १८६५: आनंदीबाई गोपाळराव जोशी (पहिल्या भारतीय महिला वैद्यकीय चिकित्सक, मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८७).
मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)
३१ मार्च रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे- १९२६: दत्तात्रय बळवंत पारसनीस (इतिहास संशोधक, जन्म: २७ नोव्हेंबर १८७०).
- १९७२: मीनाकुमारी (हिंदी चित्रपट अभिनेत्री, जन्म: १ ऑगस्ट १९३३).
गॅलरी (३१ मार्च दिनविशेष)
संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
मार्च महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #मार्च महिन्यातील सर्व #दिनविशेष पहानवी नोंद सुचवा । दुरूस्ती कळवा । संदर्भ सूची । अस्वीकरण