१ एप्रिल दिनविशेष

१ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १ एप्रिल चे दिनविशेष.
१ एप्रिल दिनविशेष | April 1 in History
केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्मदिवस (१ एप्रिल दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
केशव बळीराम हेडगेवार - (१ एप्रिल १८८९ - २१ जून १९४०) केशव बळीराम हेडगेवार हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक कार्यकर्ते होते.

जागतिक दिवस

१ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • एप्रिल फूलचा दिवस: (अनेक देशांमध्ये १ एप्रिल रोजी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी मित्रांच्या खोड्या काढल्या जातात किंवा त्याच्यावर विनोद केले जातात. याचा एकमात्र उद्देश त्यांना ओशाळवणे हाच असतो).
 • उत्कल दिवस: ओरिसा.

ठळक घटना (घडामोडी)

१ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • ५२७: बायझेन्टाईन सम्राट जस्टिन पहिले यांनी स्वतःचे भाचे जस्टीनियन पहिले यांस आपला वारसदार घोषित केले.
 • १६६९: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली (संदर्भ उपलब्ध नसल्याने सत्यता पडताळता आलेली नाही).
 • १८२६: इंटर्नल कंबस्टन इंजिनासाठी सॅम्युएल मोरी याला पेटंट.
 • १८६९: भारतात नवा घटस्फोटाचा कायदा लागू.
 • १८८७: मुंबई अग्निशमन दल स्थापन करण्यात आले.
 • १९१२: भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला हलवणार अशी अधिकृत सूचना जारी.
 • १९२२: भारतात इन्कम टॅक्स कार्यान्वित.
 • १९२८: पुणे वेधशाळेच्या कामकाजास प्रारंभ झाला. यापूर्वी हवामानखात्याचे कामकाज सिमला येथून चालत असे. त्यामुळे पुण्यातील या वेधशाळेला ’सिमला ऑफिस’ असे म्ह्टले जाते.
 • १९३३: भारतीय हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे औपचारिक उड्डाण.
 • १९३५: भारतीय रिझर्व बँकेची स्थापना.
 • १९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली.
 • १९५४: भारतातल्या फ्रेंच वसाहती भारताच्या नियंत्रणाखाली आल्या.
 • १९५५: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.
 • १९५७: भारतात दशमान पद्धतीची नाणी-नोटा प्रमाणित (१ रुपया =१०० नवे पैसे). त्यानुसार पोस्टाची तिकीटेही जारी.
 • १९५७: बीबीसीने स्पगेटीच्या झाडाची अफवा प्रसारित केली.
 • १९६९: भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरू झाले.
 • १९७३: कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये ’प्रोजेक्ट टायगर’ची सुरूवात झाली.
 • १९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना ’भारतरत्‍न’.
 • १९९७: हेल-बॉप धूमकेतू सूर्याच्या सगळ्यात जवळ.
 • २००४: गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १२२०: गो-सागा (जपानी सम्राट, मृत्यू: १७ मार्च १२७२).
 • १६२१: गुरू तेग बहादूर (शिखांचे नववे गुरू, विविध विषयांवर त्यांनी सुमारे ११६ पदे रचली आहेत, मृत्यू: ११ नोव्हेंबर १६७५).
 • १८८९: केशव बळीराम हेडगेवार (भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक, मृत्यू: २१ जून १९४०).
 • १९०७: शिवकुमार स्वामी (भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक, मृत्यू: २१ जानेवारी २०१९).
 • १९३६: तरुण गोगोई (आसामचे मुख्यमंत्री, मृत्यू: २३ नोव्हेंबर २०२०).
 • १९४१: अजित वाडेकर (भारतीय क्रिकेट संघाचे नायक, मृत्यू: १५ ऑगस्ट २०१८).

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १०८५: शेन्झॉंग (नी सम्राट, जन्म: २५ मे १०४८).
 • १९८९: श्रीधर महादेव तथा एस. एम. जोशी (समाजवादी, कामगार नेते, पत्रकार, संयूक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू, जन्म: १२ नोव्हेंबर १९०४).
 • १९९९: श्रीराम भिकाजी वेलणकर (भारतीय टपालखात्याच्या ’पिन कोड’ प्रणालीचे जनक, संस्कृत व पाली भाषेचे गाढे अभ्यासक, जन्म: २२ जून ?).
 • २०००: संजीवनी मराठे (कवयित्री, जन्म: १४ फेब्रुवारी १९१६).
 • २००३: प्रकाश घांग्रेकर (गायक व नट, जन्म: ?).
 • २००६: राजा मंगळवेढेकर (बालसाहित्यकार, जन्म: ११ डिसेंबर १९२५).
 • २०१२: एन. के. पी. साळवे (भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष, जन्म: २४ सप्टेंबर १९२४).
 • २००४: गुरुचरणसिंग तोहरा (अकाली दलाचे नेते आणि शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष, जन्म: १८ मार्च १९२१).


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.