१९ एप्रिल दिनविशेष

१९ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक १९ एप्रिल चे दिनविशेष.
१९ एप्रिल दिनविशेष | 19 April in History
१९ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
आर्यभट्ट कृत्रिम उपग्रह - (१९ एप्रिल १९७५) भारताचा प्रथम कृत्रिम उपग्रह ‘आर्यभट्ट’ याचे सन १९७५ मध्ये सोव्हियत रशिया कडून प्रक्षेपण केले गेले.‘आर्यभट्ट्’ हा भारताने विकसीत केलेला पहिला उपग्रह आहे. थोर भारतीय गणितज्ञ व खगोल शास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचे नाव ह्या उपग्रहाला देण्यात आले आहे.

जागतिक दिवस

१९ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
 • प्रजासत्ताक दिन: सियेरा लिओन.

ठळक घटना (घडामोडी)

१९ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
 • १५८७: सर फ्रांसिस ड्रेकने केडिझच्या बंदरात स्पेनच्या आरमाराचा पराभव केला.
 • १७७५: अमेरिकन क्रांती - कॉँकॉर्ड व लेक्झिंग्टनची लढाई.
 • १८१०: व्हेनेझुएलाने स्पेनपासून स्वातंत्र्य जाहीर केले.
 • १८३९: १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्त्वात.
 • १९०४: कॅनडातील टोरोंटो शहर आगीत भस्मसात.
 • १९०९: जोन ऑफ आर्कला संत घोषित करण्यात आले.
 • १९१९: अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशुटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.
 • १९३६: पॅलेस्टाईनमध्ये उठाव.
 • १९४८: बर्मा संयुक्त राष्ट्रात समाविष्ट.
 • १९६०: दक्षिण कोरियात राष्ट्राध्यक्ष सिंगमन ऱ्ही विरुद्ध विद्यार्थ्यांची निदर्शने.
 • १९६१: पिग्सच्या अखातातील आक्रमण - घुसखोरांचा पराभव.
 • १९७१: सियेरा लिओन प्रजासत्ताक झाले. सियाका स्टीवन्स राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९७१: रशियाने सर्वप्रथम मानवनिर्मित अंतराळस्थानक सॅल्युत १चे प्रक्षेपण केले.
 • १९७५: आर्यभट्ट या प्रथम भारतीय उपग्रहाचे रशिया मधिल कापुस्टीन यार अवकाश केंद्रावरुन यशस्वी प्रक्षेपण.
 • १९७८: लागुमॉट हॅरिस नौरूच्या राष्ट्राध्यक्षपदी.
 • १९८९: यु.एस.एस. आयोवा या अमेरिकेच्या युद्धनौकेवर स्फोट. ४७ ठार.
 • १९९३: वेको, टेक्सास येथे ब्रांच डेव्हिडीयनच्या इमारतीस आग. ८१ ठार.
 • १९९५: ओक्लाहोमा सिटी येथे आल्फ्रेड पी. मरा फेडरल बिल्डींग मध्ये अमेरिकन अतिरेक्यांनी बॉम्बस्फोट घडवला. १६८ ठार.
 • १९९९: जर्मनीची संसद परत बर्लिन येथे.
 • २०००: एर फिलिपाईन्सचे बोईंग ७३७ जातीचे विमान दाव्हाओ आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोसळले. १३१ ठार.
 • २००५: जोसेफ रॅट्झिंगर पोप बेनेडिक्ट सोळावा या नावाने पोपपदी.

जन्म (वाढदिवस, जयंती)

१९ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १३२०: पेद्रो पहिला, पोर्तुगालचा राजा.
 • १४५२: फर्डिनांड दुसरा, अरागोनचा राजा.
 • १७९३: फर्डिनांड पहिला, ऑस्ट्रियाचा राजा.
 • १८८२: गेतुइलो व्हार्गास, ब्राझिलचा पंतप्रधान.
 • १८९७: पीटर दी नरोन्हा, भारतीय उद्योगपती.
 • १९०३: इलियट नेस, अमेरिकन पोलिस.
 • १९३३: डिकी बर्ड, इंग्लिश क्रिकेटपंच.
 • १९३६: विल्फ्रीड मार्टेन्स, बेल्जियमचा पंतप्रधान.
 • १९३७: जोसेफ एस्ट्राडा, फिलिपाईन्सचा अभिनेता व राष्ट्राध्यक्ष.
 • १९६८: म्स्वाती तिसरा, स्वाझीलँडचा राजा.
 • १९७५: जेसन गिलेस्पी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
 • १९८७: मारिया शारापोव्हा, रशियन टेनिस खेळाडू.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

१९ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
 • १०५४: पोप लिओ नववा.
 • १३९०: रॉबर्ट तिसरा, स्कॉटलंडचा राजा.
 • १५७८: उएसुगी केन्शिन, जपानी सामुराई.
 • १६८९: क्रिस्टीना, स्वीडनची राणी.
 • १८८१: बेंजामिन डिझरायेली, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
 • १९०६: पिएर क्युरी, फ्रेंच संशोधक, नोबेल पुरस्कार विजेता.
 • १९६७: कॉन्राड अडेनॉउअर, जर्मनीचा चान्सेलर.
 • १९७४: अयुब खान, पाकिस्तानचा पंतप्रधान.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.