२६ एप्रिल दिनविशेष

२६ एप्रिल दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २६ एप्रिल चे दिनविशेष.
२६ एप्रिल दिनविशेष | 26 April in History
२६ एप्रिल दिनविशेष (दिनविशेष), छायाचित्र: मराठीमाती अर्काईव्ह.
रमाबाई रानडे - (२५ जानेवारी १८६२ - २६ एप्रिल १९२४) या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या.

जागतिक दिवस

२६ एप्रिल रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
  • एकत्रीकरण दिन: टांझानिया.
  • जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन.

ठळक घटना (घडामोडी)

२६ एप्रिल रोजी घडलेल्या ठळक ऐतिहासिक घटना आणि घडामोडी
  • १४७८: इटलीतील पाझींनी फ्लोरेन्समध्ये चर्चमधील रविवारच्या सामूहिक प्रार्थने दरम्यान लॉरेन्झो दि मेदिची वर हल्ला केला. लॉरेन्झोचा भाउ ज्युलियानी मृत्युमुखी पडला.
  • १६०७: इंग्लंडचे काही वसाहती केप हेन्री, व्हर्जिनिया येथे पोचले. यांनी पुढे जेम्सटाउन शहर वसवले.
  • १८०२: नेपोलियन बोनापार्टने फ्रेंच क्रांतीत देशाबाहेर पळून गेलेल्या जहागिरदारांना माफी जाहीर केली व परत फ्रांसमध्ये बोलावले.
  • १८६५: अमेरिकन यादवी युद्ध - दक्षिणेच्या जनरल जोसेफ जॉन्स्टनने उत्तरेच्या विल्यम टेकुमेश शर्मन समोर उत्तर कॅरोलिनातील ड्युरॅम येथे शरणागती पत्करली.
  • १८६५: अब्राहम लिंकनची हत्या करून पळालेल्या जॉन विल्कस बूथला सैनिकांनी ठार केले.
  • १९०३: अटलेटिको माद्रिद असोसिएशन फुटबॉल क्लबची स्थापना झाली.
  • १९२५: पॉल फोन हिंडेनबर्ग वायमार प्रजासत्ताकच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९३३: जर्मनीची गुप्त पोलीस यंत्रणा गेस्टापोची रचना.
  • १९३७: जर्मनीच्या लुफ्तवाफेने स्पेनच्या गर्निका शहरावर बॉम्बफेक केली. याचे परिणाम पाहून ख्यातनाम चित्रकार पाब्लो पिकासोने गर्निका हे जगप्रसिद्ध चित्र काढले.
  • १९४२: मांचुरियाच्या हॉन्केइको कोलियरी या कोळशाच्या खाणीत स्फोट. १,५४९ कामगार ठार. आत्तापर्यंतचा खाणीत झालेला हा सगळ्यात मोठा अपघात आहे.
  • १९५६: भारतातील पहिल्या वृत्तपत्रकागदाच्या कारखान्याचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते उदघाटन.
  • १९६२: नासाचे रेंजर ४ हे चांद्रयान चंद्रावर कोसळले.
  • १९६४: टांगानिका व झांझिबार देश एकत्र आले. टांझानियाची रचना.
  • १९७०: सुवेझ कालवा भागामध्ये पुन्हा एकदा चकमकी सुरू झाल्या. इजिप्त व इस्त्रायल यांचे हवाई हल्ले सुरू झाले. एकमेकांविरुद्धचे शत्रुत्व आणि विभागीय सत्ता संतुलन, हक्क यासाठी सशस्त्र संघर्ष सुरू.
  • १९७३: अजित नाथ रे भारताचे १४ वे सरन्यायाधीश झाले.
  • १९८१: डॉ. मायकल हॅरीसन यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात सर्वप्रथम गर्भाशय उघडून अर्भकावर शस्त्रक्रिया केली.
  • १९८६: युक्रेनमध्ये चर्नोबिल अणु भट्टीत अपघात. घातक किरणोत्सर्गाने युरोप, एशियातील अनेक देश प्रभावित.
  • १९८९: बांगलादेशमधे चक्रीवादळामुले सुमारे १,३०० लोक ठार, १२,००० जखमी आणि ८०,००० बेघर झाले.
  • १९९४: चायना एअरलाइन्सचे एरबस ए-३००जातीचे विमान जपानच्या नागोया विमानतळावर कोसळले. २६४ ठार.
  • १९९५: वर कोसळले. २६४ ठार. १९९५: आशियाई विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या निशा मोहोताने इंटरनॅशनल वुमन मास्टर किताब मिळवला.
  • २००२: जर्मनीच्या एरफर्ट शहरात रॉबर्ट स्टाइनहाउझरने आपल्या शाळेतील १३ शिक्षक, २ विद्यार्थी व १ पोलीस अधिकाऱ्याला ठार मारले.
  • २००५: २९ वर्षांनी सिरियाची लेबेनॉनमधून माघार.

जन्म (वाढदिवस, जयंती)

२६ एप्रिल रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • १२१: मार्कस ऑरेलियस, रोमन सम्राट.
  • १६४८: पेद्रो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
  • १८९४: रुडॉल्फ हेस, नाझी अधिकारी.
  • १९००: चार्ल्स रिश्टर, अमेरिकन भूशास्त्रज्ञ.
  • १९०८: सर्वमित्र सिकरी, भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश.
  • १९१७: आय.एम. पै, अमेरिकन स्थापत्यविशारद.
  • १९६३: जेट ली, चीनी अभिनेता.

मृत्यू (पुण्यतिथी, स्मृती दिवस, बलिदान दिवस, शहीद दिवस)

२६ एप्रिल रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
  • ११९२: गो-शिराकावा, जपानी सम्राट.
  • १४८९: अशिकागा योशिहिसा, जपानी शोगन.
  • १९२०: श्रीनिवास रामानुजन, भारतीय गणितज्ञ.
  • १९२४: रमाबाई रानडे, मराठी लेखिका आणि समाजसुधारक.


संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा

एप्रिल महिन्यातील दिनविशेष

नवी नोंद सुचवादुरूस्ती कळवासंदर्भ सूचीअस्वीकरण


२ टिप्पण्या

  1. मराठीमाती चे दिनविशेष ईतरांच्या तुलनेत अचुक असते. कृपया अशाच प्रकारे नियमित अपडेट करत राहावे.
    आमच्या सारख्या शिक्षकांस आपली माहीती उपयुक्त आहे.
    तुम्हाला या दिनविशेष च्या लिंक्स व्हॉट्सअ‍ॅप वर पाठवता येतील का?
    1. दिनविशेष विभागातील सर्व नोंदी सातत्याने अद्ययावत (अपडेट) केली जातात.
      मराठीमाती डॉट कॉम च्या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप गटाचे (दिनविशेष: मराठीमाती) सभासद होऊन आपण दिनविशेष संदर्भातील अद्यातने (अपडेट्स) मिळवू शकता.
स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.