जानेवारी महिन्यातील दिनविशेष

जानेवारी महिन्यातील दिनविशेष | January Month in History

जानेवारी महिन्यातील ऐतिहासिक ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवसांची सविस्तर माहिती


१ जानेवारी
रघुनाथ अनंत माशेलकर - (१ जानेवारी १९४३ माशेल, गोवा) पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कार विजेते रघुनाथ अनंत माशेलकर हे वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन महामंडळ (CSIR) या संघटनेचे माजी अध्यक्ष होते.


२ जानेवारी
फर्ग्युसन महाविद्यालय - (२ जानेवारी १८८५) फर्ग्युसन महाविद्यालय पुण्यातील जुने व प्रख्यात महाविद्यालय आहे. फर्ग्युसन महाविद्यालय डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे असून याची स्थापना १८८५ साली लोकमान्य टिळक व समाजसुधारक आगरकर यांच्या पुढाकाराने झाली.


३ जानेवारी
सावित्रीबाई फुले - (३ जानेवारी १८३१ - १० मार्च १८९७) पहिल्या महिला मराठी मुख्याध्यापक आणि शिक्षिका, समाजसुधारक होत्या. फुले यांनी आशिया खंडातील पहिली मुलींची शाळा सुरू केली.


४ जानेवारी
सर आयझॅक न्यूटन - (४ जानेवारी १६४३ - ३१ मार्च १७२७) एक भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते.


५ जानेवारी
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर - (१२ जुलै १८६४ - ५ जानेवारी १९४३) अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगिरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले.


६ जानेवारी
विजय तेंडुलकर - (६ जानेवारी १९२८ - १९ मे २००८) प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, तथा राजकीय विश्लेषक होते. सखाराम बाईँडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिले.


७ जानेवारी
सुप्रिया पाठक - (७ जानेवारी १९६१) भारतीय चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री आहेत. ह्यांनी मासूम, सरकार, सरकार राज, वेक अप सिड सह अनेक चित्रपटांत आणि दूरचित्रवाणी मालिकांमधून काम केलेले आहे. हिंदीसोबत मराठी भाषांमध्येही यांनी काम केले आहे. सुप्रिया पाठक यांना तीन फिल्मफेअर पुरस्कार सह अनेक पुरस्कार मिळाले आहेत.


८ जानेवारी
गॅलिलिओ गॅलिली - (१५ फेब्रुवारी १५६४ - ८ जानेवारी १६४२) इटलीचे भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ व तत्त्वज्ञ होते.


९ जानेवारी
वासुदेव बळवंत फडके - (४ नोव्हेंबर १८४५ - १७ फेब्रुवारी १८८३) भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते. आजच्या दिवशी वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली आणि 'तेहरान' बोटीने त्यांना एडन येथे आणण्यात आले.


१० जानेवारी
शनिवारवाडा - शनिवारवाडा ही महाराष्ट्रातील पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू आहे. इ.स.च्या १८व्या शतकात हा वाडा मराठा साम्राज्याचे पंतप्रधान, अर्थात पेशवे यांचे निवासस्थान व कार्यालय होते. शनिवारवाड्याच्या पायाभरणीचे काम १० जानेवारी १७३० रोजी सुरू झाले, तर २२ जानेवारी १७३२ रोजी शनिवारवाड्याची वास्तुशांत करण्यात आली. त्या दिवशी शनिवार होता म्हणून त्यास शनिवारवाडा असे नव पडले.


११ जानेवारी
लालबहादूर शास्त्री - (२ ऑक्टोबर, इ.स. १९०४ - ११ जानेवारी, इ.स. १९६६) लालबहादूर शास्त्री हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक व भारतीय प्रजासत्ताकाचे दुसरे पंतप्रधान होते. ९ जून १९६४ रोजी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली. यांच्या कार्यकाळात १९६५ सालचे दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध घडले.


१२ जानेवारी
कुमारगंधर्व - शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमारगंधर्व (८ एप्रिल १९२४ - १२ जानेवारी १९९२) भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी लोकप्रिय झालेली, स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली.


१३ जानेवारी
मिकी माउस - मिकी माउस हे वॉल्ट डिस्नी याने इ.स. १९२८ साली निर्मित केलेले एक जगप्रसिद्ध व्यंगचित्र (कार्टून) आहे.


१४ जानेवारी
दुर्गा खोटे - (१४ जानेवारी १९०५ - २२ सप्टेंबर १९९१) मराठी अभिनेत्री होत्या. अयोध्येचा राजा (चित्रपट) या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. इ. स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ. स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.


१५ जानेवारी
खाशाबा जाधव - (जानेवारी १५, इ.स. १९२६ - ऑगस्ट १४, इ.स. १९८४) हे ऑलिंपिकपदकविजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. जाधवांनी इ.स. १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.


१६ जानेवारी
बाबूराव पेंटर - (३ जून, १८९० - १६ जानेवारी १९५४) बाबूराव पेंटर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.


१७ जानेवारी
बेंजामिन फ्रँकलिन - (१७ जानेवारी १७०६ - १७ एप्रिल १७९०) बेंजामिन फ्रँकलिन हे एक अमेरिकन बहूगुणी आणि अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक होते. फ्रँकलिन हे एक अग्रगण्य लेखक, मुद्रक, राजकीय तत्ववेत्ता, राजकारणी, फ्रीमासन, पोस्टमास्टर, वैज्ञानिक, शोधक, विनोदी, नागरी कार्यकर्ते, राजकारणी आणि मुत्सद्दी होते.


१८ जानेवारी
हरिवंशराय बच्‍चन - (२७ नोव्हेंबर १९०७ - १८ जानेवारी २००३) अलाहाबादच्या कायस्थ कुटुंबात जन्मलेल्या बच्चन यांचे खरे नाव हरिवंश श्रीवास्तव होते. त्यांना बालपणात बच्चन म्हणत, बच्चन याचा शाब्दिक अर्थ मूल किंवा संतती असा होतो. नंतर ते याच नावाने प्रसिद्ध झाले. त्यांनी प्रथम कायस्थ पाठशाळेमध्ये उर्दू भाषेचा अभ्यास केला ज्याला त्यावेळी कायद्याच्या पदवीपर्यंतची पहिली पायरी मानली जात असे. यानंतर त्यांनी प्रयाग विद्यापीठातून इंग्रजीत एम.ए केले आणि केंब्रिज विद्यापीठातून पी.एच.डी केली. मधुशाला हा त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह आहे.


१९ जानेवारी
ओशो रजनीश - (११ डिसेंबर १९३१ - १९ जानेवारी १९९०) चंद्र मोहन जैन हे जन्मनाव असणारे, १९६० पासून आचार्य रजनीश म्हणून, १९७० व १९८० च्या दशकांमध्ये भगवान श्री रजनीश म्हणून आणि १९८९ पासून ओशो म्हणून ओळखले जाणारे ओशो हे आंतरराष्ट्रीय अनुयायी मिळवणारे भारतीय रहस्यवादी, गुरू आणि आध्यात्मिक शिक्षक होते.


२० जानेवारी
रतन टाटा - (२० जानेवारी १८७१ - ५ सप्टेंबर १९१८) भारतीय उद्योगपती आणि दानशूर होते. टाटा समुह भारतातील सर्वात मोठा व्यापारी समूह आहे, ज्याची स्थापना जमशेदजी टाटा यांनी केली आणि परिवारातील पुढील पिढ्यांनी त्याचा विस्तार केला.


२१ जानेवारी
मधू दंडवते - (२१ जानेवारी १९२४ - १२ नोव्हेंबर २००५) भारतीय राजकारणी, अर्थतज्ञ व समाजसेवक होते. दंडवते माजी रेल्वे मंत्री होते.


२२ जानेवारी
शाह जहान - (५ जानेवारी १५९२ - २२ जानेवारी १६६६) शाह जहान यांचे जन्मनाव ‘खुर्रम’ होते. हे एक मुघल सम्राट होते व औरंगजेब यांचे ते पिता होते. मारवाडाचे राजे उदयसिंह याची कन्या मानमती उर्फ जगत गोसई या शहाजहान यांच्या मातोश्री होत्या व त्यांचा विवाह जहांगिर यांच्याशी इ. स. १५८६ साली झाला होता.


२३ जानेवारी
बाळ ठाकरे - बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (२३ जानेवारी १९२६ - १७ नोव्हेंबर २०१२) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते.


२४ जानेवारी
होमी भाभा - (३० ऑक्टोबर १९०९ - २४ जानेवारी १९६६) भारतीय अणुभौतिकशास्त्रज्ञ होते. भारताच्या अणुऊर्जा विकासकार्यक्रमाचा पाया रचण्याच्या कामगिरीमुळे त्यांना भारताच्या अणुऊर्जा व अण्वस्त्र विकासकार्यक्रमाचे प्रणेता मानले जाते.


२५ जानेवारी
विनोबा भावे - (११ सप्टेंबर १८९५ - १५ नोव्हेंबर १९८२) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४०मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळीही पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी आचार्य विनोबा भावे यांची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. पुढे ते सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले. मरणोत्तर १९८३ साली विनोबा भावे यांना भारतरत्‍न पदवी प्रदान करण्यात आली.


२६ जानेवारी
भारतीय प्रजासत्ताक दिन - भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी जानेवारी २६ या दिवशी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. भारताची राज्यघटना संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी अंमलात आली. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमला आणण्यासाठी निवडण्यात आला.


२७ जानेवारी
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ - (स्थापना - २७ जानेवारी १९६७) ही संस्था महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागा अंतर्गत स्थापन केलेली आहे. महाराष्ट्रातील शालेय अभ्यासक्रमासंबंधी संशोधन करणे, त्यानुसार शालेय अभ्यासक्रम तयार करणे, या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तके तयार करणे आणि विद्यार्थ्यांना कमीत कमी व योग्य दरात तसेच वेळेवर पुस्तके उपलब्ध व्हावीत अशा पद्धतीने मुद्रण आणि वितरणाची व्यवस्था करणे ही कार्ये ही संस्था करते. संस्थेचे मुख्य कार्यालय पुण्यात आहे. तसेच औरंगाबाद आणि नागपूर येथे संस्थेची विभागीय कार्यालये आहेत. ‘बालभारती’ या नावानेही ती ओळखली जाते.


२८ जानेवारी
लाला लाजपत राय - (२८ जानेवारी, १८६५ - १७ नोव्हेंबर १९२८) हे पंजाबी, भारतीय राजकारणी व लेखक होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांना पंजाब केसरी असे म्हणतात.


२९ जानेवारी
निवृत्तिनाथ महाराज - (जन्मवर्ष १२७३ ​किंवा १२६८ असे सां​गितले जाते) ज्ञानेश्वर, सोपानदेवमुक्ताई, निवृत्तिनाथ ह्या चार भावंडांमधे निवृत्तिनाथ हे थोरले होते. निवृ​त्तिनाथ हे ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू आ​णि गुरू होते. निवृत्तिनाथांनीज्ञानेश्वरांना संस्कृतमध्ये असणारी गीता सामान्य लोकांना उमजेल अशा शब्दांत लिहिण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) लिहून काढली.


३० जानेवारी
मोहनदास करमचंद गांधी - (२ ऑक्टोबर १८६९ - ३० जानेवारी १९४८) भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात. अहिंसात्मक असहकार आंदोलनांनी गांधीजीनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. अहिंसात्मक मार्गांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी त्यानी संपूर्ण जगाला प्रेरित केले. रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली. महात्मा या संस्कृत भाषेतील शब्दाचा अर्थ आहे 'महान आत्मा'. भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिता मानले जाते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी इ.स. १९४४ मध्ये त्यांना प्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. ते सत्याग्रहाचे जनक होते. त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते.


३१ जानेवारी
दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे - (३१ जानेवारी १८९६ - २१ ऑक्टोबर १९८१) हे कन्नड भाषेतील ख्यातनाम कवी होते. ते अंबिकातनयदत्त (अंबिकेचा पुत्र - दत्त) या टोपणनावाने लिहीत. कन्नड कविता व नाटकांशिवाय त्यानी मराठी साहित्यकृतींचे कन्नड भाषेत अनुवादही केले. नवोदय युगातील कन्नड काव्यातले त्यांचे योगदान पद्मश्री पुरस्कार (इ.स. १९६८) व ज्ञानपीठ पुरस्कार (इ.स. १९७४) देऊन गौरवण्यात आले.



जानेवारी महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष


नाव

अंधश्रद्धेच्या कविता,5,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,6,अनुराधा फाटक,39,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,1,अभिव्यक्ती,694,अमन मुंजेकर,6,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,1,अर्थनीति,2,अलका खोले,1,अश्विनी तातेकर देशपांडे,1,अक्षरमंच,470,आईच्या कविता,17,आईस्क्रीम,3,आकाश भुरसे,8,आज,401,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,9,आतले-बाहेरचे,1,आत्मविश्वासाच्या कविता,7,आनंद दांदळे,7,आनंदाच्या कविता,20,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,14,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,80,आरोग्य,4,आशिष खरात-पाटील,1,इंद्रजित नाझरे,15,इसापनीती कथा,44,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,13,उमेश कुंभार,12,ऋग्वेदा विश्वासराव,2,ऋचा मुळे,16,ऋषिकेश शिरनाथ,2,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ओंकार चिटणीस,1,कपिल घोलप,5,कपील घोलप,2,करमणूक,41,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,काव्य संग्रह,3,किल्ले,92,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुसुमाग्रज,1,कृष्णाच्या आरत्या,5,केदार कुबडे,41,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,कोशिंबीर सलाड रायते,11,कौशल इनामदार,1,खरगपूर,1,गणपतीच्या आरत्या,5,गणेश तरतरे,5,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गावाकडच्या कविता,7,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोड पदार्थ,37,घरचा वैद्य,2,घाट,1,चटण्या,1,चातुर्य कथा,6,जानेवारी,31,जिल्हे,1,जीवनशैली,259,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,2,डिसेंबर,31,तरुणाईच्या कविता,2,तिच्या कविता,25,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,380,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,9,दुःखाच्या कविता,52,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धोंडोपंत मानवतकर,9,निखिल पवार,1,निराकाराच्या कविता,5,निसर्ग कविता,13,नोव्हेंबर,30,न्याहारी,37,पंचांग,14,पथ्यकर पदार्थ,2,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,203,पावसाच्या कविता,18,पी के देवी,1,पुडिंग,10,पुणे,8,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,11,पौष्टिक पदार्थ,14,प्रतिक बळी,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिया जोशी,1,प्रिया महाडिक,6,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,68,प्रेरणादायी कविता,14,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,बा भ बोरकर,1,बातम्या,5,बाबाच्या कविता,1,बायकोच्या कविता,3,बालकविता,8,बालकवी,1,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बेकिंग,8,भक्ती कविता,1,भाज्या,21,भाताचे प्रकार,11,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,33,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी कथा,49,मराठी कविता,389,मराठी गझल,4,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,1,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,10,मराठी टिव्ही,27,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,3,मराठी प्रेम कथा,6,मराठी भयकथा,41,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,20,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,8,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,387,मसाले,12,महाराष्ट्र,266,महाराष्ट्र फोटो,8,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,18,महालक्ष्मीच्या आरत्या,2,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,1,माझा बालमित्र,53,मातीतले कोहिनूर,11,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मुंबई,8,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,यशपाल कांबळे,1,यशवंत दंडगव्हाळ,17,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डीले,1,रजनी जोगळेकर,4,राजकीय कविता,6,रामचंद्राच्या आरत्या,5,राहुल अहिरे,3,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लता मंगेशकर,1,लक्ष्मण अहिरे,2,लोणची,8,वाळवणाचे पदार्थ,6,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,35,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,3,विवेक जोशी,2,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,9,व्हिडिओ,20,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,5,शारदा सावंत,4,शाळेच्या कविता,8,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,2,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,6,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संगीता अहिरे,1,संघर्षाच्या कविता,17,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकाराम,7,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष सेलुकर,3,संदेश ढगे,37,संपादकीय,12,संपादकीय व्यंगचित्रे,8,संस्कार,1,संस्कृती,123,सचिन पोटे,6,सचिन माळी,1,सण-उत्सव,14,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,सरबते शीतपेये,8,सागर बाबानगर,1,सामाजिक कविता,45,सायली कुलकर्णी,3,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुरेश भट,1,सुशीला मराठे,1,सैनिकांच्या कविता,2,सैरसपाटा,97,सोमकांत दडमल,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,3,स्वाती खंदारे,196,स्वाती दळवी,6,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,36,हर्षदा जोशी,3,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,harshad-khandare,1,swati-khandare,1,
ltr
static_page
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन: जानेवारी महिन्यातील दिनविशेष
जानेवारी महिन्यातील दिनविशेष
जानेवारी महिन्यातील दिनविशेष - [January Month in History] जानेवारी महिन्यातील ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
मराठीमाती | माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/p/january-in-history.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/p/january-in-history.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ minutes ago १ तासापूर्वी $$1$$ hours ago काल $$1$$ days ago $$1$$ weeks ago ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची