१७ जानेवारी दिनविशेष

१७ जानेवारी दिनविशेष - [17 January in History] दिनांक १७ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
बेंजामिन फ्रँकलिन | Benjamin Franklin

दिनांक १७ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


बेंजामिन फ्रँकलिन - (१७ जानेवारी १७०६ - १७ एप्रिल १७९०) बेंजामिन फ्रँकलिन हे एक अमेरिकन बहूगुणी आणि अमेरिकेच्या संस्थापकांपैकी एक होते. फ्रँकलिन हे एक अग्रगण्य लेखक, मुद्रक, राजकीय तत्ववेत्ता, राजकारणी, फ्रीमासन, पोस्टमास्टर, वैज्ञानिक, शोधक, विनोदी, नागरी कार्यकर्ते, राजकारणी आणि मुत्सद्दी होते.


जागतिक दिवस
 • -
ठळक घटना / घडामोडी
 • १७७३: कॅप्टन जेम्स कूकने अंटार्क्टिक वृत्त पार केले.
 • १९१२: अमुंडसेननंतर एक महिन्याने रॉबर्ट फाल्कन स्कॉट दक्षिण ध्रुवावर पोचला.
 • १९५६: बेळगाव- कारवार आणि बिदर जिल्ह्यांतील मराठी भाग त्या वेळच्या म्हैसूर राज्यास जोडण्याची घोषणा.
 • २००१: मध्य प्रदेश सरकारचा शास्त्रीय नृत्यासाठीचा कालिदास सन्मान रोहिणी भाटे यांना जाहीर.
 • २००१: अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रातील ’सूर्या पुरस्कार’ शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एम. जी. ताकवले यांना जाहीर.
जन्म / वाढदिवस
 • १७०६: बेंजामिन फ्रँकलिन, अमेरिकन लेखक, संशोधक, प्रकाशक व राजदूत.
 • १८९५: विठ्ठल दत्तात्रय घाटे, मराठी लेखक, शिक्षणतज्ञ. रविकिरण मंडळातील एक कवी.
 • १९०५: दत्तात्रय रामचंद्र कापरेकर, भारतीय गणितज्ञ.
 • १९०६: शकुंतला परांजपे, भारतीय समाजसेविका. कुटुंब नियोजनाच्या क्षेत्रात अनन्यसाधारण कार्य केलेल्या समाजसेविका.
 • १९०८: अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ’एल. व्ही. प्रसाद’, चित्रपट निर्माते व दिग्दर्शक.
 • १९१३: यादवेंद्रसिंघ, भारतीय क्रिकेट खेळाडू.
 • १९१७: एम. जी. रामचंद्रन, अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री.
 • १९१८: सईद अमीर हैदर कमाल नक्‍वी ऊर्फ ’कमाल अमरोही’, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, संवादलेखक, पटकथाकार व कवी.
 • १९१८: रुसी मोदी, टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण (१९८९)
 • १९३२: मधुकर केचे, साहित्यिक
 • १९४२: मुहम्मद अली, ऊर्फ कॅशिअस क्ले, अमेरिकन मुष्टियोद्धा. अमेरिकन वर्णभेदाचा निषेध म्हणून त्याने धर्मांतर करुन मुहम्मद अली हे नाव स्वीकारले.
 • १९७७: मॅथ्यू वॉकर, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • २०००: सुरेश हळदणकर, जुन्या पिढीतील गायक आणि अभिनेते.
 • २०१०: ज्योति बसू, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री.
 • २०१३: ज्योत्स्‍ना देवधर, मराठी व हिंदी लेखिका आणि आकाशवाणी निर्मात्या.
 • २०१४: सुचित्रा सेन, बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.