१५ जानेवारी दिनविशेष

१५ जानेवारी दिनविशेष - [15 January in History] दिनांक १५ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१५ जानेवारी दिनविशेष | 15 January in History

दिनांक १५ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


खाशाबा जाधव - (१५ जानेवारी १९२६ - १४ ऑगस्ट १९८४) ऑलिंपिकपदकविजेते मराठी, भारतीय कुस्तीगीर होते. इ.स. १९५२ सालातल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी जिंकलेले फ्रीस्टाइल कुस्तीतले कांस्यपदक हे भारतासाठी स्वातंत्र्योत्तर काळातले पहिले वैयक्तिक पदक होते. जाधवांनी इ.स. १९४८ सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. १९५२ सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये ५२ किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.


जागतिक दिवस
 • जॉन चिलेम्ब्वे दिन: मलावी.
 • कोरियन लिपी दिन: उत्तर कोरिया.
 • भारतीय सशस्त्र सेना दिवस.
ठळक घटना / घडामोडी
 • १५५९: राणी एलिझाबेथ (पहिली) यांची इंग्लंडची राणी म्हणून वेस्टमिन्स्टर अ‍ॅबे येथे राज्याभिषेक झाला.
 • १७६१: पानिपतचे तिसरे युद्ध संपले.
 • १८६१: एलिशा जी. ओटिस या संशोधकाला सुरक्षित उद्‌वाहकाचे (Lift) जगातील पहिले पेटंट मिळाले.
 • १८८९: द पेंबरटन मेडिसिन कंपनी या कंपनीची अटलांटा, जॉर्जिया, यू. एस. ए. येथे स्थापना झाली. ही कंपनी सध्या द कोका कोला कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे.
 • १९१९: राजर्षी शाहू महाराजांनी आदेश काढून स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थ्यांना एकाच शाळेत शिक्षण देण्याची व्यवस्था केली.
 • १९४९: भारताच्या स्वातंत्र्यानंतर फिल्डमार्शल के.एम. करिअप्पा यांनी पहिले लष्करप्रमुख म्हणून सूत्रे स्विकारली. हा दिवस लष्करदिन म्हणून ओळखला जातो.
 • १९७३: जनरल गोपाळ गुरुनाथ बेवूर यांनी भारताचे ९ वे लष्करप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली. हे लष्करप्रमुख होणारे पहिले महाराष्ट्रीयन आहेत.
 • १९९६: भारतातील रेल्वेयुगाच्या प्रारंभापासून ब्रिटिश परंपरा, संस्कृतीचा डौल मिरवणाऱ्या बोरीबंदर (व्हिक्टोरिया टर्मिनस) या स्थानकाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असे करण्यात आले.
 • १९९९: ज्येष्ठ गायिका ज्योत्स्ना भोळे यांना राज्य सरकारच्या वतीने गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान.
 • २००१: सर्वांना मोफत असलेला ज्ञानकोश ’विकीपिडिया’ हा इंटरनेटवर प्रथमच उपलब्ध झाला.
 • २००५: ESAच्या SMART-1 या चांद्र-उपग्रहाने चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या कॅल्सियम, सिलीकन, लोह, आणि अन्य मूलद्रव्यांचा शोध लावला.
 • २००९: यूएस एअरवेजच्या विमानाचं, प्राणहानी टाळून हडसन नदीत आश्चर्यकारक लँडींग
जन्म / वाढदिवस
 • १७७९: रॉबर्ट ग्रँट, मुंबई इलाख्याचे राज्यपाल, मुंबईतील ग्रँट मेडिकल कॉलेजचे एक संस्थापक, मुंबईतील ग्रँट रोड हा त्यांच्याच नावाने ओळखला जातो.
 • १९०८: एडवर्ड टेलर, पदार्थविज्ञानशास्त्रज्ञ, हायड्रॉजन बॉम्बचा संशोधक.
 • १९२०: डॉ. आर. सी. हिरेमठ, कन्नड साहित्यिक, कर्नाटक विद्यापीठाचे कुलगुरू
 • १९२१: बाबासाहेब भोसले, महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री (कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३)
 • १९२६: खाशाबा दादासाहेब जाधव, भारतीय कुस्तीगीर. १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय, शिवछत्रपती पुरस्कार (मरणोत्तर)
 • १९२९: डॉ. मार्टिन लुथर किंग, अमेरिकन नागरी अधिकार चळवळीचा नेता.
 • १९३१: शरच्चंद्र वासुदेव चिरमुले, मराठी कथाकार.
 • १९४७: नितीश नंदी, पत्रकार.
 • १९५६: मायावती, भारतीय राजकारणी.
 • १९५६: पॉल पार्कर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
 • १९८२: नील नितीन मुकेश, सिनेअभिनेता.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.