५ जानेवारी दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ५ जानेवारी चे दिनविशेष.

दिनांक ५ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर - (१२ जुलै १८६४ - ५ जानेवारी १९४३) अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. गुलामगिरीच्या काळात जन्माला आलेले कार्व्हर यांना त्यांचे मालक मोझेस कार्व्हर यांनी मोठे केले व आपले नावही दिले.
जागतिक दिवस
- पक्षी दिन: अमेरिकेची संयुक्त संस्थाने.
- १४६३: कवि फ्रांस्वा व्हियोंची पॅरिसमधून हकालपट्टी.
- १६६४: छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या सीमेवरुन तेथील सुभेदार इनायत खानकडून खंडणीची मागणी केली. खंडणी देण्यासाठी निरोप पाठविला - जर खंडणी दिली नाही, तर शहर लुटावे लागेल त्याची जबाबदारी इनायत खानावर राहील
- १६७१: छत्रपती शिवाजी महाराजांनी साल्हेर मुघलांकडून काबीज केले. छत्रपती शिवाजी महाराज आणि मोरोपंत पिंगळे यांनी साल्हेरच्या किल्ल्यास वेढा घालून किल्ला जिंकून घेतला.
- १७५९: जॉर्ज वॉशिंग्टन व मार्था डँड्रिज कर्टिसचे लग्न.
- १८९६: विल्हेल्म रॉन्ट्जेनने विशिष्ट प्रकारचे किरणोत्सर्गत्त्व शोधल्याचे ऑस्ट्रियाच्या दैनिकात प्रसिद्ध झाले. या किरणोत्सर्गाला पुढे क्ष-किरण असे नाव दिले गेले.
- १९१४: फोर्ड मोटर कंपनीने आठ तासांचा दिवस व ५ डॉलर प्रती दिवशीचा पगार जाहीर केला. याआधी कामगारांना ठराविक तासांचे काम करणे भाग नसे.
- १९२४: महाड महानगरपालिकेने चवदार तळे अस्पृश्यांसाठी खुले केले.
- १९४८: वॉर्नर ब्रदर्सनी प्रथम रंगीत सिनेमाचे प्रदर्शन केले.
- १९५७: भारतात विक्रीकर कायदा लागू झाला.
- १९७२: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सनने स्पेस शटल कार्यक्रम सुरू करण्याचा हुकूम दिला.
- १९७६: कंबोडियाने नाव बदलले. नवीन नाव काम्पुचियाचे गणराज्य.
- १९९८: ज्येष्ठ जर्मन समाजशास्त्रज्ञ गेरहार्ड फिशर यांना कुष्ठरोग आणि पोलिओ नियंत्रणाच्या क्षेत्रात भारतात केलेल्या कार्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- २००४: संभाजी ब्रिगेड या जातीयवादी संघटनेने केलेल्या समाजकंटकांच्या हल्ल्यात भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्युटचे अतोनात नुकसान. अनेक अमोल व दुर्मिळ ग्रंथ फाडले.
- १५८७: झु झियाके, चीनी लेखक व शोधक.
- १५९२: शाहजहान, भारतातील मोगल सम्राट.
- १८५५: किंग कॅम्प जिलेट, अमेरिकन शोधक. सेफ्टी रेझर तयार करून प्रथम बाजारात आणणारा.
- १८६९: वेंकटेश तिरको कुलकर्णी, कन्नड साहित्यिक .
- १८९२: कृ. पां. कुळकर्णी मराठी भाषेचे अभ्यासक.
- १८९३: परमहंस योगानंद, भारतीय तत्त्वज्ञानी.
- १९१३: श्रीपाद नारायण पेंडसे, मराठी साहित्यिक.
- १९२२: मोहम्मद उमर मुक्री, हिंदी विनोदी चरित्र अभिनेता.
- १९४१: मन्सूर अली खान पतौडी, भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार, पतौडी संस्थानाचा नववा व अखेरचा नवाब.
- १९४८: पार्थसारथी शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९४८: फैय्याज अभिनेत्री व गायिका.
- १९५५: ममता बॅनर्जी, बंगाली नेत्या.
- १९६१: ना. धों. ताम्हणकर, कथालेखक, कादंबरीकार व बाल साहित्यकार.
- १९८६: दीपिका पदुकोण, कन्नड, हिन्दी आणि तामिळ चित्रपट अभिनेत्री.
- १६५५: पोप इनोसंट दहावा.
- १७६२: रशियाची एलिझाबेथ, रशियाची साम्राज्ञी.
- १९४३: जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर, अमेरिकन शिक्षणतज्ञ, वनस्पतिशास्त्रज्ञ.
- १९७१: पी.सी.सरकार, भारतीय जादूगार.
- १९८२: रामचंद्र चितळकर उर्फ सी.रामचंद्र, भारतीय संगीतकार. त्यांनी धनंजय नावाच्या चित्रपटात धनंजयांची भुमिका केली असली, तरी ते संगीत दिग्दर्शक म्हणूनच गाजले.
- १९९०: रमेश बहल, चित्रपट निर्माता व दिग्दर्शक.
- १९९२: द. ग. गोडसे, समिक्षक , नाटककार, इतिहासकार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार.
- २००३: गोपालदास पानसे, पखवाजवादक.
- २००३: प्रदीप द. र्ऊफ काका मोहिते, माजी राष्ट्रीय ज्यूदोपटू.
- २००४: गजानन नारायणराव जाधव, ज्येष्ठ चित्रकार.
- २०१८: वसंत डावखरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी उपसभापती यांचे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले, ते 68 वर्षांचे होते.
जानेवारी महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जानेवारी महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर
अभिप्राय