दिनांक १२ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
कुमारगंधर्व: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमारगंधर्व (८ एप्रिल १९२४ - १२ जानेवारी १९९२) हे भारतातील हिंदुस्तानी शास्त्रीय गायक होते. हिंदुस्तानी संगीतपद्धतीतील घराण्यांच्या पारंपरिक भिंती भेदून त्यांनी लोकप्रिय झालेली, स्वतःची आगळ्या ढंगाची गायकी घडवली.
जागतिक दिवस
- राष्ट्रीय युवक दिन: भारत.
- झांझिबार क्रांती दिन: टांझानिया.
- १५२८: गुस्ताव पहिला स्वीडनच्या राजेपदी.
- १७०५: मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथे हलविण्यात आली.
- १९०८: पहिला लांब अंतरावर पाठवला गेलेला रेडिओ संदेश आयफेल टॉवरवरून प्रसारित झाला.
- १९१५: महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला.
- १९२६: पास्चर संस्थेने धर्नुवातासाठी लस शोधल्याची घोषणा केली.
- १९३१: सोलापूरचे क्रांतिकारी किसन सारडा, मल्लाप्पा धनशेट्टी व कुरबन हुसेन साचा:जगन्नाथ शिंदेयांना येरवडा कारागृहात फाशी देण्यात आली.
- १९३६: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धर्मांतराची घोषणा.
- १९९७: सामाजिक कार्यकर्त्या गंगुताई पटवर्धन यांना महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा पहिला बाया कर्वे पुरस्कार प्रदान.
- १९९८: एकोणीस युरोपीय देशांनी मानवी क्लोनिंगवर बंदी आणली.
- २००५: राष्ट्रीय ज्ञान आयोगाची स्थापना.
- इ.स. २००६: हज यात्रेच्या अखेरच्या दिवशी मक्केजवळ मीना येथे प्रतीकात्मक दगड फेकण्याचा विधी चालू असताना झालेल्या चेंगराचेंगरीत ३४५ मुस्लिम भाविकांचा मृत्यु व २९० जखमी.
- २०१०: तीन लाखावर बळी घेणारा हैतीचा भूकंप.
- १५९८: जिजाबाई, छत्रपती शिवाजीच्या आई.
- १८५४: व्यंकटेश बापूजी केतकर, गणिती व ज्योतिर्विद.
- १८६३: नरेन्द्रनाथ दत्त उर्फ स्वामी विवेकानंद, भारतीय तत्त्वज्ञानाची महती जगभर पसरवणारे भारतीय तत्त्वज्ञ.
- १८९९: पॉल हर्मन म्युलर, नोबेल पारितोषिक विजेते स्विस रसायनशास्त्रज्ञ.
- १९०२: सौद, सौदी अरेबियाचा राजा.
- १९०२: धुंडिराजशास्त्री विनोद, महर्षी न्यायरत्न. तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक
- १९०६: महादेवशास्त्री जोशी, भारतीय संस्कृतीकोशाचे व्यासंगी संपादक.
- १९१८: सी. रामचंद्र, ज्येष्ठ संगीतकार.
- १९१७: महाऋषी महेश योगी, भारतीय तत्त्वज्ञ.
- १९४९: हारुकी मुराकामी, जपानी साहित्यिक, अनुवादक.
- १९७२: पॉल विल्सन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १८३४: विल्यम विंड्हॅम ग्रेनव्हिल, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८९७: सर आयझॅक पिटमॅन, शॉर्टहँड या लघुलिपीचे जनक.
- १९४४: वासुकाका जोशी, लोकमान्य टिळकांचे निकटचे सहकारी व चित्रशाळेचे विश्वस्त.
- १९६६: नरहर विष्णू तथा काकासाहेब गाडगीळ, स्वातंत्र्यसैनिक, लेखक, वक्ते, राजकीय नेते, केंद्रीय मंत्री आणि पंजाबचे राज्यपाल.
- १९९२: पंडित कुमार गंधर्व, हिंदुस्थानी संगीताच्या क्षेत्रातील ख्यातनाम गायक. शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ‘कुमार गंधर्व’.
- १९९७: ओ.पी. रल्हन, हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखक व अभिनेते.
- २००५: अमरीश पुरी, भारतीय अभिनेता. आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |