१४ जानेवारी दिनविशेष

१४ जानेवारी दिनविशेष - [14 January in History] दिनांक १४ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
१४ जानेवारी दिनविशेष | 14 January in History

दिनांक १४ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस


दुर्गा खोटे - (१४ जानेवारी १९०५ - २२ सप्टेंबर १९९१) मराठी अभिनेत्री होत्या. अयोध्येचा राजा (चित्रपट) या मराठीतील पहिल्या बोलपटात त्यांनी प्रमुख अभिनेत्रीची भूमिका केली होती. सुमारे पाच दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी मराठी व हिंदी भाषांतील अनेक चित्रपट व नाटकांतून भूमिका केल्या. इ. स. १९६८ साली पद्मश्री पुरस्कार, तर इ. स. १९८३ साली दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आले.


जागतिक दिवस
ठळक घटना / घडामोडी
 • १७६१: पानिपतची तिसरी लढाई- मराठे व अहमदशाह अब्दाली मध्ये झालेले भीषण युद्ध. दुसर्‍याच दिवशी संपलेल्या या युद्धात अफगाण्यांचा विजय झाल्यामुळे भारतीय इतिहासाचा चेहरामोहराच बदलुन गेला.
 • १८५७: भारतात मिळालेली लूट ठेवून घेण्याची मुभा ईस्ट इंडीया कंपनीला देणारा हुकूम इंग्लंडच्या राजाने काढला.
 • १९२३: विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली.
 • १९४८: ’लोकसत्ता’ हे मराठी वृत्तपत्र सुरू झाले.
 • १९९३: मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात आले.
 • १९९४: मराठवाडा विद्यापीठाचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्यात आला.
 • १९९८: ज्येष्ठ गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान जाहिर.
 • २०००: ज्येष्ठ समाजसेवक व गांधीवादी विचारवंत बाबा उर्फ मुरलीधर देवीदास आमटे यांना इ.स. १९९९चा गांधी शांतता पुरस्कार राष्ट्र्पतींच्या हस्ते प्रदान.
 • २००४: जॉर्जियाच्या पाच क्रॉस ध्वजला पाचशे वर्षांनंतर पुन्हा अधिकृत ध्वजाचे स्थान देण्यात आले.
 • २००५: शनिच्या उपग्रह टायटनवर हायगेन्स प्रोब हे अंतराळयान उतरले.
जन्म / वाढदिवस
 • १८८२: रघुनाथ धोंडो कर्वे, संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण या विषयी काम करणारे कृतिशील विचारवंत. समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र.
 • १८९२: क्रिकेटमहर्षी दिनकर बळवंत देवधर शतायुषी क्रिकेट खेळाडू.
 • १८९६: डॉ. चिंतामणराव देशमुख, भारताचे अर्थमंत्री. भारतीय रिझर्व बँकेचे पहिले गव्हर्नर
 • १९०५: दुर्गा खोटे, मराठी अभिनेत्री.
 • १९०८: द्वा.भ. कर्णिक, ज्येष्ठ पत्रकार आणि रॉयवादी विचारवंत.
 • १९१९: सय्यद अख्तर हुसेन रिझवी ऊर्फ कैफी आझमी, गीतकार
 • १९२३: चित्तरंजन कोल्हटकर, अभिनेते.
 • १९२६: महाश्वेतादेवी, ज्ञानपीठ व इंदिरा गांधी एकात्मता पुरस्कार विजेत्या बंगाली लेखिका.
 • १९३१: सईद अहमद शाह ऊर्फ अहमद फराज, ऊर्दू शायर.
 • १९७७: नारायण कार्तिकेयन, भारतीय फॉर्म्युला कार रेसिंग चालक.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन
 • १७४२: एडमंड हॅले, ब्रिटिश अंतरिक्षशास्त्रज्ञ.
 • १७४२: लुईस कॅरोल, इंग्लिश लेखक व गणितज्ञ.
 • १७६१: विश्वासराव पेशवे, पानिपतच्या ३र्‍या युद्धात मारले गेलेले नानासाहेब पेशव्यांचे ज्येष्ठ चिरंजीव.
 • १७६१: पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ
 • १९३७: जयशंकर प्रसाद, हिंदी साहित्यिक.
 • १९८४: रे क्रॉक, अमेरिकन झटपट-खाद्यपदार्थ उद्योगपती.
 • १९९१: चित्रगुप्त श्रीवास्तव ऊर्फ चित्रगुप्त संगीतकार.
 • २००१: बुर्कहार्ड हाइम, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
 • २००१: माहितीपट निर्माते फली बिलिमोरिया
 • २०१४: पं. पुरुषोत्तम वालावलकर, हार्मोनियमवादक.

मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०१११२
१३१४१५१६१७१८
१९२०२१२२२३२४
२५२६२७२८२९३०
३१

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.