६ जानेवारी दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक ६ जानेवारी चे दिनविशेष.

दिनांक ६ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
विजय तेंडुलकर - (६ जानेवारी १९२८ - १९ मे २००८) प्रसिद्ध मराठी नाटककार, लेखक, पटकथालेखक, तथा राजकीय विश्लेषक होते. सखाराम बाईँडर हे प्रसिद्ध नाटक तेंडुलकर यांनी लिहिले.
शेवटचा बदल १९ मे २०२१
जागतिक दिवस
- पत्रकार दिन (महाराष्ट्र).
- वर्धापनदिन: मराठीतील पहिले वृत्तपत्र दर्पण (१८३२)
- १६६४: मराठी सैन्य सुरतेत शिरले.
- १६६५: शिवाजी महाराजांनी महाबळेश्वर येथे जिजाबाई व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली.
- १६७३: कोंडाजी फर्जंद यांनी ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकला.
- १८३२: मुंबई येथे 'दर्पण' चा पहिला अंक प्रदर्शित. संपादक बाळशास्त्री जांभेकर.
- १८३८: सॅम्युएल मॉर्सने तारयंत्राचा शोध लावला.
- १९२४: वि. दा. सावरकर यांची अंदमानच्या तुरुंगातून (जन्मठेपेतून) सुटका.
- १९२९: मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.
- १९०७: मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.
- १९२४: राजकारणात भाग न घेणे व रत्नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता.
- १९२९: गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन.
- १९४४: दुसरे महायुद्ध- रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.
- १९९३ : सोपोर हत्याकांड- अतिरेक्यांनी छावणीवर केलेल्या हल्ल्याला प्रतिसाद म्हणून भारतीय सीमा सुरक्षा दळाच्या जवानांनी ५५ काश्मिरी नागरिकांची हत्या केली.
- १७४५: ऐलियन माँटगोल्फिएर, बलूनच्या साहाय्याने आकाशात जाण्याचे प्रयोग करणारा.
- १८१२: बाळशास्त्री जांभेकर, दर्पण या पहिल्या मराठी वृत्तपत्राचे आणि दिग्दर्शन या मासिकाचे प्रकाशक.
- १९२५: रमेश मंत्री, मराठी साहित्यिक .
- १९२८: विजय तेंडुलकर (मराठी साहित्यिक, मृत्यू: १९ मे २००८).
- १९३१: डॉ. आर.डी. देशपांडे, पर्यावरणशास्त्रज्ञ, महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्सचे (आघारकर संशोधन संस्था) अध्यक्ष.
- १९३२: लेखक कमलेश्वर.
- १९५९: कपिलदेव निखंज, भारतीय क्रिकेट खेळाडू. भारतीय क्रिकेट संघनायक, समालोचक व प्रशिक्षक.
- १९६६: ए.आर. रहमान, भारतीय संगीतकार.
- १७९६: जिवबा दादा बक्षी, महादजी शिंदे यांचे सेनापती, मुत्सद्दी.
- १८४७: त्यागराज, कर्नाटक संगीताचे रचनाकार, संगीतशास्त्रज्ञ व गायक.
- १८५२: लुई ब्रेल, अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक.
- १८८५: भारतेंदू हरिश्चंद्र, आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक, १८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात ’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो.
- १९१९: थियोडोर रूझवेल्ट, अमेरिकेचे २६वे राष्ट्राध्यक्ष.
- १९७१: प्रफुल्लचंद्र तथा पी.सी. सरकार, भारतीय जादूगार.
- १९८४: विद्यानिधी महामहोपाध्याय सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, वेदशास्त्र अभ्यासक, चरित्रकोशकार, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार.
- १९८७: संगीतकार जयदेव.
- २०१०: प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे, लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक.
- २०१७: ओम पुरी, भारदस्त आवाज, पल्लेदार संवादफेक आणि कसदार अभिनयाने रुपेरी पडद्यावर दीर्घकाळ आपली छाप उमटविणारे अभिनेते यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते 66 वर्षांचे होते.
जानेवारी महिन्यातील दिनविशेष | ||||||
---|---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ | ७ |
८ | ९ | १० | ११ | १२ | १३ | १४ |
१५ | १६ | १७ | १८ | १९ | २० | २१ |
२२ | २३ | २४ | २५ | २६ | २७ | २८ |
२९ | ३० | ३१ | ||||
तारखेप्रमाणे जानेवारी महिन्यातील सर्व दिनविशेष पहा. |
आज
सर्व विभाग / सेवा सुविधा / मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी दिनविशेष
विभाग -
जानेवारी दिनविशेष · फेब्रुवारी दिनविशेष · मार्च दिनविशेष · एप्रिल दिनविशेष · मे दिनविशेष · जून दिनविशेष · जुलै दिनविशेष · ऑगस्ट दिनविशेष · सप्टेंबर दिनविशेष · ऑक्टोबर दिनविशेष · नोव्हेंबर दिनविशेष · डिसेंबर दिनविशेष
विषय -
जानेवारी · फेब्रुवारी · मार्च · एप्रिल · मे · जून · जुलै · ऑगस्ट · सप्टेंबर · ऑक्टोबर · नोव्हेंबर · डिसेंबर