२१ जानेवारी दिनविशेष

२१ जानेवारी दिनविशेष - इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २१ जानेवारी चे दिनविशेष.
२१ जानेवारी दिनविशेष | 21 January in History

इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २१ जानेवारी चे दिनविशेष


मधू दंडवते - (२१ जानेवारी १९२४ - १२ नोव्हेंबर २००५) भारतीय राजकारणी, अर्थतज्ञ व समाजसेवक होते. दंडवते माजी रेल्वे मंत्री होते.


शेवटचा बदल २१ जानेवारी २०२२

जागतिक दिवस
२१ जानेवारी रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस

 • -

ठळक घटना / घडामोडी
२१ जानेवारी रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी

 • १७६१: थोरले माधवराव पेशवे यांनी वयाच्या १६ व्या वर्षी पेशवाईची सूत्रे हाती घेतली.
 • होळकर व जाट सैन्याने भरलपूर येथे इंग्रजांचा पराभव केला.
 • १९५४: नॉटिलस या अणुउर्जेवर चालण्याऱ्या जगातील पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.
 • १९६१: इंग्लंडची राणी एलिझाबेथ आणि त्यांचे पती ड्यूक ऑफ एडिनबरा यांची पहिली भारतभेट.
 • १९७२: मणिपूर व मेघालय या राज्यांना स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला.
 • १९९९: जर्मन सरकारच्या 'फोरम ऑफ आर्ट ऍंड एक्झिबिशन' ने १९९९ च्या आंतरराष्ट्रीय पुरस्कारासाठी विख्यात सतारवादक पं. रवी शंकर यांची निवड केली.
 • २०००: फायर अँड फरगेट या रणगाडाविरोधी अत्याधुनिक क्षेपणास्त्र यंत्रणेची भारताकडून यशस्वी चाचणी.
 • २००३: राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्यांना अधिक कठोर शिक्षा करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय.

जन्म / वाढदिवस / जयंती
२१ जानेवारी रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १८८२: वामन मल्हार जोशी, मराठी साहित्यिक आणि तत्त्वचिंतक.
 • १८९४: माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ माधव ज्युलियन, मराठी कवी, कोशकार.
 • १९१०: शांताराम आठवले, मराठी चित्रपटदिग्दर्शक आणि साहित्यिक
 • १९२४: प्रा. मधू दंडवते, माजी केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ समाजवादी नेते. माजी रेल्वे मंत्री, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सदस्य, अर्थतज्ञ
 • १९५३: पॉल अ‍ॅलन, मायक्रोसॉफ्टचा एक संस्थापक.

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२१ जानेवारी रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे

 • १९४३: क्रांतिकारक हेमू कलाणी यांना ब्रिटिशांनी फाशी दिली
 • १९४५: रासबिहारी बोस, स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारक नेते.
 • १९६५: हरिकीर्तन कौर ऊर्फ गीता बाली, भारतीय चित्रपट अभिनेत्री.
 • १९९८: एस.एन.कोहली, माजी नौदलप्रमुख ॲडमिरल. भारताचे ९ वे नौदल प्रमुख.

दिनविशेष        जानेवारी महिन्यातील दिनविशेष
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा
१०
११
१२
१३
१४
१५
१६
१७
१८
१९
२०
२१
२२
२३
२४
२५
२६
२७
२८
२९
३०
३१


टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.