इतिहासातील जागतिक दिवस, ठळक घटना, वाढदिवस, स्मृती दिवसांची संदर्भासहित माहिती देणारे दिनांक २३ जानेवारी चे दिनविशेष
बाळ ठाकरे - बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे (२३ जानेवारी १९२६ - १७ नोव्हेंबर २०१२) हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी, व्यंगचित्रकार, संपादक होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादक होते.
शेवटचा बदल २३ जानेवारी २०२२
जागतिक दिवस
२३ जानेवारी रोजी पाळले जाणारे जागतिक दिवस
- जागतिक हस्ताक्षर दिवस
- देशप्रेम दिवस
ठळक घटना / घडामोडी
२३ जानेवारी रोजी घडलेल्या ठळक घटना आणि घडामोडी
- १५५६: जगातील सर्वात मोठा भूकंप चीनच्या शांक्सी प्रांतात घडला. अंदाजे ८,३०,००० ठार.
- १५६५: तालिकोटची लढाई- विजयनगर साम्राज्याच्या विरुद्ध अहमदनगरचा निझामशहा, विजापूरचा आदिलशाही, बिदरचा इमादशहा, बेरारचा बरीदशहा व गोवळकोंडाचा कुतुबशहा या दखनी सुलतानांनी एकी करून रामरायाचा पाडाव केला. येथून दक्षिण भारतात अनिर्बंध मुस्लिम सत्तेला सुरूवात झाली.
- १७०८: छत्रपती शाहू महाराजांनी स्वत:ला राज्याभिषेक करवून घेतला व साताऱ्याला राज्याची नवी राजधानी जाहीर केले.
- १९२६: बाँबे टेक्स्टाईल लेबर युनियन या संघटनेची स्थापना.
- १९३२: प्रभातच्या अयोध्येचा राजाची हिंदी आवृत्ती अयोध्याका राजा मुंबईत प्रदर्शित झाली.
- १९९६: संगणक भाषा जावाचे सर्वप्रथम प्रकाशन.
जन्म / वाढदिवस / जयंती
२३ जानेवारी रोजी जन्मदिवस असलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १८९७: नेताजी सुभाषचंद्र बोस, भारतीय क्रांतिकारी.
- १८९८: पं. शंकरराव व्यास, गायक व संगीतशिक्षक.
- १९१५: कमलनयन बजाज, भारतीय उद्योगपती.
- १९२०: श्रीपाद जोशी, मराठी साहित्यिक.
- १९२६: बाळासाहेब ठाकरे, मराठी राजकारणी, शिवसेना पक्षाचे संस्थापक.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृती दिवस
२३ जानेवारी रोजी मृत्यू पावलेली प्रसिद्ध व्यक्तिमत्वे
- १६६४: शहाजीराजे भोसले.
- १९१९: राम गणेश गडकरी, मराठी साहित्यिक.
- १९५९: विठ्ठल नारायण चंदावरकर, शिक्षणतज्ञ आणि कायदेपंडित.
- १९६३: नरेन्द्र मोहन सेन, भारतीय कांतिकारी.
- १९९२: ह.भ.प. धुंडामहाराज देगलूरकर, भक्तिसांप्रदायिक आणि ज्ञानेश्वरीचे अभ्यासक.
- २०१०: पं. दिनकर कैकिणी, हिंदुस्तानी शास्त्रीय गायक.
दिनविशेष जानेवारी महिन्यातील दिनविशेष | |||||
---|---|---|---|---|---|
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |