१६ जानेवारी दिनविशेष - [16 January in History] दिनांक १६ जानेवारी च्या ठळक घटना/घडामोडी, जन्म/वाढदिवस, मृत्यू/पुण्यतिथी/स्मृतीदिन आणि जागतिक दिवस यांची माहिती.
दिनांक १६ जानेवारी च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस
बाबूराव पेंटर - (३ जून १८९० - १६ जानेवारी १९५४) बाबूराव पेंटर यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबूराव कृष्णराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.
जागतिक दिवस
- मार्टिन लुथर किंग दिन: अमेरिका.
- शिक्षक दिन: थायलंड.
- १६६०: रुस्तुम झमान आणि फाजल खान हे आदिलशहाचे सेनापती शिवाजी महाराजांवर चालुन आले आणि पराभूत होऊन परत गेले.
- १६६६: नेताजी पालकर वेळेवर न आल्याने पन्हाळगड जिंकण्याचा शिवाजीराजांचा डाव फसला
- १६८१: छत्रपती संभाजी राजे यांचा ’छत्रपती’ म्हणून राज्याभिषेक झाला.
- १९०९: अर्नेस्ट शॅकल्टनच्या संघाने चुंबकीय दक्षिण ध्रुव शोधला.
- १९१९: अमेरिकेचे संविधान सुधारून संपूर्ण राष्ट्रात दारूबंदी जाहीर करण्यात आली.
- १९४१: नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे देशाबाहेर प्रयाण
- १९५५: नॅशनल डिफेन्स अकॅडमी इमारतीचे मुंबई राज्याचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांच्या हस्ते उदघाट्न.
- १९७८: रु. १,००० आणि अधिक किमतीच्या नोटा चलनातून रद्द
- १९९५: आयएनएस विद्युत या संपूर्ण देशी बनावटीच्या क्षेपणास्त्र नौकेचे गोवा येथे जलावतरण.
- १९९६: भारतीय कापड गिरणी कामगार नेता दत्ता सामंतची हत्या.
- १९९६: पुण्याचे शिल्पकार दिनकर शंकरराव थोपटे यांची ललित कला अकादमीच्या पुरस्कारासाठी निवड
- १९९८: ज्येष्ठ उर्दू कवी व लेखक अली सरदार जाफरी यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
- २००३: स्पेस शटल कोलंबिया अंतराळात. १६ दिवसानंतर परतताना अपघातात सर्व अंतराळवीरांचा मृत्यू.
- २००८: टाटा मोटर्सच्या नॅनो या एक लाख रुपये किंमतीच्या 'पीपल्स कार'चे अनावरण
- १९२०: नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला , कायदेपंडित आणि अर्थतज्ञ
- १९२६: ओंकार प्रसाद तथा ओ.पी.नय्यर, भारतीय संगीतकार.
- १९४६: कबीर बेदी, भारतीय अभिनेता.
- १९०१: महादेव गोविंद रानडे, भारतीय समाजसुधारक, धर्मसुधारक, न्यायाधीश, अर्थशास्त्रज्ञ.
- १९३८: शरच्चंद्र चटोपाध्याय, बांगला साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक.
- १९५४: बाबूराव पेंटर, भारतीय चित्रपटनिर्माता, चित्रकार, शिल्पकार.
- १९६६: साधू वासवानी, आध्यात्मिक गुरु व शिक्षणतज्ञ
- १९८८: लक्ष्मीकांत झा, भारतीय अर्थशास्त्रज्ञ. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे गव्हर्नर, जम्मू काश्मीरचे राज्यपाल व भारताचे अमेरिकेतील राजदूत
- १९९७: कामगार नेते डॉ. दत्ता सामंत यांची गोळ्या घालून हत्या
- २०००: त्रिलोकीनाथ कौल, मुरब्बी मुत्सद्दी, परराष्ट्र सचिव, रशिया, अमेरिका व इराणमधील भारताचे राजदूत.
- २००१: पंडितराव बोरस्ते, भारतीय क्रीडा संघटक, शिवछत्रपती पुरस्कार विजेता.
- २००३: रामविलास जगन्नाथ राठी, भारतीय उद्योगपती.
- २००५: श्रीकृष्ण हरी मेहेंदळे, मराठी संगीतकार. पेटीवाले मेहेंदळे म्हणून ख्याती.
मराठी दिनदर्शिका / दिनविशेष / जानेवारी | |||||
---|---|---|---|---|---|
तारखेप्रमाणे #जानेवारी महिन्यातील सर्व #दिनविशेष पहा | |||||
१ | २ | ३ | ४ | ५ | ६ |
७ | ८ | ९ | १० | ११ | १२ |
१३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ |
२५ | २६ | २७ | २८ | २९ | ३० |
३१ |
अभिप्राय